Shatrughan Sinha : ‘बिहारी बाबू’ शत्रुघ्न सिन्हांचा बंगालमध्ये खेला होबे! ‘शॉटगन’ने केले भाजपला गप्प!

चार राज्यांतील 5 जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत चार जागांचे निकाल जाहीर झाले आहेत. पश्चिम बंगालमधील आसनसोल लोकसभा मतदारसंघात टीएमसीचे शत्रुघ्न सिन्हा विजयी झाले आहेत

Shatrughan Sinha : 'बिहारी बाबू' शत्रुघ्न सिन्हांचा बंगालमध्ये खेला होबे! 'शॉटगन'ने केले भाजपला गप्प!
शत्रुघ्न सिन्हाImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 16, 2022 | 4:12 PM

By Election Results 2022 : 1 लोकसभा आणि 4 विधानसभा जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीचे निकाल आज जाहीर होत आहेत. बंगालमध्ये पोटनिवडणुकीत तृणमूल काँग्रेसने इतिहास रचला. आसनसोलमधून शत्रुघ्न सिन्हा सुमारे २ लाख मतांनी विजयी झाले आहेत. या जागेवरून टीएमसी कधीही जिंकली नव्हती, त्यामुळे या विजयाला खूप महत्त्व आहे. त्याचबरोबर माजी केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो हे बालीगंगे विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीत विजयी झाले आहेत. दुसरीकडे, शत्रुघ्न सिन्हा यांनी आसनसोल लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार अग्निमित्रा पॉल यांचा एक लाखांहून अधिक मतांनी पराभव केला आहे. तर माजी केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो यांनी बालीगंगे विधानसभा मतदारसंघांतून भाजपच्या उमेदवार काया घोष यांचा पराभव केला. त्याचबरोबर बिहारच्या बोचाहान विधानसभा मतदारसंघातून आरजेडीचे अमर पासवान विजयी झाले आहेत.

हा लोकांचा आदेश

विजयाबद्दल शत्रुघ्न सिन्हा म्हणाले की, माझ्या विजयाचे श्रेय हे ममताजींना आणि येथील जनतेला, तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना जाते. यासोबतच काही प्रमाणात पक्षाचा कार्यकर्ता म्हणून मीही आव्हान स्वीकारून ही जागा लढवली. ममता बॅनर्जी यांच्या सूचना आणि आसनसोलच्या जनतेचा आदेश लक्षात घेऊन मी येथे आलो आहे. इथल्या लोकांकडून मिळालेला आदर, इथल्या लोकांच्या प्रेमापुढे मी नतमस्तक आहे.

अद्याप प्रमाणपत्र मिळालेलं नाही, नंतर बोलू

आसनसोलच्या विजयाने तृणमूल काँग्रेससह शत्रुघ्न सिन्हाही आनंदात आहेत. यावेळी त्यांनी, मला अजून आयोगाचे प्रमाणपत्र मिळालेले नाही, ते देऊ द्या, त्यानंतर मी या विजयावर बोलेन असं म्हटलं आहे. तसेच हा ऐतिहासिक विजय असल्याचे ते म्हणाले. कारण पहिल्यांदाच तृणमूल काँग्रेसने ही जागा जिंकली आहे आणि ममता जी या विजयाच्या पात्र आहेत. कारण माहीत नाही, पण आमच्या पक्षाने ही जागा आधीच जिंकायला हवी होती. ही सीट ममताजींच्या झोळीत आधीच यायला हवी होती. असो, पण आज हा मार्ग खुला झाला आहे. आज असे दिसते की आपण योग्य मार्गावर आलो आहोत. आणि योग्य वेळी ममताजींच्या नेतृत्वाखाली आपण हा विजय मिळवला आहे. आता योग्य वाटेवर चालत आपण योग्य दिशेने जाऊ.

काँग्रेस सोडून तृणमूल काँग्रेसमध्ये सामील

प. बंगालमधील या पोटनिवडणूकीच्या आधीच शत्रुघ्न सिन्हा यांनी काँग्रेस पक्ष सोडला होता. तर त्यांना तृणमूल काँग्रेसमध्ये सामील अशी ऑफर ममता बॅनर्जी यांच्या पक्षाकडून गेली होती. त्याप्रमाणे त्यांनी पक्षात प्रवेश केला. त्यावेळी त्यांनी, ममता बॅनर्जी यांच्या पक्षात सामील होणे ही खूप सन्मानाची बाब असल्याचे म्हटले होते. तसेच ही आपल्यासाठी मोठी संधी आहे. ममतांच्या पक्षाला माझी गरज होती. मी तृणमूलमध्ये राहून आसनसोल लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी असे दिदींनी म्हटले होते. त्यानंतर TMC ने आसनसोलमधून लोकसभा पोटनिवडणुकीत त्यांना उमेदवारी दिली.

20 मार्चपासून प्रचाराला सुरुवात

आसनसोल लोकसभा मतदारसंघापूर्वी माजी केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो हे खासदार होते. मात्र त्यांनी राजीनामा दिल्यामुळे येथे पोटनिवडणूक घ्यावी लागली आहे. आसनसोल लोकसभा जागेसाठी 12 एप्रिल रोजी पोटनिवडणूक झाली. तर 16 एप्रिल रोजी मतमोजणी. शत्रुघ्न सिन्हा यांनी 20 मार्चपासून प्रचाराला सुरुवात केली.

गायक-राजकारणी बनलेले बाबुल सुप्रियो 2014 आणि 2019 मध्ये सलग दोन वेळा आसनसोल लोकसभा मतदारसंघातून खासदार राहिले आहेत. दोन्ही वेळा ते भाजपचे उमेदवार म्हणून येथून विजयी झाले होते. गेल्या वर्षी सुप्रियो यांनी भाजपचा त्याग करून टीएमसीमध्ये प्रवेश केला होता. आसनसोलच्या जागेबद्दल बोलायचे झाले तर, आतापर्यंत येथे कोणताही टीएमसी नेता जिंकलेला नाही. येथे विजयी पताका फडकवण्यासाठी ममता बॅनर्जी यांनी ‘बिहारी बाबू’ या नावाने प्रसिद्ध शत्रुघ्न सिन्हा यांच्यावर पैज खेळली आहे. बाबुल सुप्रियो यांना टीएमसीने बालीगंगे विधानसभेच्या जागेवरून उमेदवारी दिली आहे, जिथे आमदार सुब्रत मुखर्जी यांच्या निधनानंतर पोटनिवडणूक होणार आहे.

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे ट्विट

बंगालमध्ये पोटनिवडणुकीत तृणमूल काँग्रेसने इतिहास रचण्याकडे वाटचाल करत असतानाच, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी तृणमूलच्या विजयाबद्दल ट्विट केले. तसेच त्यांनी यात, जनतेचे आभार मानले आणि कार्यकर्त्यांना प्रोत्साहन दिले.

इतर बातम्या :

Aurangabad PHOTO : औरंगाबादेत मनसेच्या वतीने हनुमान चालीसाचे सामुहिक वाचन, पुस्तिकाही वाटप

Kolhapur North By Election 2022 : कोल्हापूर उत्तरला ‘पंढरपूर’ का करता आलं नाही चंद्रकांत पाटील, फडणवीसांना? भाजप उमेदवाराच्या पराभवाची पाच कारणं

Kirit Somaiya : ‘सरकारच्या घोटाळ्याची लंका जाळणारच’, हनुमान जयंती दिनी सोमय्यांचा दावा, मुख्यमंत्र्यांवर निशाणा

मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?.
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?.
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी.
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?.
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला..
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला...
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र.
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं.
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?.