Shraddha Murder Case: श्रद्धा वालकर हत्या प्रकरणी मोठी अपडेट, आरोपी आफताब पुनावाला याला कोर्टात करणार हजर

श्रद्धा वालकर हिचे 35 तुकडे करणाऱ्या आफताब पुनावाला प्रकरणात मोठी अपडेट समोर येत आहे.

Shraddha Murder Case: श्रद्धा वालकर हत्या प्रकरणी मोठी अपडेट, आरोपी आफताब पुनावाला याला कोर्टात करणार हजर
Image Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Dec 09, 2022 | 8:54 AM

नवी दिल्ली,  श्रद्धा वालकर हिची क्रूर हत्त्या (Shraddha Walkar Murder) करून शरीराचे 35 तुकडे करणाऱ्या तिचा लिव्ह-इन पार्टनर आफताब अमीन पूनावाला  (Aftab Punawala) सध्या तिहार तुरुंगात आहे, त्याला शुक्रवारी साकेत न्यायालयात हजर केले जाणार आहे. तिहार तुरुंग प्राधिकरणाने आपल्या तिसर्‍या बटालियनला आरोपी आफताबला विशेष सुरक्षा पुरवण्यास सांगितले आहे. आज त्याला संबंधित न्यायाधीशासमोर हजर केले जाणार आहे. श्रद्धा हत्याकांडातील आरोपी आफताब अमीन पूनावाला याने मेहरौली पोलिसांना खुले आव्हान दिले आहे की, “मी श्रद्धाला मारले आहे, तुमच्यात हिम्मत असेल तर शरीराचे अवयव आणि हत्यारे जप्त करून दाखवा”.

हे आव्हान तो पुन्हा पुन्हा देत आहे. आरोपीच्या या आव्हानाबाबत दक्षिण जिल्ह्याचे पोलिस अधिकारीही हतबल झाले आहेत. त्याचा आत्मविश्वास पाहून पोलीसही आश्चर्यचकित झाले आहेत.

आफताब देतोय पोलिसांना आव्हान?

दिल्ली पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, मेहरौली पोलिसांनी आरोपीला पकडले तेव्हा आफताबने श्रद्धाला मी मारल्याचे सांगितले होते. हिम्मत असेल तर शरीराचे तुकडे शोधून दाखवा. हे आव्हान तो आता सातत्याने देत आहे. पोलिसांना अद्याप श्रद्धाचे डोके आणि धड सापडलेले नाहीत.

हे सुद्धा वाचा

छतरपूरच्या जंगलातून सापडलेला जबडा आणि 100 फूट रस्त्यावरून सापडलेले  मृतदेहाचे तुकडे श्राद्धाचे असल्याचे समजते. शरीराचे तुकडे करण्यासाठी वापरलेले शस्त्र अद्याप पोलिसांना सापडले नाहीत.  मात्र, पोलिसांनी आफताबच्या स्वयंपाक घरातून पाच चाकू जप्त केले. याचा वापर त्याने श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे करण्यासाठी केला होता.

श्रद्धा असल्याचे भासवत मित्रांशी मारायचा गप्पा

आफताब जवळपास महिनाभर श्रद्धाचा मोबाईल वापरत होता. मात्र, त्याने कुणालाच फोन केला नाही, तर व्हॉट्स ॲप चॅटिंग केले. एकदा श्रध्दाचा मित्र लक्ष्मण याने आफताबला  व्हॉट्सॲप मेसेज केला होता, त्यावर ती आता व्यस्त असल्याचे आफताबने सांगितले.

नंतर त्याने लक्ष्मणला निरोप दिला की श्रद्धा त्याला सोडून गेली आहे. यानंतर त्याने श्रद्धाचा मोबाईल आणि सिम मुंबईला नेले आणि समुद्रात फेकले. पोलिसांना अद्याप श्रद्धाचा मोबाईल आणि सिम मिळालेले नाही.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.