शबाना, नसरुद्दीन आणि जावेद अख्तर टुकडे टुकडे गँगचे सदस्य; मध्य प्रदेशच्या गृहमंत्र्यांकडून कलाकारांवर निशाणा; ही नीच मानसिकतेची लोकं

भाजपप्रणीत राज्यात अशा काही घटना घडल्या तर अभिनेता नसीरुद्दीन शाहला देशात राहण्याची भीती वाटते. मग ते घाबरून आपला एक पुरस्कार ते परत करतात, आणि अशा घटना भाजपप्रणीत राज्यात घडल्या तर हेच लोकं ओरडून सांगायला पुढं असतात असंही त्यांनी मत व्यक्त केले आहे.

शबाना, नसरुद्दीन आणि जावेद अख्तर टुकडे टुकडे गँगचे सदस्य; मध्य प्रदेशच्या गृहमंत्र्यांकडून कलाकारांवर निशाणा; ही नीच मानसिकतेची लोकं
Follow us
| Updated on: Sep 04, 2022 | 1:15 PM

नवी दिल्लीः मध्य प्रदेश सरकारमधील (Government of Madhya Pradesh)  गृहमंत्री नरोत्तम मिश्रा (Home Minister Narottam Mishra) यांनी नुकतेच एक धक्कादायक विधान केलं आहे. शबाना आझमी, नसीरुद्दीन शहा आणि गीतकार जावेद अख्तर यांच्यावर मिश्रा यांच्याकडून या कलाकारांवर टुकडे-टुकडे गँगच्या (Tukade Tukade Gang) स्लीपर सेलचे सदस्य असल्याची टीका करण्यात आली आहे. राजस्थानमधील उदयपूरमध्ये झालेल्या डझनभर हत्या आणि झारखंडमध्ये एका महिलेला पेटवून देण्यात आल्यानंतरही या घटनांविषयी या सेलिब्रेटींनी का आवाज उठवला नाही असा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. या घटनांबद्दल त्यांनी कोणतेही मत व्यक्त केले नसल्याने त्यांची नीच पातळीवरची मानसिकता दिसून येते असंही त्यांनी म्हटले. अभिनेत्री शबाना आझमी, नसीरुद्दीन शहा आणि जावेद अख्तर यांच्याविषयी टिपणी करताना गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी म्हटले आहे की, झारखंडमध्ये आमच्या मुलीला पेटवून देण्यात आले, त्यावेळी  मात्र या सेलिब्रिटिंनी अवाक्षरंही काढलं नाही, त्यावेळी त्यांनी मौन धारण केले होते.

भाजपशासित राज्यात अशा काही घटना घडल्या तर अभिनेता नसीरुद्दीन शहाला देशात राहण्याची भीती वाटते. मग ते घाबरून आपला एक पुरस्कार ते परत करतात, आणि अशा घटना भाजपप्रणीत राज्यात घडल्या तर हेच लोकं ओरडून सांगायला पुढं असतात असंही त्यांनी मत व्यक्त केले आहे.

यांना धर्मनिरपेक्ष का म्हणतात

या अशा घटना घडल्यावरही सेलिब्रेटींकडून कोणत्याही भावना व्यक्त केल्या जात नाहीत, त्यावेळी त्यांची नीच मानसिकता प्रकर्षाने दिसून येते अशी टीकाही त्यांनी यावेळी केली आहे. त्यामुळे त्यांना सभ्य आणि धर्मनिरपेक्ष का म्हटले जाते यावर विचार होणं गरजेचं आहे अशा शब्दात त्यांनी त्यांच्यावर टीका केली आहे.

टुकड़े टुकड़े गँगच्या स्लीपर सेलचे सदस्य

या घटनांविषया बोलताना नरोत्तम मिश्रा यांनी सांगितले की, शबाना आझमी, जावेद अख्तर आणि नसीरुद्दीन शहांसारखी लोकं ही टुकड़े टुकड़े गँगच्या स्लीपर सेलचे सदस्य असल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. उदयपूरमध्ये झालेल्या कन्हैया लाल यांच्या हत्येविषयी बोलताना या घटनांविषयी त्यांनी कोणतेही विधान केले नसल्याचेही मिश्रा यांनी सांगितले.

सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.