बाळासाहेब ठाकरे म्हणायचे त्या आमदारांना रस्त्यात तुडवा, उमेदवारांच्या शपथ कार्यक्रमावर संजय राऊतांचं भाष्य

संजय राऊत यांनी ईडीच्या कारवाया, परमबीर सिंग यांच्याकडून करण्यात आलेले आरोप, नितेश राणे यांची अटक आणि गोवा विधानसभा निवडणुकीवर (Goa Assembly Election 2022 ) भाष्य केलं.

बाळासाहेब ठाकरे म्हणायचे त्या आमदारांना रस्त्यात तुडवा, उमेदवारांच्या शपथ कार्यक्रमावर संजय राऊतांचं भाष्य
बाळासाहेब ठाकरे, संजय राऊत
Follow us
| Updated on: Feb 03, 2022 | 10:14 AM

नवी दिल्ली : शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी नवी दिल्लीत पत्रकारांशी संवाद साधला. या संवादामध्ये संजय राऊत यांनी ईडीच्या कारवाया, परमबीर सिंग यांच्याकडून करण्यात आलेले आरोप, नितेश राणे यांची अटक आणि गोवा विधानसभा निवडणुकीवर (Goa Assembly Election 2022 ) भाष्य केलं. गोव्यात आपनं उमेदवारांना शपथ दिली याविषयी विचारलं असता ती चांगली गोष्ट असल्याचं संजय राऊत म्हणाले. संजय राऊत यांनी जनतेचं प्रबोधन करावं लागेल, असं म्हटलं. पक्षांतर करणाऱ्य उमदेवाराला मतदान करणारी जनता देखील जबाबदार असते. बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) म्हणाले होते पक्षांतर करणाऱ्या आमदारांना रस्त्यात तुडवा. ते जरी कायद्याच्या कसोटीवर बरोबर वाटत नसेल तरी एका पक्षातून निवडून येणे आणि दुसऱ्या पक्षात जायचं असं होत असेल तर जनतेचा विश्वासघात होतो. त्यामुळं गोव्यात जाऊन जनेतेचे प्रबोधन करत आहोत, असं संजय राऊत म्हणाले आहेत.

कुछ मिला क्या?

प्रवीण राऊत यांच्यावर ईडीकडून करण्यात येत असलेल्या कारवाईबद्दल विचारलं असता या सरकारमध्ये राजकीय विरोधकांचे नातेवाईक यांच्यावर कारवाई केली जाते. आम्ही त्या सहन करु , असं संजय राऊत म्हणाले. त्यांना सर्च करु द्या, मी त्यांना विचारतोय कुछ मिला क्या?, हा सर्व खेळ सुरु आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर केली.

परमबीर सिंग आरोपी

परमबीर सिंग हे आरोपी आहेत. मनसुख हिरेन प्रकरणात त्यांच्यावर कोणते आरोप आहेत माहिती नाही. पण ते आरोपी आहेत. ते मुख्यमंत्री यांचं नाव घेत असतील तर घेऊद्यात, आम्ही देखील काही पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नाव घेतो. देवेंद्र फडणवीसांचं नाव घेतलं जायचं. नितेश राणे प्रकरणी बोलताना आम्ही सर्वजण लॉमेकर्स आहोत. कुणी खासदार कुणी आमदार आहेत. न्यायालयीन लढाई सुरु आहे. ते न्यायालयीन लढत आहेत, असं संजय राऊत म्हणाले. महाराष्ट्र हे कायद्यानं चालणार राज्य आहे, असं राऊत यांनी म्हटलं

राहुल गांधी यांचं भाषण मुद्देसूद

राहुल गांधी यांचे कालचे भाषण मुद्देसूद रोखठोक होतं.पंतप्रधानांनी ते भाषण ऐकायला पाहिजे होतं पंतप्रधानांनी भाषण ऐकल असत तर त्यांना नवीन विषय मिळाले असते, असं संजय राऊत म्हणाले.

इतर बातम्या:

परमबीर सिंग यांच्यावर खंडणीचे आरोप, स्वत:च्या बचावासाठी आरोपी इतरांची नाव घेतो: संजय राऊत

Pune जिल्ह्यातील सासवडमध्ये गोदामाला भीषण आग, आगीचं कारण अद्याप अस्पष्ट

Shivsena MP Sanjay Raut said Balasaheb Thackeray said MLA who change party after election should be beaten in road

भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.