मास्तराचा मुड खराब असल्याने मार्क दिले नाहीत, 10 वीच्या परीक्षेत रिचेंगिग करताना उघड झाले
दहावीचे वर्ष एकीकडे इतके महत्वाचे असताना अनेक परिक्षांचे पेपर फुटण्याचे प्रकार एकीकडे वाढले असताना आता पेपर तपासण्याच्या नावाखाली शिक्षकांनी केलेल्या चुकीचा फटका दहावीच्या हुशार विद्यार्थ्यांना बसला आहे.
दहावीच्या बोर्डाचे विद्यार्थी वर्षभर अभ्यास करत असतात. मेहनतीने केलेल्या अभ्यासाचे चीज निकाल लागल्यानंतर होते. परंतू अभ्यास करुन ही केवळ पेपर तपासणाऱ्या अवकृपेने तुम्हाला चांगले मार्क मिळाले नसतील तर काय करायचे ? कारण राजस्थान माध्यमिक शिक्षण बोर्डाच्या दहावीच्या सायन्स विषयाचे पेपर तपासताना पेपर न पाहाताच शिक्षकांनी मनाप्रमाणे मार्क दिल्याचे धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे.
राजस्थानातील काही विद्यार्थ्यांना अपेक्षेहून कमी मार्क मिळाल्याने त्यांनी आपले पेपर फेरतपासणीसाठी पाठवले. तेव्हा तपासणीत या संबंधित शिक्षकाने केवळ एकाच नव्हे तर तब्बल 840 विद्यार्थ्यांचे पेपर अशाच प्रकारे तपासल्याचे उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.
राजस्थानातील बारा जिल्ह्यातील तीन विद्यार्थ्यांनी आपल्या उत्तर पत्रिकांची फेर तपासणी करण्याचा अर्ज केला होता. त्यांच्या मूळ उत्तर पत्रिका जेव्हा पाहील्या तेव्हा त्यांचे पेपर तपासले नसल्याचे उघड झाले. आणि पेपर न तपासता त्यांना मार्क दिल्याचे उघडकीस आले. त्यानंतर हे प्रकरणात आता कारवाई करण्यात येणार आहे. या चुकीचा फटका मयंक नागर या विद्यार्थाला बसला आहे. त्याच्या योग्य उत्तराला पेपर तपासणाऱ्यांनी शून्य मार्क दिलेला आहे. त्याला केवळ 58 मार्क मिळाले आहेत.
840 उत्तर पत्रिकेचे मुल्यांकन
परीक्षक निमिषा यांनी उत्तरे न पाहाताच मनाप्रमाणे गुण दिल्याचे उघड झालेले आहे. संपूर्ण उत्तर पत्रिकांची तपासणी झाली तेव्हा सायन्स दोन बंडल याच शिक्षिकेने तपासल्याचे उघडकीस आले आहे. म्हणजे निमिषा यांनी एकूण 840 उत्तर पत्रिकेचे मुल्यांकन केल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे या मुलांच्या गुणदानात गोंधळ उडालेला असू शकतो असे म्हटले जात आहे.