पाटना : प्रेमात पडलेला माणूस काहीही करायला तयार असतो, असं म्हणतात. सीवानमध्ये एका युवकाने प्रेमासाठी आपला धर्म बदलला. कालपर्यंत तो शिवभक्त होता. पण प्रेमासाठी तो नमाजी बनला. शिवशंकराच्या भक्तीत तो तल्लीन व्हायचा. आता तो अल्लाहची इबादतही अशीच करतो. तो पाचवेळचा नमाजी बनला आहे. त्याने स्वत:चा वेशही बदलला होता.
क्लीन शेव राहणाऱ्या मुलाने दाढी वाढवली. टोपी घालू लागला. त्याने स्वत:ची वेशभूषा एका मौलनासारखी केली. श्रवण नावाचा हा मुलगा प्रेमात साहिल बनला. हे प्रकरण सीवान जिल्ह्यातील आहे.
‘माझी मुलगी आमच्या धर्माच्या मुलाशी लग्न करेल’
खेदाची बाब म्हणजे इतकं सर्व केल्यानंतरही त्याला प्रेम मिळालं नाही. ज्या मुलीसाठी त्याने आपला धर्म सोडला, ती साहिलला प्रियकर नाही, फक्त आपला मित्र मानते. “श्रवणने आपला धर्म बदलला, त्याला आपली मुलगी जबाबदार नाही” असं मुलीची आई सांगते. “दोघे मित्र होते. पण आता ते बोलत नाहीत. माझी मुलगी आमच्या धर्माच्या मुलाशी लग्न करेल” असं मुलीची आई सांगते.
‘मुलगा मौलाना सारखा दिसत होता’
सीवानच्या मैरवा येथील मिसकरही मोहोल्ल्यात राहणारा श्रवण मागच्या 6 महिन्यापासून गायब होता. घरच्यांनी त्याचा भरपूर शोध घेतला. अखेर पोलिसात रिपोर्ट् केला. एक दिवस श्रवणच्या आईने त्याला बाजारात पाहिलं. त्याची वेशभूषा बदलेली होती. मुलगा मौलाना सारखा दिसत होता. पोलिसांना या बद्दल माहिती दिली.
श्रवणच्या आईने काय आरोप केलाय?
श्रवणच्या आईने आरोप केलाय की, “शेजारी राहणारी मुलगी रोजी खातुनने आपल्या मुलाला धर्म परिवर्तनासाठी भाग पाडलं. दोघांमध्ये प्रेमसंबंध होते. लग्नासाठी माझ्या मुलाने धर्म परिवर्तन केलं. रोजीने त्याला मौलान बनवून एक मदरशामध्ये ठेवलं होतं”
मुलीने काय म्हटलं?
“हे सर्व आरोप चुकीचे आहेत. आम्ही फक्त मित्र होतो. फोनवरुन बोलणं व्हायचं. कुटुंबियांना याबद्दल समजल तेव्हा, आम्ही थांबलो. माझं आता त्याच्याबरोबर बोलणही होत नाही. त्याच्या धर्म परिवर्तनाशी माझं काही देणंघेणं नाही” असं मुलीने म्हटलय.