मुंबई : पाकिस्तानात राहणारी सीमा हैदर आणि सचिन मीणा यांनी नेपाळमध्ये लग्न केलं. आता ती आपल्या चार मुलांसह भारतात राहात आहे. या अजब गजब प्रेमाची चर्चा होत असताना भारतात घुसखोरी किती सहज होते असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. पाकिस्तानी नागरिक असलेल्या सीमा यूपी एटीएसने ताब्यात घेतलं आहे. त्या चौकशीत तिने सचिनवर मनापासून प्रेम करत असल्याची कबुली दिली आहे. तसेच पाकिस्तानात परत जाणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. आतापर्यंत सीमा आणि सचिनच्या प्रेमाची चर्चा होत असताना त्यांच्या घरमालकाने धक्कादायक खुलासा केला आहे. सचिन पाकिस्तानी असलेल्या सीमाला मारहाण करायचा, असं त्यांनी सांगितलं आहे.
मीडिया रिपोर्टनुसार “घरमालकाचं म्हणणं आहे की, सीमा आणि सचिनमध्ये कधी कधी वाद व्हायचे. सीमा बीडी पिण्याचं व्यसन आहे. सचिन तिला तसं करण्यास मनाई करायचा. पण तिचं व्यसन काही केल्या सुटत नव्हतं. त्यानंतर सचिन तिला मारहाण करायचा.”
सीमाकडून पोलिसांनी सहा पासपोर्ट जप्त केले आहेत. पासपोर्टबाबत चौकशीत तिने सांगितलं की, “नेपाळचा विजा घेण्यासाठी सीमा गुलाम हैदर नावाने अर्ज केला होता. विजा न मिळाल्याने पुन्हा सीमा नावाने अर्ज केला. तसेच नेपाळच्या हॉटेलमध्ये सचिनने सीमा पत्नी असल्याचं सांगत रूम बूक केला होता.”
सचिन आणि सीमाच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सचिन आणि सीमाने नेपाळच्या काठमांडू येथील पशुपतिनाथ मंदिरात लग्न केल्याचा दावा केला आहे. पण या व्हायरल फोटोबाबत अद्याप पुष्टी करण्यात आलेली नाही. काही लोकं हे फोटो रबूपुरा येथील असल्याचा दावा करत आहेत.
पाकिस्तानच्या कराचीत राहणारी सीमा हैदर आणि रबूपुरा येथील सचिन मीणा यांची पबजी गेममुळे ओळख झाली होती. व्हिडीओ कॉलिंगमुळे दोघं एकमेकांजवळ आले. 13 मे रोजी नेपाळ मार्गे पाकिस्तानातून भारतात आली. तसेच चार मुलांसह रबूपुरा येथे पोहोचली. त्यानंतर आंबेडकरनगर येथे भाड्याच्या खोलीत सचिनसोबत राहू लागली.
पोलिसांना याबाबत कुणकुण लागल्यानंतर सीमा, सचिन हे दोघं चार मुलांसह फरार झाले. पोलिसांनी त्यांना हरयाणाच्या बल्लभगढ येथून पकडलं.