फोटो काढला स्मृती इराणी यांनी आणि क्रेडीट घेतलं दुसऱ्यानं, स्मृती इराणी म्हणाल्या…
स्मृती इराणी यांनी यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या शपथविधीदरम्यानचा फोटो क्लिक केला होता. त्यांच्या या फोटोत पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, राजनाथ सिंह, नितीन गडकरी आणि जेपी नड्डा असे भाजपचे बडे नेते एका फ्रेममध्ये दिसत आहेत. मात्र, त्यांनी काढलेल्या या फोटोचे क्रेडीट दुसऱ्याच कुणाला तरी देण्यात आले.
नवी दिल्ली : अलिकडेच योगींच्या नेतृत्वात उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) भाजप सरकारचा (Yogi Aadityanath) भव्य शपथविधी पार पडलाय. त्यानंतर केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani) यांचे एक ट्विट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. स्मृती इराणी यांनी यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या शपथविधीदरम्यानचा फोटो क्लिक केला होता. त्यांच्या या फोटोत पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, राजनाथ सिंह, नितीन गडकरी आणि जेपी नड्डा असे भाजपचे बडे नेते एका फ्रेममध्ये दिसत आहेत. मात्र, त्यांनी काढलेल्या या फोटोचे क्रेडीट दुसऱ्याच कुणाला तरी देण्यात आले. त्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. स्मृती इराणी यांनी 26 मार्च रोजी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर हा फोटो पेस्ट केला होता. ज्याचे कॅप्शन आहे – माझे कुटुंब, भाजप परिवार. याच फोटोत पंतप्रधान मोदींसह भाजपचे इतर दिग्गज नेते दिसत आहेत. मात्र त्यांनी क्लिक केलेल्या या फोटोला क्रेडीट हे एएनआय या वृत्तसंस्थेचे देण्यात आले आहे.
स्मृती इराणी यांचे ट्विट
photo maine kheenchi credit @ANI ko gaya ? pic.twitter.com/gYW3u8mGSA
— Smriti Z Irani (@smritiirani) March 26, 2022
एएनआयच्या संपदकांचे ट्विट
“Bade bade shehron mey aisi choti choti batein hoti hain senorita!” ? https://t.co/WTR5GezJ2o
— Smita Prakash (@smitaprakash) March 26, 2022
स्मृती इशाणी यांनी एएनआयला झापलं
ज्यानंतर स्मृती इराणी यांनी प्रतिक्रिया देत ट्विटरवर लिहिले – ‘मी फोटो काढला, क्रेडीट ANI ला गेले. यासोबत एक दुःखी इमोजीही शेअर केला आहे. स्मृती इराणींच्या या ट्विटला उत्तर देताना एएनआयच्या संपादक स्मिता प्रकाश यांनी लिहिले, ‘बड़े-बड़े शहरों में ऐसी छोटी-छोटी बातें हो जाती हैं सेनोरिटा.’ यासोबत त्यांनी एक हार्टचे इमोजी शेअर केले. स्मिता प्रकाश यांच्या या ट्विटला उत्तराला उत्तर देताना स्मृती इराणी यांनी लिहिले, ‘सेनोरिटा बडे देशचे मोठे संपादक असे बोलले तर बाकीच्या लोकांचे काय होईल. एएनआयसोबत पीटीआयने असेच केले असते तर? त्यानंतर मात्र एनएयच्या संपादकांचा सूर बदलला. आणि त्यानंतर त्यांनी स्मृती इराणी यांची माफी मागितली.
पोस्टवर मजेदार कमेंट
केंद्रीय मंत्र्यांच्या या ट्विटवर ट्विटर यूजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. जेव्हा एका युजरने स्मृती इराणी यांना विचारले की ती ANI मध्ये जॉईन झाला आहे का? तर त्यावर त्या म्हणाल्या- ‘आता एवढंच उरलं होतं आयुष्यात.’ त्याचबरोबर अनेक यूजर्सनी असा फोटो क्लिक केल्याबद्दल स्मृती इराणी यांचे अभिनंदनही केले आहे. अनेक नेत्यांना फोटोग्राफीचा छंद असतो. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेही एक उत्तम फोटोग्राफर आहेत. तसाच छंद स्मृती इराणी यांना आहे. त्यामुळे लोक त्यांच्या फोटोचे कौतुक करत आहे.