सोनाली फोगाटला ड्रग्ज दिलं, त्या गोव्यातल्या क्लबवर ही गंभीर कारवाई

सोनाली फोगटच्या मृत्यूनंतर आता काही दिवसांनी आता कर्लीज रेस्टॉरंट पाडण्यासाठी गोवा पोलीस आणि प्रशासनाकडून कारवाईला सुरुवात झाली आहे. हे रेस्टॉरंट पाडण्यासाठी आता मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून रेस्टॉरंटमधील सर्व साहित्य बाहेर काढण्यात येत आहे.

सोनाली फोगाटला ड्रग्ज दिलं, त्या गोव्यातल्या क्लबवर ही गंभीर कारवाई
Follow us
| Updated on: Sep 09, 2022 | 10:47 AM

पणजीः हरियाणातील भाजपच्या नेत्या आणि टिकटॉक फेम सोनाली फोगाट (Sonali Phogat) यांचा काही दिवसापूर्वी गोव्यात मृत्यू झाला होता. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांनी ज्या रेस्टॉरंटमध्ये पार्टी केली होती, त्या रेस्टॉरंटचा एक व्हिडीओ समोर आला होता, आणि त्याच रेस्टॉरंटमध्ये त्यांना ड्रग्सही देण्यात आल्याची माहिती आता समोर आली आहे. आता त्याच कर्लीज रेस्टॉरंटवर (Curly’s Restaurant Goa) बुलडोझर चालवण्याची तयारी केली गेली आहे. कोस्टल रेग्युलेशन झोन (CRZ) च्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी या रेस्टॉरंटवर कारवाई होत असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे शुक्रवार सकाळपासूनच कर्लीज रेस्टॉरंटबाहेर मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

सोनाली फोगाट यांचा काही दिवसापूर्वी गोव्यात संशयास्पद मृत्यू झाला होता. त्यांच्या मृत्यूपूर्वी त्या कर्लीज रेस्टॉरंटमध्येच त्या पार्टी करत होत्या, त्यावेळी त्यांना ड्रग्स दिल्याची माहिती गोवा पोलिसांनी दिली आहे.

कर्लीज रेस्टॉरंटवर बुलडोझर

सोनाली फोगटच्या मृत्यूनंतर आता काही दिवसांनी आता कर्लीज रेस्टॉरंट पाडण्यासाठी गोवा पोलीस आणि प्रशासनाकडून कारवाईला सुरुवात झाली आहे. हे रेस्टॉरंट पाडण्यासाठी आता मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून रेस्टॉरंटमधील सर्व साहित्य बाहेर काढण्यात येत आहे.

अंजूना बिच आणि रेस्टॉरंट

गोव्यातील प्रसिद्ध आणि गर्दीच्या असलेल्या अंजूना बिचवर असलेले हे कर्लीज रेस्टॉरंट सोनाली फोगाट यांच्या पार्टीमुळे चर्चेत आले होते. सोनाली फोगाट यांच्या मृत्युपूर्वी काही तासाआधी सोनाली फोगाट याच रेस्टॉरंटवर पार्टी करताना दिसून आल्या होत्या.

मालकालाही अटक

तर भाजप नेत्याच्या मृत्यूप्रकरणी याच रेस्टॉरंटचा मालक एडविन नून्स याच्यासह चार जणांना अटक करण्यात आली होती, त्यानंतर काही दिवसांनी त्याला जामिनावर सोडूनही देण्यात आले होते.

कोस्टल झोन मॅनेजमेंटकडून कारवाई

ज्या रेस्टॉरंटमध्ये सोनाली फोगाट यांचा मृत्यू झाला, त्या रेस्टॉरंटवर गोवा कोस्टल झोन मॅनेजमेंट अथॉरिटीकडून कारवाई करण्यात येत आहे. 2016 पूर्वीच्या एका प्रकरणात राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणकडूनही या रेस्टॉरंटला कोणताही दिलासा मिळू शकला नव्हता. त्यामुळे आता ही कारवाई होणारच असल्याचे गोवा गोवा कोस्टल झोन मॅनेजमेंटकडून सांगण्यात आले आहे.

Non Stop LIVE Update
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.