Shoe Theft : ऐकावे ते नवलच, 7 वर्षांपूर्वी झाली चोरी, पोलीस म्हणतात आता घेऊन जा चप्पल-बूट

Shoe Theft : 7 वर्षांपूर्वी एका मंदिराबाहेरुन चोरीला गेलेला बूट अखेर पोलिसांनी शोधून काढलाच. पण आता एक अडचण आली आहे. त्यामुळे पोलिसांच्या मेहनतीवर पाणी फेरले आहे. काय आहे आहे हे प्रकरण

Shoe Theft : ऐकावे ते नवलच, 7 वर्षांपूर्वी झाली चोरी, पोलीस म्हणतात आता घेऊन जा चप्पल-बूट
Follow us
| Updated on: Sep 15, 2023 | 2:53 PM

नवी दिल्ली | 15 सप्टेंबर 2023 : जगात कुठे काय होईल काही सांगता येत नाही. देशातील प्रार्थना स्थळाबाहेरुन चप्पल, बूट लंपास करण्याचा प्रकार काही नवा नाही. हे चप्पल, बूट परत मिळत नाही. काही जण पादत्राण चोरीला गेल्यावर दुसऱ्याची चप्पल घालून निघून जातात. पण एक अजब प्रकार समोर आला आहे. 7 वर्षांपूर्वी एका मंदिराबाहेरुन एका न्यायाधीशाच्या मुलाचा शूज चोरीला गेला होता. हे प्रकरण त्यावेळी गाजले होते. त्याच दिवशी इतरांचे बूट, चप्पल चोरीला गेले होते. अखेर पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावलाच. त्यांनी त्यातील एका तक्रारकर्त्याला फोन केला. सात वर्षांनी का होईना, चोरीला गेलेले चप्पल, बूट शोधल्याचा दावा त्यांनी केला. तक्रारकर्त्याला त्याचा शूज (Shoe Theft) कोणता, याची ओळख पटवून तो घेऊन जाण्यास पोलिसांनी सांगितले. पण आता या प्रकरणात एक व्यवहार आडवा आला आहे, त्यामुळे पोलिसांच्या मेहनतीवर पाणी फेरले गेले.

काय आहे प्रकरण

राजस्थानमधील शिवपुरी येथील महेंद्र कुमार दुबे यांना हा अनुभव आला. हा किस्सा 2017 मध्ये घडला होता. दुबे हे मत्स्य विभागात सहायक संचालक पदावर होते. निवृत्तीनंतर ते चित्तोडगढ येथील सावरिया सेठ मंदिरात ते दर्शनासाठी गेले होते. दर्शन झाल्यावर ते मंदिराबाहेर आले. त्यांचे शूज चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. महेंद्र कुमार दुबे या प्रकारामुळे नाराज झाले. त्यांनी जवळच्याच मनसफिया पोलीस ठाण्यात पोहचले. त्यांनी शूज चोरीला गेल्याची तक्रार नोंदवली. ही घटना 14 जानेवारी 2017 रोजी घडली होती.

हे सुद्धा वाचा

न्यायाधीशांच्या मुलाचे बूट पण चोरीला

हे प्रकरण महेंद्र कुमार दुबे यांच्या विस्मृतीत गेले होते. त्यांना तक्रीराचा विसर पडला होता. ऑगस्ट 2023 मध्ये एका न्यायाधीशाचा मुलगा पण याच मंदिरात दर्शनाला आला होता. मंदिराबाहेर त्याचा बूट पण चोरीला गेला. त्याने पण याच पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या चोरीमुळे हंगामा झाला. महेंद्र कुमार दुबे यांनी ही चोरीचे वृत्त समजले. त्यांनी लागलीच पोलिसांना त्यांच्या तक्रारीचे काय झाले याची विचारणा केली.

पण आडवा आला व्यवहार

अर्थात पोलिसांनी त्यांना पुन्हा केला. मंदिर परीसरातून चोरीला गेलेले काही शूज, चप्पल हस्तगत करण्यात आले आहे. दुबे यांनी त्यांच्या शूजची ओळख पटवून तो घेऊन जावा, असे त्यांना कळविण्यात आले. अर्थात 7 वर्षांपूर्वी मिळालेले शूज हे त्यांचेच असतील कशावरुन असा सवाल दुबे यांना पडला. तसेच शिवपूरीवरुन चित्तोडगडला शूज तपासण्यासाठी जाणे त्यांना फायद्याचा व्यवहार वाटला नाही. कारण येण्या-जाण्याचा खर्चच या शूजच्या किंमतीपेक्षा अधिक होत होता.  अखेर चोरीच्या या प्रकरणात व्यवहाराचे शहाणपण दिसून आले.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.