Congress : ‘हर घर तिरंगा’ अभियानावरुन राजकारण तापलं; काँग्रेसचा थेट आरोप, चीनशी काय आहे कनेक्शन

Har Ghar Tiranga Campaign : हर घर तिरंगा अभियानावर काँग्रेसने मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. या अभियानाचे चीनशी कनेक्शन असल्याचा गंभीर आरोप पक्षाने केला आहे. गेल्या 2-3 वर्षांपासून या अभियानातील काही मुद्यांवर काँग्रेस सातत्याने बोट दाखवत आहे. सोनिया गांधी यांनी काय केला आरोप?

Congress : 'हर घर तिरंगा' अभियानावरुन राजकारण तापलं; काँग्रेसचा थेट आरोप, चीनशी काय आहे कनेक्शन
सोनिया गांधी यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
Follow us
| Updated on: Aug 20, 2024 | 10:49 AM

राष्ट्रीय सण 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी रोजी ‘हर घर तिरंगा’ अभियानाची जोरदार चर्चा असते. काही दिवसांअगोदरच राष्ट्रध्वजाची जोरदार विक्री होते. पण या अभियानावर काँग्रेसने चीनशी कनेक्शन असल्याचा गंभीर आरोप केला आहे. या अभियानातील काही मुद्यांवर काँग्रेस गेल्या काही वर्षांपासून सातत्याने बोट दाखवत आहे. यावेळी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांनी मोदी सरकारवर दुटप्पीपणाचा गंभीर आरोप केला आहे.

सोनिया गांधीचा हल्लाबोल

सोनिया गांधींचा ‘द हिंदू’ वृत्तपत्रात लेख लिहला आहे. त्यात सोनिया गांधी यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला. ‘हर घर तिरंगा’ कार्यक्रमावरून त्यांनी मोठा आरोप केला आहे. केंद्र सरकारने हाताने बनवलेला खादीचा तिरंगा वापरायचे बंद केले. सरकार पॉलिस्टर तिरंगा वापरत आहे. पॉलिस्टर चीनमधून आयात केले जात आहे. सरकारने खादीची खरेदी कमी केल्याचा आरोपही सोनिया गांधींनी केला. हातानं तयार केलेल्या खादीच्या वस्तूंसाठी जागतिक बाजारपेठ तयार करण्यात केंद्र सरकार अपयशी ठरल्याचा आरोप सोनिया गांधीं यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केला आहे.

हे सुद्धा वाचा

राहुल गांधी यांचा घणाघात

राहुल गांधी यांनी दोन वर्षांपूर्वी हर घर तिरंगा अभियानाचे चीन कनेक्शन असल्याचा आरोप केला होता. त्यांनी फेसबूक पोस्ट लिहिली होती. तिरंगा अभियानाचे चीन कनेक्शन असल्याचा आरोप त्यांनी केला होता. चीनसोबत पंतप्रधानांनी तिरंग्याचा सौदा केल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला होता. यामुळे भारतीय सीमेवर घुसखोरी होत असल्याचा आरोप त्यावेळी त्यांनी केला होता.

त्यानंतर काँग्रेसने देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हातात तिरंगा असल्याचा फोटो डीपीवर ठेवला होता. काँग्रेस कार्यकर्त्यांनी खादीचा वापर कमी होत असल्याचा आरोप मोदी सरकारवर केला आहे. राष्ट्रीय सणाच्या दिवशी खादीची विक्री वाढली होती. पण आता त्यात घट झाल्याचा आरोप करण्यात येत आहे.

चीनवर त्यामुळेच मौन

चीनने भारतीय सीमेत अनेकदा घुसखोरी केली, पण मोदी गेल्या काही वर्षात काहीच बोलले नाहीत. ते मौन धारण करतात. देशाच्या तिरंग्यासाठी खादीचा वापर न करता चीनमधून आयात केलेल्या पॉलिस्टरचा वापर वाढला आहे. एकीकडे चीन देशाच्या सीमेवर घुसखोरी करत असताना चीनकडून पॉलिस्टरची आयात का वाढत आहे, असा सवाल काँग्रेसकडून विचारण्यात येत आहे. या मुद्यावरुन सध्या राजकारण तापले आहे.

भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार.
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?.
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?.
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'.
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत...
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत....
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच.
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?.
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी.
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम.
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?.