Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“ज्यांची देशात सत्ता, त्यांना मणिपूरसारखं राज्य सांभाळता येत नाही”; शरद पवार यांनी कर्नाटकातून केंद्रावर साधला निशाणा

आपल्या राजीनाम्याविषयी आणि सध्याच्या बदलत्या राजकारणाच्या परिस्थितीवर बोलताना त्यांनी सांगितले की, राजकारणात कुठे थांबायचं कळलं नाही की घात होतो असं मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.

ज्यांची देशात सत्ता, त्यांना मणिपूरसारखं राज्य सांभाळता येत नाही; शरद पवार यांनी कर्नाटकातून केंद्रावर साधला निशाणा
Follow us
| Updated on: May 08, 2023 | 6:43 PM

निपाणी : महाराष्ट्राच्या शेजारील राज्य आणि सातत्याने सीमाप्रश्नावरून महाराष्ट्र-कर्नाटक वाद सुरु असले तरी आता कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीमुळे महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघाले आहे. राज्यातील अनेक पक्षाचे नेते कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीमुळे बेळगाव दौऱ्यावरून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. कर्नाटकच्या निवडणुकीमुळे आणि राष्ट्रवादीने कर्नाटक विधासभेत उमेदवार दिले असल्यामुळे आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बेळगाव जिल्ह्यातील निपाणी दौरा केला.

यावेळी त्यांनी केंद्रासह देशातील वेगवेगळ्या राज्यात असणाऱ्या भाजपच्या सरकारमुळे इतर पक्ष कशा प्रकारे अडचणीत आले आहेत त्याची त्यांनी उदाहरणासह माहिती दिली. यावेळी त्यांनी भाजपकडून पैशांचे राजकारण केले जात असल्याची टीका केली आहे.

निपाणीतील सभेत बोलताना शरद पवार यांनी केंद्रातील भाजपसह राज्य सरकारवरही त्यांनी सडकून टीका केली आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि विकासाभूमिक काम करण्यासाठी आम्ही कर्नाटकमधील काही उमेदवार द्यायचं ठरवलं आहे त्यामुळे कर्नाटकतही राष्ट्रवादी पक्षाकडून विधानसभेसाठी उमेदवार जाहीर केल

शरद पवार यांनी केंद्रावर टीका करताना मणिपूरमध्ये चाललेल्या सामाजिक आरक्षणावरून वादाचेही त्यांनी उदाहरण दिले आहे. ज्या मणिपूर मध्ये 4 दिवसात 54 लोकांचा बळी गेला आहे.

त्यालाही भाजप सरकारच जबाबदार आहे. कारण ज्यांची देशात सत्ता आहे त्यांना मणिपूरसारखं राज्य सांभाळता येत नाही. त्यामुळे त्यांनी अशी छोटी छोटी राज्य त्यांनी आधी सांभाळावी अशा शब्दात त्यांनी त्यांच्यावर घणाघात केला आहे.

महाराष्ट्रमध्ये काही लोकं फोडण्यात आली आणि सरकार बनवण्यात आले. कर्नाटकमध्येही भाजपकडून तिच रणनिती वापरण्यात आली.

लोकं फोडून सरकार बनवण्याची कामं भाजपकडून केली जात आहेत, पैशातून माणसं फोडायची आणि त्यातून सरकार बनवायची हेच राजकारण सध्या भाजपकडून केले जात असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी त्यांच्यावर केला आहे.

शरद पवार यांनी पैशाचा वापर करून राजकारण करणाऱ्यांना खड्यासारखे बाजूला करण्याची वेळ आली आहे असा इशाराही त्यांनी भाजपला दिला आहे.

कर्नाटकात 40 टक्क्यांची सुरुवात करायची आणि ती हळूहळू देशात वापरायची आहे हीच भाजपची मानसिकता असल्याचे सांगत त्यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे.

या देशात शेतीचे अनेक प्रश्न आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हिताचे राजकारण करणे गरजेच आहे. शेतकऱ्याला सन्मान मिळेल अशा तरतुदी करण्याची गरज असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी आपल्या राजीनाम्याविषयी आणि सध्याच्या बदलत्या राजकारणाच्या परिस्थितीवर बोलताना त्यांनी सांगितले की, राजकारणात कुठे थांबायचं कळलं नाही की घात होतो असं मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.

बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट
बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट.
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच.
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले.
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम.
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत.
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर.
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले.
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक.
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?.
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल.