ठाकरे गटावर चिन्ह चोरल्याचा समता गटाचा आरोप, मशालीमुळे राजकारण तापलं

उद्धव ठाकरे म्हणतात की शिंदेंनी धनुष्यबाण चोरलं आणि आता समता पार्टी म्हणतेय की, ठाकरे गटानं आमचं मशाल चिन्हं चोरलं.

ठाकरे गटावर चिन्ह चोरल्याचा समता गटाचा आरोप, मशालीमुळे राजकारण तापलं
Follow us
| Updated on: Feb 23, 2023 | 11:51 PM

नवी दिल्ली | धनुष्यबाण हातून निसटल्यानंतर मशाल चिन्हंही धोक्यात येतंय की काय, असं चित्र निर्माण झालंय. कारण समता पार्टीनंही मशाल चिन्हावर दावा करत सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केलीय.उद्धव ठाकरे म्हणतात की शिंदेंनी धनुष्यबाण चोरलं आणि आता समता पार्टी म्हणतेय की, ठाकरे गटानं आमचं मशाल चिन्हं चोरलं. मशाल चिन्हावर आधीच समता पार्टीनं दावा केला होता आणि आता समता पार्टीनं रितसर सुप्रीम कोर्टात धाव घेत याचिका दाखल केलीय.

निवडणूक आयोगानं मशाल चिन्हं आम्हालाच दिलं होतं. पण नंतर मतांच्या टक्केवारीत मागे पडल्यानं चिन्हं गोठवलं. मात्र मशाल आम्हालाच द्यावं अशी मागणी समता पार्टीची आहे.

शिवसेनेत फूट पडल्यानंतर ठाकरेंना मशाल तर शिंदेंना ढाल तलवार हे चिन्हं मिळालं होतं. मशाल चिन्हावर ठाकरे गटानं अंधेरीची पोटनिवडणूक जिंकलीही. पण आता समता पार्टीनं जुना दाखला देत, मशाल चिन्हावर दावा केलाय.

नुकतंच निवडणूक आयोगानं शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्हं शिंदेंना दिलंय. त्यामुळं शिंदेंच्या बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाची ओळख पुन्हा शिवसेना अशी झाली आणि उद्धव ठाकरेंनी शिवसेना तसंच धनुष्यबाणही गमावलं. पण आता समता पार्टीच्या याचिकेमुळं मशाल चिन्हंही धोक्यात येऊ शकते.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.