Arunachal Pradesh : अरुणाचल प्रदेशमधील हिमवादळात 7 जवान शहीद; दोन दिवसांपासून सुरू होतं रेस्क्यू ऑपरेशन
अरुणाचल प्रदेशातील कामेंग सेक्टरमध्ये हिमस्खलनात अडकलेल्या 7 भारतीय जवानांचा मृत्यू झाला आहे. भारतीय लष्काराकडून घटनेबाबत माहिती देण्यात आली आहे. हिमस्खलनाच्या ठिकाणाहून सात जवानांचे मृतदेह बाहेर काढण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.
इटानगर : अरुणाचल प्रदेशातील (Arunachal Pradesh) कामेंग सेक्टरमध्ये हिमस्खलनात (Avalanche) अडकलेल्या 7 भारतीय जवानांचा मृत्यू झाला आहे. भारतीय लष्काराकडून (Indian Army) घटनेबाबत माहिती देण्यात आली आहे. हिमस्खलनाच्या ठिकाणाहून सात जवानांचे मृतदेह बाहेर काढण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे. 6 फेब्रुवारीला कामेंग सेक्टरमधील अति उंच भागात हिमस्खरन झाले होते. यामध्ये काही भारतीय जवान अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत होती. त्यानंतर लष्कराकडून शोधमोहिमेला सुरुवात करण्यात आली होती. अखेर दोन दिवसांनी ही दुर्दैवी घटना समोर आली आहे. या घटनेत सात भारतीय जवानांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान अधिकृत सूत्रांकडून या घटनेबाबत सोमवारीच माहिती देण्यात आली होती. कामेंग सेक्टरमध्ये हिमस्खलन झाले असून, त्यात काही भारतीय जवान अडकले असण्याची शक्यता आहे. त्यांचा शोध घेतला जात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली होती.
तब्बल 34 वर्षांनंतर हिमवृष्टी
रविवारी अरुणाचल प्रदेशातील इटानगरजवळील दरिया पर्वतावर तब्बल 34 वर्षांनंतर आणि पश्चिम कामेंग जिल्ह्यातील रुपा शहरात दोन दशकानंतर बर्फवृष्टी झाली. तवांग, बोमडिला, मेचकुमलाच्या सीमावर्ती भागात देखील जोरदार बर्फवृष्टी झाली. यातील बोमडिला आणि तवांगमध्ये दरवर्षी बर्फ पडतो मात्र दरिया पर्वतावर 34 वर्षांनंतर प्रथमच बर्फवृष्टी झाली. दरिया पर्वतावर शेवटची बर्फवृष्टी ही 1988 मध्ये झाली होती. हिमवादळात अडकल्याने या जवानांचा मृत्यू झाला आहे. हिमवादळात काही जवान अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत होती. या पार्श्वभूमीवर रविवारपासूनच शोधमोहीम सुरू करण्यात आली होती. या दुर्दैवी घटनेत सात जवानांचा मृत्यू झाला आहे.
हिमाचल प्रदेशमध्ये परिस्थिती बिकट
दरम्यान दुसरीकडे हिमाचल प्रदेशमध्ये देखील मुसळधार बर्फवृष्टीमुळे परिस्थिती बिकट बनली आहे. मनाली-लेह महामार्गावर हिमस्खलन झाल्याची माहिती समोर येत आहे. या पार्श्वभूमीवर हिमाचल प्रदेशमध्ये आलेल्या पर्यटकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. समोर येत असलेल्या माहितीनुसार राज्यातील चार राष्ट्रीय महामार्ग आणि 731 हून अधिक रस्ते बंद करण्यात आले आहेत. रस्त्यावर साचलेल्या बर्फामुळे ट्राफिक जाम झाली आहे. उत्तराखंडमध्ये देखील बर्फवृष्टी झाली आहे.
Seven Army personnel who were struck by avalanche in high altitude area of Kameng Sector in Arunachal Pradesh on 6 Feb have been confirmed dead, their bodies retrieved from the avalanche site: Indian Army pic.twitter.com/2SZMML8GzC
— ANI (@ANI) February 8, 2022
संबंधित बातम्या
Hijab controversy: राज्यातील शाळा, महाविद्यालये तीन दिवस बंद; कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय
Karnataka Hijab| शैक्षणिक संस्थेत तिरंग्याच्या जागी भगवा फडकवला, जय श्रीरामचा नारा, कलम 144 लागू!