मदत सोडून दिल्लीला मुजरा…; व्यंगचित्राच्या माध्यमातून शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंच्या निशाणा
Shivsena Eknath Shinde Group on Uddhav Thackeray : शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रुमख उद्धव ठाकरे हे दिल्ली दौऱ्यावर आहेत. दिल्लीत ते इंडिआ आघाडीच्या नेत्यांच्या भेटीगाठी घेणार आहेत. यावर शिवसेना शिंदे गटाकडून जोरदार टीका करण्यात आली आहे. वाचा सविस्तर...
एकीकडे शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सातत्याने दिल्ली वाऱ्या करत असल्याचा आरोप केला जातो. अशातच आज दिल्लीत इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी उद्धव ठाकरे दिल्लीला गेले आहेत. त्यांच्या या दिल्ली दौऱ्यावर शिवसेना शिंदे गटाकडून जोरदार टीका करण्यात आली आहे. शिवसेना शिंदे गटाच्या फेसबुक आकाऊंटवरून एक व्यंगचित्र शेअर करण्यात आलं आहे. या व्यंगचित्राच्या माध्यमातून जोरदार टीका करण्यात आली. आहे. महाराष्ट्रात ऐतखाऊ मुजोरी… दिल्लीत लाचार मुजरेगिरी, असं म्हणत हे व्यंगचित्र पोस्ट केलं गेलं आहे.
एकीकडे एकनाथ शिंदे सोमवारी पुण्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी गेले होते. तर आज उद्धव ठाकरे दिल्लीत इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी गेलेत. याच मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंवर ठाकरे गटाकडून टीका करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यावरून ठाकरे गटाकडून वारंवार टीका केली जाते. मात्र आता उद्धव ठाकरे यांच्या सहकुटुंब तीन दिवसीय दिल्ली दौऱ्यावर आहेत. त्यामुळे ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्यावर शिवसेना शिंदे गटाकडूनही जोरदार पलटवार करण्यात आला आहे.
पुण्यातील पूरग्रस्त नागरिकांना मदत करण्याऐवजी दिल्लीत मुजरा करणे महत्वाचे, अशा आशयाचं व्यंगचित्र रेखाटून शिवसेना पक्षाने उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडण्यात आलं आहे. हे व्यंगचित्र शिवसेना पक्षाच्या अधिकृत फेसबुक पेजवरून शेअर करण्यात आलं आहे. त्यामुळे ठाकरेंवर निशाणा साधणाऱ्या या व्यंगचित्राची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे.
व्यंगचित्रात काय आहे?
शिवसेना शिंदे गटाने हे व्यंगचित्र शेअर केलंय. यात पाऊस पडताना दिसत आहे. अशा पावसात कमरे इतक्या पाण्यात एक व्यक्ती मदतीसाठी याचना करतो आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या व्यक्तीची मदत करताना दाखवलं आहे. हे सगळं दृष्य पुण्यातील असल्याचं पाटीवरून दिलतंय. तर विमानातून उद्धव ठाकरे दिल्लीला निघाल्याचं या व्यंगचित्रात दाखवण्यात आलं आहे. ‘सहकुटुंब दिल्लीवारी’ असं लिहिलं आहे. उद्धव ठाकरे छत्री घेऊन विमानातून जात असल्याचं म्हणण्यात आलं आहे. ‘मदत सोडून दिल्लीला मुजरा’ असं या व्यंगचित्रावर म्हणण्यात आलं आहे.