Teesta Setalvad : सामाजिक कार्यकर्त्या तीस्ता सेटलवाड यांना 2 जुलैपर्यंत पोलीस कोठडी; अहमदाबाद कोर्टाचा निकाल

तीस्ता सेटलवाड यांना 2 जुलै रोजी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. 1 जुलै रोजी अहमदाबादमध्ये जगन्नाथ रथयात्रा आहे. त्यामुळे त्या दिवशी पोलीस बंदोबस्तात गुंतलेले असतील. याच कारणास्तव सेटलवाड यांना दुसर्‍या दिवशी म्हणजेच 2 जुलै रोजी न्यायालयापुढे हजर केले जाईल, असे पोलीस अधिकार्‍यांनी सांगितले.

Teesta Setalvad : सामाजिक कार्यकर्त्या तीस्ता सेटलवाड यांना 2 जुलैपर्यंत पोलीस कोठडी; अहमदाबाद कोर्टाचा निकाल
तीस्ता सेटलवाड यांच्यासह चौघांवर आरोपपत्र दाखलImage Credit source: social media
Follow us
| Updated on: Jun 26, 2022 | 9:57 PM

नवी दिल्ली : सामाजिक कार्यकर्त्या तीस्ता सेटलवाड (Teesta Setalvad) आणि माजी आयपीएस अधिकारी आर. बी. श्रीकुमार (R.B. Shrikumar) या दोघांना आज गुजरातमधील सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्यांना 2 जुलैपर्यंत पोलीस कोठडी (Police Custody) सुनावली आहे. गुजरातच्या अहमदाबाद क्राईम ब्रँचने या दोघांनाही 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यासाठी विनंती केली होती. मात्र न्यायालयाने त्यांची ही विनंती अमान्य करीत 2 जुलैपर्यंत कोठडी मंजूर केली. तिस्ता सेटलवाड आणि माजी आयपीएस आरबी श्रीकुमार यांना आज अहमदाबाद मेट्रोपॉलिटन कोर्टाच्या खोली क्रमांक 22 मध्ये हजर करण्यात आले होते.

तपासासाठी विशेष पथक स्थापन

गुजरातचे डीजीपी आशिष भाटिया यांनी तीस्ता सेटलवाड प्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केले आहे. या टीममध्ये एटीएसचे डीआयजी दीपन भद्रन, डीसीपी क्राइम चैतन्य मंडलिक, एसपी सुनील जोशी आणि एसओजीचे एसीपी बीसी सोलंकी हे सदस्य असणार आहेत. तीस्ता सेटलवाड यांना 2 जुलै रोजी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. 1 जुलै रोजी अहमदाबादमध्ये जगन्नाथ रथयात्रा आहे. त्यामुळे त्या दिवशी पोलीस बंदोबस्तात गुंतलेले असतील. याच कारणास्तव सेटलवाड यांना दुसर्‍या दिवशी म्हणजेच 2 जुलै रोजी न्यायालयापुढे हजर केले जाईल, असे पोलीस अधिकार्‍यांनी सांगितले. पोलिसांच्या विनंतीवरून न्यायालयाने तीस्ता सेटलवाड आणि आरबी श्रीकुमार यांना 2 जुलै रोजी दुपारपर्यंत हजर करण्याची परवानगी दिली आहे.

सेटलवाड यांना 25 जून रोजी मुंबईतून ताब्यात घेतले

तिस्ता सेटलवाड यांना शनिवारी 25 जून रोजी मुंबईतील जुहू येथील घरातून ताब्यात घेण्यात आले. यानंतर एटीएसने त्यांना अहमदाबाद गुन्हे शाखेच्या कार्यालयात आणले. यानंतर श्रीकुमार आणि तीस्ता सेटलवाड यांच्या अटकेबाबत अहमदाबाद क्राइम ब्रँचने पत्रकार परिषदेत माहिती दिली. (Social activist Teesta Setalvad remanded in police custody till July 2)

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका.
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं..
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं...