लढत झाली तरी ती मैत्रीपूर्णच असणार; शशी थरुरांनी हा फोटो केला शेअर…

काँग्रेसचे दिग्गज नेते शशी थरूर यांनी सोशल मीडियावरुन एक फोटो शेअर केला आहे. त्यामुळे या फोटोची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.

लढत झाली तरी ती मैत्रीपूर्णच असणार; शशी थरुरांनी हा फोटो केला शेअर...
Follow us
| Updated on: Sep 29, 2022 | 4:54 PM

नवी दिल्लीः देशातील सर्वात जुना पक्ष म्हणून काँग्रेस (Congress) ओळखले जात असल्याने त्या पक्षाच्या निवडणुकीत आता रोज नवे नवे ट्विस्ट येत आहेत. तर आता गहलोत निवडणुकीच्या (Election 2022) लढाईतून बाजूला झाले असल्याने ही निवडणूक आणखी रंगतदार होणार असल्याचेच दिसत आहे. तर दुसरीकडे मात्र काँग्रेसच्या नेत्यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत जो विजयी होईल, तो पक्षाचाच विजय होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

काँग्रेसचे दिग्गज नेते शशी थरूर यांनी सोशल मीडिया अकाउंटवर एक फोटो शेअर केला आहे. त्या फोटोमध्ये दिग्विजय सिंह आणि शशी थरुर अगदी एकमेकांसोबत दिसून येत आहेत.

खरे तर काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदासाठी शशी थरूर आणि दिग्विजय सिंह यांच्यात लढत होत आहे. राजस्थानमधील राजकीय गदारोळानंतर मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी गुरुवारी आपण पक्षाच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

त्यामुळे आता या दोन नेत्यांच्या दाव्याला अधिक बळ मिळाले आहे. पंजाबमधील आनंदपूर साहिबचे खासदार मनीष तिवारी यांनीही अध्यक्षपदासाठी दावा करणार होते, मात्र त्यांच्याकडून अद्याप कोणतीही स्पष्ट भूमिका आलेली दिसून येत नाही.

शशी थरूर यांनी जे ट्विट केले आहे त्यामध्ये त्यांनी लिहिले की, ‘दिग्विजय सिंह यांची भेट घेतली, मी आमच्या पक्षाच्या अध्यक्षपदासाठी त्यांच्या उमेदवारीचेही मी स्वागत करतो.

‘ या पोस्टमध्ये त्यांनी स्पष्ट केले आहे की, दोघांमध्ये स्पर्धात्मक लढाई नाही आणि तशी भावनाही नाही असंच त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यांनी लिहिले की, ‘आम्ही ही निवडणूक प्रतिस्पर्ध्यांसारखी लढणार नाही, तर आमच्यात मैत्रीपूर्ण लढत होणार असून ही लढत आम्ही जिंकूच असंही त्यांनी सांगितले आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.