कारचा एसी लावून आरामात झोपत असाल तर सावधान, अशी घटना घडली की….

कारचा एसी लावून आरामात झोपत असाल तर सावधान, अशा घटना का घडत असाव्यात याची चर्चा सुरु आहे. या इसमाकडून काय चुक झाली की त्याचा मृत्यू झाला. पाहूयात....

कारचा एसी लावून आरामात झोपत असाल तर सावधान, अशी घटना घडली की....
AC of the car on is danger for you ?Image Credit source: TV9MARATHI
Follow us
| Updated on: Jun 18, 2024 | 5:52 PM

वाढत्या राहणीमानाप्रमाणे अनेकांकडे हल्ली फोर व्हीलर कार असते. पावसाच्या दिवसात कार चालविताना अनेक अपघात होत असतात. कारचा दरवाजा लॉक झाल्याने मुंबईत्या 26 जुलै 2005 च्या अतिवृष्टीत अनेक जणांचे प्राण गेले होते. खेळताना कारमध्ये लहान बालके लपून बसली असताना त्यांचा गुदमरुन मृत्यू झाल्याची घटना अलिकडेच मुंबईतील एण्टॉप हिल परिसरात घडली होती. आता एक विचित्र घटना घडली आहेत. कारच्या एसी चालू ठेवून झोपलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.

युपीतील इंदिरापुरम येथील एक व्यक्त कारचा एसी चालवून झोपून त्यामध्ये गेला होता, तो इसम पुन्हा उठलाच नाही. दिल्लीत प्रचंड तापमान असून ज्या तापमानापासून सुटका होण्यासाठी त्याने कारचा एसी सुरु केला होता. त्यानेच त्याचा प्राण घेतल्याचे म्हटले जात आहे. अशा प्रकारे एसी चालवून अनेक जण कारमध्ये झोपत असतात, त्यांची या घटनेने झोप उडाली आहे.

पोलिसांच्या तपासानूसार या व्यक्तीचा मृत्यू गुदमरुन झाला आहे. प्राथमिक निष्कर्षानूसार त्याला पुरेसा ऑक्सिजन मिळालेला नसल्याने त्याचा मृत्यू झाला असावा. आणखी एक धक्कादायक म्हणजे सलग अनेक तास एसी सुरु असल्याने गाडीचे पेट्रोल संपले होते. त्यामुळे एसी यंत्रणा आपोआप बंद पडली आणि त्या व्यक्तीला याचा थांगपत्ताच नव्हता. तो गाढ झोपत होता. आणि त्याचा गुदमरुन मृत्यू झाला असावा असे म्हटले जात आहे.

कारचा एसी जीवघातक होऊ शकतो का ?

कारचा एसी चालवून झोपणे धोकादायक ठरु शकते. याची अनेक कारणे आहे. ही कारणे नेमकी काय आहेत ?

कार्बन मोनोऑक्साइडची गळती

कारचा एसी सुरु करुन झोपल्यास जर गाडीचे इंजिन मेन्टेनन्स नसेल किंवा वायुविजन नीट होत नसेल तर कार्बन मोनोऑक्साइड  ( carbon monoxide ) वायूची गळती होण्याचा धोका वाढतो. हा वायू अत्यंत विषारी असून तो रंगहीन आणि गंधहीन असतो. त्यामुळे त्याची उपस्थिती मानवी इंद्रियांना लागलीच होत नाही. हा वायू रक्तातील हिमोग्लोबिनवर परिणाम करतो, ज्यामुळे ऑक्सिजन शरीराच्या अवयवांपर्यंत पोहोचू शकत नाही, त्यामुळे मृत्यू येऊ शकतो.

2. ऑक्सिजनची कमतरता

बंद कारमध्ये बराच वेळ एसी चालविल्यास वाहनातील हवेचा पुनर्वापर होत राहतो. त्यामुळे आतील ऑक्सिजन हळूहळू संपतो त्यामुळे देखील कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण कारमध्ये वाढते. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे माणूस गुदमरण्याचा धोका असतो. या स्थितीला “अस्फिक्सिया” म्हणतात, त्यामुळे देखील मृत्यू होऊ शकतो.

3. हवेचा अभाव

वाहनांच्या काचा पूर्णपणे बंद असल्याने आतील हवा बाहेर जात नाही तर ते आपल्यासाठी हवाबंद चेंबर बनते. अशावेळी एसी लावणेही धोकादायक ठरू शकते कारण हवेच्या कमतरतेमुळे ताजी हवा आत येऊ शकत नाही.

4. उष्माघाताचा धोका

अनेक वेळा लोक झोपताना अतिथंड वातावरणामुळे एसी बंद करतात आणि त्यावेळी ते खिडक्या उघडण्यास विसरतात. त्यामुळे ताजी हवा मिळत नाही. अशा स्थितीत वाहनातील तापमान झपाट्याने वाढू शकते, त्यामुळे उष्माघाताचा धोका असतो. विशेषत: उन्हाळ्यात आणखी धोकादायक ठरू शकते.

5. झोपण्याची पद्धत

कारमध्ये झोपताना एखाद्या व्यक्तीने सावध झोपायला हवे. संपूर्णपणे डाराडुर झोपणे हे देखील घातक ठरू शकते. कारमध्ये झोपताना एसी सुरु असताना व्यक्तीने योग्य स्थितीत झोपावे त्यामुळे नीट श्वास घेता येईल.

कारमध्ये एसी लावताना काळजी घ्या

असे प्रकार टाळण्यासाठी कारचा एसी लावताना खबरदारी म्हणून या गोष्टी करा

वाहनाची नियमित सर्व्हीसिंग करा आणि एक्झॉस्ट सिस्टम तपासा…

वाहनामध्ये CO डिटेक्टर लावा, कार्बन मोनॉक्साईडची गळती शोधता येईल.

कारमध्ये झोपताना एसीचा वापर करू नका…

कारमध्ये हवा येण्यासाठी खिडकी थोडी उघडी ठेवा…

कार सावलीत, सुरक्षित आणि हवेशीर ठिकाणी पार्क करा

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.