आमदार खरेदी करण्याच पाप तुमचंच, प्रियंका गांधींनी नरेंद्र मोदींवर साधला निशाणा…
प्रियंका गांधी यांनी पंतप्रधानांचे नाव न घेता भाजपचे बडे नेते म्हणत त्यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली.
नवी दिल्लीः काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. स्वातंत्र्यानंतर कोणी स्थिर सरकारे दिली आणि आमदार विकत घेऊन कोणी सरकार पाडले हे सगळ्यांनाच माहिती आहे असंही त्या म्हणाल्या. हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या सभेत त्यांनी जनतेला हुशारीने मतदान करण्याचे आवाहन केले. यावेळी त्यांनी मतदारांना सांगितले की, कोणाच्याही बोलण्याला बळी पडू नका असं आवाहनही त्यांनी केलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बुधवारी घेतलेल्या सभेत त्यांनी काँग्रेसवर टीका करताना काँग्रेसने स्थिर सरकार दिले नाही अशी टीका त्यांनी केली होती.
प्रियंका गांधी यांनी पंतप्रधानांचे नाव न घेता भाजपचे बडे नेते म्हणत त्यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. काँग्रेस तुम्हाला स्थिर सरकार देऊ शकत नाही अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती.
त्यानंतर प्रियंका गांधी म्हणाल्या की, स्वातंत्र्यानंतर स्थिर सरकारे कोणी दिली आणि अस्थिरता कोणी निर्माण केली? पैसे देऊन आमदार विकत घेऊन सरकार कोणी पाडले असा प्रतिसवालही त्यांनी उपस्थित केला.
पंतप्रधानांच्या आणखी एका विधानाचा संदर्भ देत त्यांनी सांगितले की, तुम्हाला सांगितले जाते की तुम्ही औषध बदलले तर रुग्ण बरा होणार नाही. हा सगळा मुर्खपणा असल्याची जोरदार टीकाही त्यांनी केली.
प्रियंका गांधी यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना म्हणाल्या की, मी तुम्हाला तुमची परिस्थिती आणि तुमचा अनुभव लक्षात घेऊन मतदान करण्याचा आग्रह करते आहे.
आज हिमाचल प्रदेशावर 70 हजार कोटी रुपयांचे कर्ज आहे. तर आज 15 लाख तरुण बेरोजगार आहेत. तसेच हिमाचल प्रदेशात आज 63 हजार पदे रिक्त असल्याचेही त्यांनी सांगितले. अशी परिस्थिती असतानाही भाजप सरकारने मात्र यापैकी कोणतीच कामं केली नाहीत.
मात्र राज्यात काँग्रेसचे सरकार आल्यानंतर जुनी पेन्शन योजना (ओपीएस) पूर्ववत करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत घेतला जाईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.