Sharad Pawar on Raj Thackeray: कुणाला धोका असेल आणि सुरक्षा पुरवली जात असेल तर हरकत नाही: शरद पवार

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) यांना धोका असल्याने त्यांना सुरक्षा देण्यासाठी केंद्र सरकारने हालचाली सुरू केल्या आहेत. त्यावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (sharad pawar) यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

Sharad Pawar on Raj Thackeray:  कुणाला धोका असेल आणि सुरक्षा पुरवली जात असेल तर हरकत नाही: शरद पवार
कुणाला धोका असेल आणि सुरक्षा पुरवली जात असेल तर हरकत नाही: शरद पवारImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Apr 18, 2022 | 7:03 PM

बंगळुरू: मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) यांना धोका असल्याने त्यांना सुरक्षा देण्यासाठी केंद्र सरकारने हालचाली सुरू केल्या आहेत. त्यावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (sharad pawar) यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. कुणाला धोका असेल आणि त्यामुळे सुरक्षा पुरवली जात असेल तर काही हरकत नाही. त्यात काही चुकीचं नाही. हा त्यांचा अधिकार आहे. त्यांच्या पक्षाचा कार्यक्रम आखला जातोय. त्यामुळे काही निर्णय घेतले असतील, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. दरम्यान, राज ठाकरे यांनी भोंग्याचा मुद्दा हाती घेतला आहे. मशिदीवरील भोंगे हटवले नाही तर जशास तसे उत्तर देऊ, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे. त्यामुळे त्यांना पॉप्युलर फ्रन्ट ऑफ इंडियाने ‘हमको छेडेंगे तो हम छोडेंगे नहीं’ असा इशारा दिला आहे. राज यांना मिळालेल्या या धमकीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने (central government) त्यांना सुरक्षा देण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आज कर्नाटकात आहेत. यावेळी त्यांचं राष्ट्रवादीकडून जंगी स्वागत करण्यात आलं. त्यानंतर त्यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आपल्या दौऱ्याच्या प्रयोजनाची माहितीही दिली. कर्नाटकात आम्ही पक्षाची बांधणी करत आहोत. जिथे आमची शक्ती कमी आहे अशा राज्यांपैकी कर्नाटक आहे. इथे थोडसं जास्त लक्ष द्यावे म्हणून सुरुवात केली आहे. वर्षभर मी किंवा माझे सहकारी कर्नाटकात येणार असून त्यावर काम करू. देशात सांप्रदाय़िक स्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न मोदी सरकारचा होत आहे. त्यामुळे आम्ही देशात समभाव तयार करणं आणि लोकांना जागृत करण्याचं काम करत आहोत. महागाई, डिझेल इंधन दरवाढीवर लोकांची जागृती करण्याचा आमचा प्रयत्न आहे, असं पवारांनी सांगितलं.

बैठक घेण्याचं अजून ठरलेलं नाही

विरोधी पक्षाची लवकरच बैठक होणार आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. विरोधी पक्षांची बैठक घ्यावी अशी अनेकांची इच्छा आहे. ममता बॅनर्जी यांनी लेखी कळवलं. उद्धव ठाकरे आणि मी पुढाकार घ्यावा असं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे विरोधी पक्षनेत्यांशी बोलून आम्ही निर्णय घेऊ. बैठक घेण्याचं अजून ठरलेलं नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं. विरोधी पक्षांचा नेता कोण? याबाबत आम्ही चर्चा केली नाही. आम्ही आधी ठरवलं एकत्र बसायचं, चांगलं काम करायचं, मग नेता ठरवू, असं त्यांनी स्पष्ट केलं.

भाजप विरोधी पक्षांना टार्गेट केलं जातंय

दिल्लीत काही तनाव आहे. दिल्लीत कायदा सुव्यवस्था केंद्र सरकारची जबाबदारी आहे. अनेक राज्यात काही केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करुन भाजप विरोधी पक्षांना टार्गेट केलं जातंय, असं त्यांनी सांगितलं. महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी भोंग्यांबाबत काय निर्णय घेतला माहीत नाही. पण बिना परवानगी भोंगे लावू नका असा निर्णय त्यांनी घेतला आहे, असंही त्यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या:

Raj Thackeray : भोंग्यांच्या मुद्द्यांवरुन राज ठाकरेंना धमकी? केंद्र सरकार सुरक्षा पुरवण्याची शक्यता

Shivsena : हिंदू मतं गमावण्याची भीती? सोनिया, पवारांनी मोदींना लिहिलेल्या पत्रावर शिवसेनेची सही नाही, राऊतांनी कारण सांगितलं

Jitendra Awhad on Raj Thackeray: राज ठाकरे अयोध्येत जाऊदेत किंवा अमृतसरला, आम्हाला काय करायचंय?; आव्हाडांनी फटकारले

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.