सॅनिटायझर नव्हे, कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी साबणच प्रभावी हत्यार
साऊथ वेल्स विद्यापिठाचे प्राध्यापक पॉल थॉर्डर्सन यांनी साबणाला अधिक प्रभावी पर्याय म्हणून सांगितलं आहे.
मुंबई : चीनमध्ये जानेवारी 2020 मध्ये हुबेई प्रांतातील (Soap vs Sanitizer for Corona) वुहान शहरात कोरोना विषाणूचा उगम झाला. कोरोना विषाणूमुळे ‘तीव्र श्वसन रोग’ होतो. आतापर्यंत 107 देशांमध्ये कोरोना विषाणू पसरल्याची नोंद आहे. तर यामुळे जगभरात 4600 पेक्षा जास्त लोकांनी आपला जीव गमावला आहे. (Soap vs Sanitizer for Corona) भारतातही कोरोनाचे 73 रुग्ण समोर आले आहेत.
कोरोनापासून बचावासाठी साबण की सॅनिटायझर?
या जीवघेण्या विषाणूपासून बचावासाठी वारंवार (Soap vs Sanitizer for Corona) साबण किंवा सॅनिटायझरने हात स्वच्छ धुवायचा सल्ला दिला जात आहे. मात्र. आता या विषयावरुन एक वाद सुरु झाला आहे. कोरोना विषाणूपासून बचावासाठी साबण की सॅनिटायझर, काय जास्त फायदेशीर आहे. यावरुन सध्या वाद आहे.
भाजपचे आमदार योगेश सागर तोंडाला मास्क लावून विधानभवनात, भीतीमुळे नाही तर आरोग्याची काळजी घेण्यासाठी मास्क लावला, मी जनजागृती आणि स्वतःची काळजी घेण्यासाठी मास्क लावला आहे. – योगेश सागर @Yogeshsagar09
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 12, 2020
हेही वाचा : सोशल मीडियावर ‘कोरोनाग्रस्तां’चं नाव उघड करताना सावधान
साबण अधिक प्रभावी
साऊथ वेल्स विद्यापिठाचे प्राध्यापक पॉल थॉर्डर्सन यांनी साबणाला अधिक प्रभावी पर्याय म्हणून सांगितलं आहे. साबणाने हात स्वच्छ धुतल्यास विषाणूमधील लिपिडचा लवकर आणि पूर्णपणे नाश होतो असं त्यांचं म्हणणं आहे.
साबणात फॅटी अॅसिड आणि मिठासारखे तत्व असतात. यांना एम्फिफाईल्स म्हणतात. साबणात असलेल्या या तत्त्वांमुळे विषाणूचा बाह्य थर निष्क्रिय होतो. जवळपास 20 सेकंदांपर्यंत हात साबणाने धुतल्याने तो थर नष्ट होतो जो विषाणूला एकमेकांसोबत जोडून ठेवतो.
साबणाने हात धुतल्यानंतर नेहमी हाताची त्वचा (Soap vs Sanitizer for Corona) कोरडी पडते. याचं कारण म्हणजे साबण खोलवर जाऊन स्वच्छता करतो, विषाणूंना नष्ट करतो.
सॅनिटायझर हे कोरोना विषाणूशी लढण्यात साबणाइतका प्रभावी नाही
जॉन हॉपकिंग्स विद्यापिठाच्या शोधानुसार, लिक्विड किंवा क्रिम स्वरुपात असलेलं सॅनिटायझर हे कोरोना विषाणूशी लढण्यात साबणाइतका प्रभावी नाही.
कोरोना विषाणूला तोच सानिटायझर नष्ट करु शकतो ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात अल्कोहोल असेल. मात्र, नेहमी वापरला जाणारा साबण यासाठी जास्त योग्य असल्याचं सांगितलं जात आहे.
कोरोना हा जगभरात पसरलेला साथीचा आजार, WHO कडून घोषणा
“Thousands more are fighting for their lives in hospitals.
In the days and weeks ahead, we expect to see the number of #COVID19 cases, the number of deaths, and the number of affected countries climb even higher”-@DrTedros #coronavirus
— World Health Organization (WHO) (@WHO) March 11, 2020
जागतिक आरोग्य संघटना (WHO) ने कोरोना विषाणूला जगभरात परसलेला साथीचा आजार (WHO Declare Corona As Pandemic) म्हणून घोषित केलं आहे. या विषाणूचा मध्य चीन, इटली, दक्षिण कोरिया आणि इटली या देशांना मोठा फटका बसला आहे. कोरोना विषाणूचा सर्वात मोठा धोका हा इटलीला आहे. इटलीमध्ये आतापर्यंत जवळपास 10,149 लोकांना या विषाणूची लागण झाली आहे. तर तब्बल 630 लोकांचा मृत्यू झाला आहे.
इटली लॉक डाऊन
इटलीने कोरोनाला परसण्यापासून रोखण्यासाठी शहराला लॉक डाऊन केलं. म्हणजेच इटलीच्या नागरिकांवर कुठेही ये-जा करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. तर आखाती देशांनी परदेशी नागरिकांच्या ये-जा करण्यावर प्रतिबंध घातला आहे. तर भारतानेही सर्व देशांचे व्हिसा तात्पुरते रद्द केले आहेत. सामान्य परदेशीयांना भारतात येण्यास मनाई करण्यात आली आहे. 15 एप्रिलपर्यंत परदेशीयांसाठी (Soap vs Sanitizer for Corona ) भारतात प्रतिबंध घालण्यात आले आहेत.
संबंधित बातम्या :
Corona | नागपुरातही कोरोनाबाधित रुग्ण आढळला, राज्यातील संख्या 11 वर
‘समाजानं वाळीत टाकलं’, कोरोना बाधित रुग्णांच्या कुटुंबियांची तक्रार
Corona | 15 एप्रिलपर्यंत परदेशी नागरिकांना भारत बंदी, सर्व व्हिसा रद्द, भारताचा मोठा निर्णय