नवी दिल्ली | भारतातील सर्वात मोठा शेअर बाजार NSE असून यात दररोज 49 कोटींचे आर्थिक व्यवहार होतात. याच एनएसई (NSE) चा कारभार एका अज्ञात शक्तीच्या इशाऱ्यावर चालतो, हे ऐकून भारतातल्या कोट्यवधी गुंतवणूकदारांची पायाखालची जमीनच घसरू शकते. कारण याच शेअर बाजाराच्या माजी सीईओ चित्रा रामकृष्ण (Chitra Ramkrushna) यांनी अशा अज्ञात व्यक्तीला शेअर बाजाराची अत्यंत गोपनीय माहिती पुरवल्याचे त्यांनीच म्हटले आहे. अत्यंत गंभीर बाब म्हणजे ही अज्ञात व्यक्ती म्हणजे कुणी माणूस नसून ती हिमालयातील एक अदृश्य शक्ती असल्याचं चित्रा यांनी म्हटलं आहे. याच शक्तीसोबत ईमेल द्वारे चित्रा संवाद साधत होत्या आणि त्यांनी दिलेल्या इशाऱ्यानुसार निर्णय घेतले जात होते. विशेष म्हणजे चित्रा यांनी अनियमितता करत आनंद सुब्रमण्यम (Anand Subramanyam) या व्यक्तीला एनएसईमध्ये नियुक्ती दिली आणि या व्यक्तीला प्रचंड सुविधा आणि भलं मोठं पॅकेजही देण्यात आलं होतं. या सर्व प्रकरणाची चौकशी करण्यासाठी चित्रा रामकृष्ण यांच्यावर आयकरने गुरुवारी छापेमारी केली. एनएसई संबंधी गुप्त माहिती अज्ञातांना पुरवल्याचा आरोप आहे. आर्थिक लाभासाठी त्यांनी हे कृत्य केल्याचा आरोप केला जात आहे. मागील काही दिवसांपूर्वी SEBI ने त्यांना 3 कोटी रुपयांचा दंड ठोठावला होता. मुख्य धोरणात्मक अधिकारी म्हणून आनंद सुब्रमण्यम यांची नियुक्ती प्रक्रियेत अनियमितता केल्याप्रकरणी ही शिक्षा सुनावण्यात आली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चित्रा रामकृष्णा यांनी या प्रकरणी स्पष्टीकरण देताना म्हटले आहे की, हे सगळं त्यांनी अज्ञात साधूच्या म्हणण्यानुसार केले. ते हिमालयात राहतात. दरम्यान, ग्रुप ऑपरेटिंग ऑफिसरस/ चीफ स्ट्रॅटर्जी ऑफिसर आनंद सुब्रमण्यम यांच्यावरही आयकरने धाड टाकली आहे.
Income tax raids former boss of NSE Chitra Ramkrishna for tax evasion
Read @ANI Story | https://t.co/kycZpIMCax pic.twitter.com/UkKmyKzXjA
— ANI Digital (@ani_digital) February 17, 2022
भारतातील सर्वात मोठा शेअर बाजार NSE असून यात दररोज 49 कोटींचे आर्थिक व्यवहार होतात. NSE चा एका दिवसाचा टर्नओव्हर 64 हजार कोटी रुपये आहे. दररोज मोठ्या संख्येने गुंतवणूकदार या प्लॅटफॉर्मवर ट्रेडिंग करतात. त्यामुळे चित्रा रामकृष्णा यांच्या वक्तव्यानंतर एवढा मोठा शेअर बाजार फक्त एका अज्ञात साधूच्या इशाराऱ्यावर चालत होता, याची कल्पना करून अनेकांना धक्का बसला होता.
या प्रकरणात तीन मुख्य व्यक्ती आहेत.
१- सर्वात प्रमुख एनएसईच्या माजी सीईओ चित्रा रामकृष्णा
२- मनमर्जीनुसार नोकरी करणारा आनंद सुब्रमण्यम
३- अज्ञात साधू, जे तथाकथितानुसार, हिमालायतील सिद्ध पुरुष आहेत.
चित्रा या 2013 पासून 2016 दरम्यान एनएसईच्या सीईओ होत्या. या काळात शेअर बाजारातील सगळे लहान-मोठे निर्णय अज्ञात साधूच्या इशाऱ्यानुसार घेतले जात होते.
या प्रकरणातले अज्ञात साधू कोण, याविषयी अनेकजण तर्क वितर्क लावत आहेत. काहींच्या मते, सुब्रमण्यम हेच अज्ञात साधू आहेत. ते खूप वेगळ्या प्रकारे चित्रा यांच्यावर नियंत्रण ठेवत होते. एनएसईने सेबीकडे केलेल्या याचिकेत, मानवी स्वभावात तज्ज्ञांचे मत यात दिले आहे. मात्र सेबीने या आरोपांत तथ्य असल्याचे नाकारले आहे. काही वृत्तांनुसार, चित्रा यांनी सेबीला साधूविषयी माहिती देताना म्हटले की, साधू हा एखादा माणूस नाही. त्यांच्या इच्छेनुसार, ते कोणतेही रुप धारण करतात. ती एक अज्ञात शक्ती असून हिमालयात वावरते. चित्रा rigyajursama@outlook.com वर ईमेल पाठवून त्यांच्याशी चर्चा करत होती. या ईमेलवर एनएसईची संवेदनशील माहितीदेखील पाठवण्यात आली होती. या माहितीत पाच वर्षांचा फायनान्शिअल प्रोजेक्शन, डिव्हिडंट पे-आउट रेशो, बिझनेस प्लॅन, एनएसई बोर्डाच्या मिटींगचा अजेंडा, कर्मचाऱ्यांच्या कामांचे मूल्यांकन, अप्रेझल आदी माहितीचा समावेश होता. योगी यांनीच चित्रा यांना आनंद यांना नोकरीला ठेवण्यास सांगितले होते आणि एवढा मोठा पगार देण्यात आला होता. साधूच्याच एका मेलमध्ये असे म्हटले होते की, या धर्तीवर माणसाचे शरीर घेऊन जन्मण्याची संधी मिळाली असती तर त्यासाठी आनंद यांचे शरीर सर्वात चांगले असते…
2013 मध्ये एनएसईच्या तत्कालीन सीईओ आणि एमडी चित्रा रामकृष्णा यांनी आनंद सुब्रमण्यम यांना चीफ सेक्रेटरी ऑफिसर (COO) पदावर नियुक्ती दिली. एनएसईमध्ये यापूर्वी असे कोणतेही पद नव्हते. आनंद सुब्रमण्यम एनएसईमध्ये येण्यापूर्वी बाल्मर लॉरी (Balmer Lawrie) मध्ये काम करत होते. त्यांचा पगार 15 लाख रुपये होता. एनएसईमध्ये त्यांना 9 पटींनी जास्त म्हणजेच 1.38 कोटी रुपयांचे पॅकेज देण्यात आले. त्यानंतर त्यांना सलग प्रमोशन देण्यात आले. ते ग्रुप ऑपरेटिंग ऑफिसर बनले. चित्रा यांनी आनंद यांना 5 दिवस ऑफिसात न येण्याची सूटही दिली होती. त्यांना फक्त 3 दिवस ऑफिसमध्ये यावे लागत होते. चित्रा यांनी हे सर्व निर्णय अज्ञात साधूच्या सांगण्यावरून घेण्यात आल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे. ईमेलच्या माध्यमातूनच त्या साधूच्या संपर्कात होत्या.
इतर बातम्या-