Seema Haider : एकविसाव्या वर्षी 4 मुलांची आई? सीमा हैदरकडे सापडलेल्या ‘या’ वस्तूंमुळे तिचा खोटेपणा उघड

सीमा हैदर प्रकरणात रोज नवनवीन खुलासे होत आहेत. पोलीस तिची सर्व माहिती गोळा करत आहेत. यादरम्यान नवी माहिती उघड झाल्याने पुन्हा देशात खळबळ माजली आहे.

Seema Haider : एकविसाव्या वर्षी 4 मुलांची आई? सीमा हैदरकडे सापडलेल्या 'या' वस्तूंमुळे तिचा खोटेपणा उघड
सीमा हैदरकडे सापडले दोन पासपोर्ट
Follow us
| Updated on: Jul 18, 2023 | 3:09 PM

नवी दिल्ली : देशभरात चर्चेत असलेल्या सीमा हैदर प्रकरणात आता नवीन धक्कादायक माहिती समोर येत आहे. आता सीमा हैदरचे राष्ट्रीय ओळखपत्र समोर आले आहे. कार्डवर लिहिलेली सीमाची जन्मतारीख सीमाच्या सांगितलेल्या वयाशी जुळत नाही. सीमा हैदर भारतात आल्यापासून अनेक चर्चांना उधाण आले आहे. पाकिस्ताननेच सीमाला गुप्तहेर म्हणून भारतात पाठवल्याच्या चर्चा होत असतानाच हे ओळखपत्र आढळल्याने देशाच्या चिंतेत वाढ झाली आहे. सीमा हैदर प्रकरणात रोज नवनवीन खुलासे होत आहेत. रोज उघड होणाऱ्या नव्या माहितीमुळे पोलिसांचीही डोकेदुखी वाढली आहे.

ओळखपत्रावरील जन्मतारीख आणि सीमाने सांगितलेली जन्मतारीख वेगळी

मिळालेल्या कार्डवर सीमाची जन्मतारीख 1 जानेवरी 2002 आहे. यानुसार 18 जुलै 2023 रोजी तिचे वय 21 वर्ष सहा महिलने 17 दिवस इतके आहे. मात्र सीमाने याआधी आपले वय 25 वर्षे सांगितले होते. हे राष्ट्रीय कार्ड सीमाला गेल्या वर्षीच इश्यू करण्यात आले होते. याची मुदत 2023 पर्यंतच आहे. कार्डवर सीमाचा फोटो, जन्मतारीख, तिच्या पतीचे नाव आणि राष्ट्रीयत्व लिहिले आहे. तसेच सीमाची उर्दूमध्ये सही आहे.

सीमाकडे दोन पासपोर्टही आढळले

पोलिसांना सीमाकडे दोन पासपोर्टही सापडले आहेत. पाकिस्तानातील खैरपूर येथील पत्त्यावर हे पासपोर्ट असून, या पासपोर्टवरही राष्ट्रीय ओळखपत्रावरील मजकूर आहे. उत्तर प्रदेशची एटीएस या प्रकरणात सखोल तपास करत आहे. याआधी मार्चमध्ये सीमा पाकिस्तानातून नेपाळमध्ये गेली होती. तेथे सचिन आणि सीमाने मंदिरात लग्न केले होते. यानंतर एक आठवडा हॉटेलमध्ये सोबत राहून सीमा पाकिस्तानात परतली, तर सचिन भारतात परतला. सीमा जरी आपल्या प्रेमासाठी भारतात आल्याचा दावा करत असली तरी सीमाकडे सापडलेले राष्ट्रीय ओळखपत्र आणि पासपोर्ट यामुळे भारताची चिंता वाढली आहे.

हे सुद्धा वाचा

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.