बिहारमध्ये पैसे काढण्यासाठी “मृतदेह” थेट बँकेत, पुढं काय घडलं ?
बिहारमधील पाटणामध्ये मृतदेह घेऊन पैसे काढण्यासाठी गावकरी थेट बँकेच्या शाखेत पोहोचले. Sigriyava villagers of Bihar
पाटणा : बिहारमधील पाटणामध्ये मृतदेह घेऊन पैसे काढण्यासाठी गावकरी थेट बँकेच्या शाखेत पोहोचले. पैसे काढण्यासाठी गावकरी मृतदेह घेऊन आल्यामुळे अधिकाऱ्यांमध्ये भीतीची वातावरण निर्माण झाले होते. पण, गावकरी मृतदेह घेऊन गावात का पोहोचले? असं काय घडलं होतं त्यामुळे मृतदेह घेऊन ग्रामस्थ थेट बँकेत पोहोचले. (Sigriyava villagers of Bihar reach bank with dead body to withdraw money in Patna Shahjahanpur)
राजधानी पाटणामधील शहाजहांपूर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात सिगरियावा गाव आहे. या गावातील कॅनरा बँकेच्या शाखेत गावकरी मृतदेह घेऊन पोहोचले. बँकेच्या शाखेत थेट मृतदेह आणल्यानं बँकेतील कर्मचाऱ्यांमध्ये घबराट पसरली होती. मंगळवारी सिगरियावा गावातील 55 वर्षीय महेश यादव या व्यक्तीचा मृत्यू झाला होता.
महेश यादव याच्या मृत्यूनंतर त्याच्या अंत्यसंस्कारासाठी ग्रामस्थांकडे पैसे नव्हते. गावकऱ्यांनी थेट बँकेत जात महेश यादवच्या अत्यसंस्कारासाठी पैसे देण्याची मागणी केली. बँक अधिकाऱ्यांनी पैसे देणार येणार नाहीत असे सांगितले. कॅनरा बँकेच्या अधिकाऱ्यांनी पैसे देण्यास नकार दिल्यामुळे ग्रामस्थ आक्रमक झाले. यानंतर गावकरी महेश यादवचा मृतदेह घेऊन बँकेत पोरोटले आणि पैसे देण्याची मागणी करु लागल्यानं बँकेत गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती.
गावकरी आणि बँक यांच्यातील वादामुळं महेश यादवचा मृतदेह तब्बल तीन बँकेत होता. अखेर कॅनरा बँक शाखेच्या मॅनेजरनं स्वत:कडील 10 हजार रुपये देत गावकऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर गावकरी मृतदेह घेऊन बँकेबाहेर पडले.
बँकेची भूमिका
महेश यादवचे कॅनरा बँकेत खाते होते. त्याचे लग्न झाले नसल्यामुळे त्यानं बँक खाते काढले तेव्हा कोणालाही वारस म्हणून निवडले नव्हते. दोनवेळा सूचना देऊनही महेश यादवनं केवायसी अपडेट केली नव्हती. केवायसी अपडेट नसणे आणि वारस नोंद केली नसल्यामुळे बँक मॅनेजरनं पैसे देण्यास नकार दिला होता. महेश यादवच्या खात्यात एक लाख रुपयांहून अधिक रक्कम असल्याचा दावा गावकऱ्यांनी केला आहे.
संबंधित बातम्या:
काँग्रेस फुटीच्या उंबरठ्यावर, बिहारमध्ये 19 पैकी 11 आमदार पक्ष सोडण्याच्या तयारीत
बिहारमध्ये काँग्रेसला अजून मोठा झटका बसण्याची शक्यता, काय आहे कारण?
(Sigriyava villagers of Bihar reach bank with dead body to withdraw money in Patna Shahjahanpur)