राहुल गांधींची कॉलर पकडून धक्काबुक्की म्हणजे लोकशाहीवरील गँगरेप, संजय राऊतांचा संताप
उत्तर प्रदेश पोलिसांनी राहुल गांधींसोबत केलेल्या वर्तनाबद्दल शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला आहे.
मुंबई : हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी गेलेल्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासोबत उत्तर प्रदेश पोलिसांनी धक्काबुक्की केली. या घटनेबाबत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला आहे. (Shivsena MP Sanjay raut slams UP police for manhandling rahul gandhi)
या घटनेबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले की, “राज्यातील एका मुलीवर बलात्कार करुन तिचा खून करण्यात आला आहे. याबाबत विरोधी पक्षाने आवाज उठवायचा नाही, ही कुठली लोकशाही? जर कोणी आवाज उठवला तर तुम्ही त्याची कॉलर पकडून खाली पाडणार असाल तर हा या देशाच्या स्वातंत्र्यावरचा, इथल्या लोकशाहीवरचा सामूहिक बलात्कार आहे.”
राऊत म्हणाले की, “विरोधी पक्षाने बोलू नये, ही सरकारची भूमिका पूर्णपणे चुकीची आहे. आता या देशातील प्रमुख पक्षांनी, त्या पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी जागं व्हायला पाहीजे. नाहीतर त्यांचीदेखील कॉलर पकडून त्यांना खाली पाडण्यात येईल. परंतु या देशाचं दुर्दैव आहे की, इथल्या प्रमुख नेत्यांना अद्याप जाग आलेली नाही.”
राहुल गांधी हे देशाच्या दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे नातू आहेत. दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचे पूत्र आहेत. ही गोष्ट आपण विसरू नये. इंदिराजी, राजीवजी यांनी या देशासाठी जे काही केलं आहे तेदेखील आपण विसरू नये.
पाहा काय म्हणाले संजय राऊत?
लोकशाही मूल्ये पायदळी : शरद पवार गुरुवारी या घटनेनंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीदेखील ट्विटरद्वारे संताप व्यक्त केला. शरद पवारांनी त्यांच्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, ”उत्तर प्रदेश पोलिसांनी राहुल गांधींसोबत केलेले वर्तन हे अत्यंत निंदनीय आहे. अशा पद्धतीने लोकशाही मूल्ये पायदळी तुडवली जात आहेत. कायदा हातात घेतला जातोय.”
Reckless behaviour of UP Police towards @INCIndia leader Shri @RahulGandhi is extremely condemnable. It is reprehensible for those who are supposed to uphold the law to trample upon the democratic values in such a manner.
— Sharad Pawar (@PawarSpeaks) October 1, 2020
सरकारच्या दडपशाहीचा खासदार सुप्रिया सुळेंकडून निषेध राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीदेखील याबाबत प्रतिक्रिया दिली. सुळे यांनी म्हटले की, त्या ठिकाणी यूपी सरकारकडून दडपशाही होणार असेल तर त्याचा मी जाहीर निषेध करते. पोलिसांनी न्याय्य मागणीसाठी जाणाऱ्या लोकप्रतिनिधी वा कुठल्याही व्यक्तीची कॉलर धरणं कितपत योग्य आहे?
त्या ठिकाणी युपी सरकारकडून दडपशाही होणार असेल तर त्याचा मी जाहीर निषेध करते. पोलिसांनी न्याय्य मागणीसाठी जाणाऱ्या लोकप्रतिनिधी वा कुठल्याही व्यक्तीची कॉलर धरणं कितपत योग्य आहे, याचा न्याय मी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांकडे (@myogiadityanath) मागते आहे.
– खा. @supriya_sule
— NCP (@NCPspeaks) October 1, 2020
संबंधित बातम्या
Rahul Gandhi | उत्तर प्रदेश पोलिसांकडून राहुल गांधींना धक्काबुक्की, कॉलर पकडून ताब्यात घेतलं
(Shivsena MP Sanjay raut slams UP police for manhandling rahul gandhi)