ललितपूर : उत्तर प्रदेशमध्ये (Uttar Pradesh) काही दिवसांपुर्वी बुल्डोजर मॉडेल सुसाट धावल्यानंतर अख्या देशात टीका झाली. त्यानंतर राज्यात हे मॉडेल असेच धावेल अशी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Chief Minister Yogi Adityanath) यांनी घोषणाच दिली. त्यानंतर त्यांनी देशात भोंग्यावर सुरू असणाऱ्या राजकारणावर आपला मोर्चा वळवला आणि अनेक भोंगे काढून टाकले तर अनेकांच्या आवाजावर मर्यादा आणली. त्यानंतर उत्तर प्रदेशमधील योगी राज्याची देशात वाहवाह झाली. तर महाराष्ट्रात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी राज्यात योगी नाही म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले होते. त्यानंतर मात्र आता योगीच्या राज्यात कुंपनच शेत खातं असल्याचे समोर आल्याने त्यांच्या पोलिसांवर चोहोबाजूने टीका होत आहे. येथील ललितपूर (Lalitpur) जिल्ह्यातील एका पोलीस ठाण्याच्या स्टेशन प्रभारीवर एका सामूहिक बलात्कार (gang rape) पीडितेने बलात्काराचा आरोप केला आहे. यानंतर स्टेशन प्रभारीला निलंबित करण्यात आले आहे.
ललितपूर जिल्ह्यातील एका पोलीस ठाण्याच्या स्टेशन प्रभारीवर एका सामूहिक बलात्कार पीडितेने बलात्काराचा आरोप केल्यानंतर तेथे एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात सहा जणांविरुद्ध एफआयआर देखील दाखल करण्यात आला आहे. ज्यात स्टेशन प्रभारीचा देखील समावेश आहे. मात्र याप्रकरणानंतर स्टेशन प्रभारीला निलंबित करण्यात आले आहे. तर तो सध्या सध्या फरार आहे. 13 वर्षीय तरुणीने आरोप केला आहे की, आधी 4 जणांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर जेव्हा ती तक्रार घेऊन पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली तेव्हा पोलिस ठाण्यातच तिच्यावर स्टेशन प्रभारीने देखील बलात्कार केला. यानंतर या संपूर्ण घटनेची तक्रार एसपींकडे त्या पीडितेने केली. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. तसेच यानंतर पोलीस प्रमुखाला निलंबित करण्यात आले आहे. तर स्टेशन प्रभारी आणि इतर आरोपींना अटक करण्यासाठी पोलीस पथके तयार करण्यात आली आहेत.
22 एप्रिल रोजी एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून चार तरुणांनी तिच्यावर बलात्कार केला होता. आरोपींच्या तावडीतून सुटका झाल्यानंतर पीडितेने न्याय मिळावा म्हणून पोलिस ठाण्यात धाव घेतली. मात्र न्याय मिळण्याऐवजी तिला छळालाच बळी पडावे लागले. तिथे उपस्थित स्टेशन प्रमुख टिळकधारी सरोजनेही तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप आहे. पीडितेने आपली कहानी एसपींना सांगितली आणि त्यानंतर ही कारवाई केली जात आहे. यानंतर ललितपूरचे जिल्हा पोलिस अधीक्षक निखिल पाठक यांनी सांगितले की, पाली येथील रहिवासी असलेल्या चार मुलांनी त्या 13 वर्षीय मुलीला कथितपणे आमिष दाखवले होते. तर 22 एप्रिल रोजी तिला भोपाळला नेले आणि तीन दिवस तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.
ललितपूर पोलिसांचे म्हणणे आहे की त्यांनी या प्रकरणात स्टेशन प्रमुख टिळकधारी आणि इतरांविरुद्ध बलात्कार आणि पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आले आहेत. मात्र, आरोपी पोलीस अधिकाऱ्याला अटक होणे बाकी आहे. ललितपूरचे एसपी निखिल पाठक यांनी सांगितले की, आम्ही एका आरोपीला अटक केली असून त्याची चौकशी करत आहोत. स्टेशन प्रमुख टिळकधारी निलंबित असून तो गुन्हेगार आहे. त्यामुळे त्याला अटक करण्यासाठी आम्ही पथके तयार केली आहेत. एका एनजीओने मुलीला माझ्या कार्यालयात आणले. यानंतर मुलीने सर्व प्रकार सांगितला.