UP ATS ने केलेल्या तपासामध्ये सीमा हैदरबाबत धक्कादायक खुलासे, आर्मी ऑफिसरसोबतची ‘ती’ गोष्ट समोर!

| Updated on: Jul 19, 2023 | 2:46 AM

सीमाची चौकशी झाली असून यामध्ये धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे सीमाच्या ओळखपत्रावर तिची जन्मतारीख पाहून सर्वांना धक्का बसला आहे. त्यासोबतच तिने सीमाचे भाऊ आणि काकाही लष्करात होते. 

UP ATS ने केलेल्या तपासामध्ये सीमा हैदरबाबत धक्कादायक खुलासे, आर्मी ऑफिसरसोबतची ती गोष्ट समोर!
Follow us on

मुंबई : देशभर सीमा हैदर चर्चेचा विषय ठरत आहे. पाकिस्तानमधून बेकायदेशीर पद्धतीने आलेली सीमा गुप्तहेर असल्याचा संशय आहे. सीमाची चौकशी यूपी एटीएसने केली. चौकशी झाली असून यामध्ये धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे सीमाच्या ओळखपत्रावर तिची जन्मतारीख पाहून सर्वांना धक्का बसला आहे. त्यासोबतच सीमाचे भाऊ आणि काकाही लष्करात होते.

नेमके कोणते खुलासे झालेत?

एटीसला चौकशीमध्ये सीमा हैदरच्या ओळखपत्रानुसार तिचं वय 21 वर्ष इतकं आहे. मात्र याआधी तिने माध्यमांशी बोलताना वय 27 सांगितलं असून चारही मुले तिचीच आहे. एटीएसने तिची जवळपास आठ तास चौकशी केली यावेळी तिच्यासोबत भारतातील पती सचिन आणि त्याचे वडील नेत्रपाल होते. रात्री 8.30 वाजता सेक्टर 58 मधील एटीएस कार्यालयातून बाहेर पडले. त्यानंतर त्यांना एटीएसने रबूपुरा इथं सोडलं. मंगळवारी रात्री 9.30 वाजता एटीआयचं पथक सीमा हैदरच्या घरी गेले होते तेव्हा तिथे मोठ्या प्रमाणात गर्दी झाली झालेली पाहायला मिळाली होती.

सीमा हैदरने सोशल मीडियाच्या मदतीने दिल्ली-एनसीआरमधील अनेक तरूणांच्या संपर्कात असल्याचंही बोललं जात आहे. फेसबुकवर लष्कराच्या अधिकाऱ्यांनाही तिने फ्रेंड रिक्वेस्टही पाठवली होती. इतकंच नाहीतर सीमाचा भाऊ आसिफ आणि तिचे काका लष्करात असल्याची माहिती आहे.  कोर्टातून जामीन मिळाल्यानंतर आता ती रबुपुरा येथील सचिनच्या घरी राहत आहे.

दरम्यान, पाकिस्तानमधील कराची इथे रहिवासी असून तिने सांगितल्यानुसार PUBG खेळत असताना रबुपूरा राहणाऱ्या सचिनच्या ती प्रेमात पडली होती. सीमा हैदर याने 13 मेवेळी बेकायदेशीरपणे भारताच्या हद्दीत प्रवेश केला होता. पोलिसाांनी याची माहिती होताच त्यांनी 6 जुलैला सीमा आणि सचिनला अटक केली होती.