हा तर भिजलेला फटका, तुम्ही खेळ का करताय? थेट 50 टक्क्यांची मर्यादा उठवा, राऊतांचा हल्लाबोल सुरूच
127व्या संविधान दुरुस्ती विधेयकावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. हे विधेयक म्हणजे भिजलेला फटाका आहे. (sanjay raut)
नवी दिल्ली: 127व्या संविधान दुरुस्ती विधेयकावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. हे विधेयक म्हणजे भिजलेला फटाका आहे. तुम्ही आरक्षणाचा खेळ का करताय? थेट 50 टक्के आरक्षणाची मर्यादा उठवून राज्यांना अधिकार द्या ना, अशा शब्दात संजय राऊत यांनी केंद्राला फटकारले आहे. (shiv sena leader sanjay raut slams bjp over 127th amendment bill)
संजय राऊत यांनी टीव्ही9 मराठीशी बोलताना हा हल्लाबोल केला आहे. आरक्षण विधेयका आज राज्यसभेत मांडलं जाईल. त्यावर चर्चा होईल. पेगासस वगैरे आज बंद आहे. हे विधेयक राज्यसभेत मंजूर झालं तरी जोपर्यंत 50 टक्के आरक्षणाची मर्यादा उठवली जात नाही, तोपर्यंत या विधेयकाचा काहीच फायदा होणार नाही, असं राऊत म्हणाले.
लोकसभेत घश्याची नळी गरम केली
काल आमच्या खासदारांनी आणि इतर सदस्यांनी सुद्धा लोकसभेत आपल्या घश्याची नळी गरम केली. पण काही उपयोग झाला नाही. कारण हा भिजलेला फटाका आहे. पण यांना कोण सांगणार? असा सवाल करतानाच 50 टक्क्याची मर्यादा उठवणार आहात की नाही त्या साठी काय करणार आहात? राज्याच्या कोर्टात बॉल टाकून उगाच खेळवत बसू नका. हा राजकारणाचा विषय नाहीये. तुम्ही खेळ करताय का? तुम्ही थेट मर्यादा का उठवत नाही? अपवादात्मक केस वगैरे काही नसतं, असंही त्यांनी सांगितलं.
हा खेळ कुणी सुरू केला?
यावेळी त्यांनी भाजप खासदार प्रीतम मुंडे यांच्या भाषणावरही प्रतिक्रिया व्यक्त केली. हा सगळा विषय ओबीसींचाच आहे आणि हा खेळ सुरू कोणी केला हे प्रीतम मुंडेंना माहीत असायला पाहिजे. त्यांनी फार राजकारण न करता गांभीर्याने पाहिले पाहिजे, असं ते म्हणाले.
मुख्यमंत्र्यांचेही फोटो लावा
कोरोनाची लस दिल्यानंतर देण्यात येणाऱ्या सर्टिफिकेटवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो असतो. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. लसीकरण हा राष्ट्रीय कार्यक्रम आहे आणि त्यामुळे पंतप्रधान, राष्ट्रपती यांचे फोटो लावण्याची एक परंपरा आहे. महाराष्ट्रात सुद्धा मुख्यमंत्र्यांचे फोटो लावले जातात. हा राष्ट्रीय कार्यक्रम असल्यामुळे त्या त्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे पण फोटो लावले जावे, अशी मागणी त्यांनी केली. (shiv sena leader sanjay raut slams bjp over 127th amendment bill)
MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 3 PM | 10 August 2021https://t.co/jE9FwqCuvt#sanjayraut | #BJP | #shivsena
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 10, 2021
संबंधित बातम्या:
127वं संविधान संशोधन विधेयक लोकसभेत मंजूर, 385 खासदारांचं समर्थन; आता जबाबदारी राज्यांवर!
(shiv sena leader sanjay raut slams bjp over 127th amendment bill)