पंजाबावर गँगवॉरचे ढग! ‘2 दिवसांत हत्येचा बदला घेऊ’ सिद्धू मुसेवालाच्या हत्येनंतर नीरज बवाना गँगची धमकी

Sidhu Moosewala News : दरोडे टाकणं, लूटमार करणं, हत्याकांड, जीवे मारण्याच्या धमक्या देऊन धमकावणं, असे अनेक गंभीर स्वरुपाचे गुन्हे करण्याबाबत ही गँग कुप्रसिद्ध आहे.

पंजाबावर गँगवॉरचे ढग! '2 दिवसांत हत्येचा बदला घेऊ' सिद्धू मुसेवालाच्या हत्येनंतर नीरज बवाना गँगची धमकी
तणावपूर्ण परिस्थितीImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Jun 01, 2022 | 9:11 AM

पंजाबची शांतता सध्या भंग पावली आहे. कारण ठरलंय सिंगर सिद्धू मुसेवाल्या हत्या! (Singer Sidhu Moosewala Murder News) सिंगर सिद्धूच्या हत्येनंतर आता पंजाबात पुन्हा गँगवॉर (Punjab Gangwar) भडकण्याची चिन्हा आहेत. विक्की डोंगर आणि बंबिहा गँगनंतर आता नीरज बवाना गँगनेही (Punjab Gangwar) ओपन चॅलेंज दिलंय. नीरज बवाना गँगकडून एक कथित फेसबुक पोस्ट करत सिद्धूच्या हत्येचा निषेध करण्यात आला. शिवाय दोन दिवसांच्या आता मुसेवालाच्या हत्येचा बदला घेऊ, असंही म्हटलंय. नीरज बवाना हल्लीच सुशील कुमार प्रकरणामुळे चर्चेत आलेला होता. नीरजवर हत्या, लुटमार, लोकांना उकसावणं, धमक्या देणं, असे अनेक गुन्हे दाखल आहेत. 29 मे रोजी गायक सिद्धू मुसेवाला याची हत्या करण्यात आली होती. गोळ्या झाडून भररस्त्यात सिद्धूला जीवे मारण्यात आलं होतं. जीपमधून जात असताना सिद्धूवर प्राणघातक हल्ला करण्यात आलेला. यानंतर रक्तबंबाळ अवस्थेत असलेला सिद्धूचा मृतदेह गाडीत बरावेळ पडून होता. यानंतर मोठी खळबळ उडाली होती.

कोण आहे नीरज बवाना?

नीरज बवाना दिल्लीच्या बवाना गावात राहतो. गावाच्या नावामुळेच त्याच्या नावासोबत बवाना हे नाव जोडलं गेलं. नीरजवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. हे गुन्हे फक्त दिल्लीपुरतेच मर्यादित नसून दिल्लीबाहेरही त्याच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. दिल्लीच्या तिहार जेलमध्ये नीरज बवाना शिक्षा भोगतोय. या जेलमधूनच तो आपली गँग चालवतो, असं सांगितलं जातं. नीरज साथीदारांच्या आडून सोशल मीडिया कंट्रोल करतो. नीरच्या गँगमध्ये उत्तर प्रदेश, हरियाणा आणि पंजाबमधील अनेकजण सामील आहेत. हे सर्व जण गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत.

दरोडे टाकणं, लूटमार करणं, हत्याकांड, जीवे मारण्याच्या धमक्या देऊन धमकावणं, असे अनेक गंभीर स्वरुपाचे गुन्हे करण्याबाबत ही गँग कुप्रसिद्ध आहे. कुख्यात गुंड नीतूचा इन्काऊंटरमध्ये खात्म केल्यानंतर अनेक गुंडांनी नीरजच्या गँगमध्ये प्रवेश केला होता. यामुळे नीरजची गँग मोठीही झाली आणि अधिक घातकदेखील.

हे सुद्धा वाचा

मुसेवालाचा मारेकरी पोलीस कस्टडीत

दरम्यान, सिद्धू मुसेवाला याचा मारेकर लॉरेन्स बिश्नोई हा सध्या पोलीस कोठडीत आहे. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकानं लॉरेन्सला आपल्या ताब्यात घेतलं असून सध्या त्याची कसून चौकशी केली जातेय. सिद्धू मुसेवाला याच्या हत्येचा कट गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई आणि गोल्डी बराड यांनी रचल्याचा पोलिसांना संशय आहे.

मुसेवालाच्या हत्याकांडप्रकरणी पोलिसांनी भटिंडा आणि फोरजपूर जेलमध्ये बंद असलेल्या गँगस्टर मनप्रीस सिंह आणि शरद यांनाही पाच दिवसांच्या प्रॉडक्ट्स वॉरंटवर ताब्यात घेतलंय. सध्या या सगळ्यांची कसून चौकशी केली जातेय.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.