Voter: स्वतंत्र भारताच्या पहिल्या मतदाराने घालून दिला हा आदर्श, जगाचा घेतला निरोप, पण बजावले कर्तव्य..

Voter: स्वतंत्र भारताचे पहिले मतदार काळाच्या पडद्याआड गेले, पण त्यांनी बजावलेल्या कर्तव्याने सर्वांनाच धडा दिला.

Voter: स्वतंत्र भारताच्या पहिल्या मतदाराने घालून दिला हा आदर्श, जगाचा घेतला निरोप, पण बजावले कर्तव्य..
जाता जाता ही बजावले कर्तव्यImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Nov 05, 2022 | 4:55 PM

शिमला, हिमाचल प्रदेश : स्वतंत्र भारताचे पहिले मतदार (First Voter) काळाच्या पडद्याआड (Passed Away) गेले. पण जाता जाता त्यांनी बजावलेल्या कर्तव्यामुळे भारतातीलच नाही तर जगभरातील मतदारांसाठी (Voters) मोठा धडा मिळाला आहे. तुम्हाला ही गोष्ट वाचून अभिमान वाटल्याशिवाय राहणार नाही.

श्याम सरन नेगी हे भारताचे पहिले मतदार, त्यांनी वयाच्या 106 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. पण मृत्यूच्या दोन दिवसांपूर्वीच त्यांनी हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी मतदान केले.

मृत्यू येण्यापूर्वी ही त्यांची लोकशाहीवरील दृढनिष्ठा चर्चेचा विषय ठरली आहे. त्यांना मतदान करता यावे यासाठी निवडणूक आयोगाने विशेष व्यवस्था केली होती. त्यांना मतदानासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती.

हे सुद्धा वाचा

वयाची 100 ओलांडली असल्याने मतदान टीम त्यांच्या घरी पोहचली होती. पोस्टल बॅलेटच्या मदतीने त्यांनी मतदानाच्या दिवशी त्यांचा मतदानाचा हक्क बजावला. नेगी यांनी देशाच्या पहिल्या सार्वजनिक निवडणुकीत पहिले मतदान केले होते.

त्यांचा जन्म 1 जुलै 1917 रोजी हिमाचल प्रदेशातील किन्नोरमध्ये झाला होता. 2 नोव्हेंबर रोजी त्यांनी हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी मतदान केले. पहिल्या सार्वजनिक निवडणुकीनंतर त्यांनी कधीही मतदान चुकविले नव्हते.

1951 मध्ये देशातील सर्वात पहिली सार्वजनिक निवडणूक झाली होती. 25 ऑक्टोबर 1951 रोजी त्यांनी रांगेत पहिला नंबर लावत मतदान केले होते. तेव्हापासून ते अविरतपणे मतदान करत होते.

देशातील पहिली सार्वजनिक निवडणूक फेब्रुवारी 1952 मध्ये झाली होती. पण हिमाचल प्रदेशात जोरदार बर्फवृष्टी सुरु असल्याने तिथे पाच महिने अगोदरच मतदान घेण्यात आले होते. नेगी यांनी कल्पा येथे शिक्षक म्हणून काम केले आहे.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.