Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वृद्ध मनमोहन सिंगांपासून राहुल गांधींना धोका नव्हता, म्हणूनच सोनियांकडून पंतप्रधानपदी निवड : ओबामा

अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांनी आपल्या पुस्तकात तत्कालीन भारतीय राजकीय परिस्थितीवर भाष्य केले आहे.

वृद्ध मनमोहन सिंगांपासून राहुल गांधींना धोका नव्हता, म्हणूनच सोनियांकडून पंतप्रधानपदी निवड : ओबामा
Follow us
| Updated on: Nov 17, 2020 | 10:50 AM

वॉशिंग्टन : “काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी नेमकेपणाने मनमोहन सिंग (Manmohan Singh) यांची पंतप्रधानपदासाठी निवड केली. राजकीय वारसा नसलेल्या वृद्ध शीख गृहस्थामुळे त्यांच्या चाळीस वर्षीय मुलाला कोणताही संभाव्य धोका नव्हता. कारण राहुल गांधींना (Rahul Gandhi) काँग्रेस पक्षाची कमान घेण्यासाठी त्या सज्ज करत होत्या” अशा शब्दात अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा (Barack Obama) यांनी आपल्या पुस्तकात तत्कालीन भारतीय राजकीय परिस्थितीवर भाष्य केले आहे. (Sonia Gandhi chose Manmohan Singh because he posed no threat to Rahul Gandhi Says Barack Obama)

बराक ओबामा यांच्या अध्यक्षीय कारकिर्दीतील अनुभवांवर आधारित ‘अ प्रॉमिस्ड लँड’ (A Promised Land) या पुस्तकाची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. काही दिवसांपूर्वीच या पुस्तकातील राहुल गांधी यांच्याविषयीची टिप्पणी भारतातील राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय झाली होती. यानंतर आता पुन्हा एकदा हे पुस्तक चर्चेत आले आहे.

बराक ओबामा यांनी ‘अ प्रॉमिस्ड लँड’ (A Promised Land) या पुस्तकात डिसेंबर 2010 मध्ये भारत दौऱ्यावर असतानाचा एक किस्सा सांगितला आहे. त्यावेळी बराक ओबामा यांच्या सन्मानार्थ मेजवानीचे आयोजन करण्यात आले होते. या मेजवानीला काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी हेदेखील उपस्थित होते.

“ही मेजवानी रात्री उशिरापर्यंत सुरु होती. डॉ. मनमोहन सिंग यांचा थोड्या थोड्या वेळाने पाण्याचा घोट घेत झोप घालवण्याचा प्रयत्न माझ्या नजरेतून सुटला नाही. त्यामुळे उशीर होत असल्याचे माझ्या लक्षात आले. निरोप घेण्याची वेळ आली अस मी मिशेलला खुणावलं. पंतप्रधान आणि त्यांच्या पत्नी आम्हाला सोडायला कारपर्यंत आल्या. त्या मंद उजेडात मला थकलेले पंतप्रधान त्यांच्या वयापेक्षा अधिक वृद्ध वाटले. तिथून निघताना ही व्यक्ती पदावरून पायउतार झाल्यानंतर कसं होईल हाच प्रश्न माझ्या मनात घोळत होता” असे बराक ओबामा यांनी पुस्तकात म्हटले आहे.

मुंबईवरील 26/11च्या दहशतवादी हल्ल्यानंतर मनमोहन सिंग यांनी पाकिस्तानला तात्काळ प्रत्युत्तर न देण्याचा निर्णय घेतला. मात्र, या संयमाची राजकीय किंमत त्यांना चुकवावी लागली. यानंतर त्यांनी एकदा माझ्याशी बोलताना भारतातील मुस्लिमविरोधी लाटेमुळे भाजपच्या वाढत्या ताकदीविषयी चिंता व्यक्त केली होती. (Sonia Gandhi chose Manmohan Singh because he posed no threat to Rahul Gandhi Says Barack Obama)

भारतामध्ये धार्मिक आणि वांशिक ध्रुवीकरण उन्माद निर्माण करणारे ठरेल. अशा गोष्टींचा फायदा उठवणे राजकारण्यांसाठी फार अवघड नसते, असे मनमोहन सिंग यांनी ओबामा यांना सांगितले होते.

संबंधित बातम्या:

राहुल गांधींना काहीतरी करून दाखवायचेय पण त्यांची गुणवत्ता आणि पॅशन अपुरी पडते: बराक ओबामा

मनमोहन सिंग पंतप्रधानपदावरुन पायउतार झाल्यानंतर कसं होणारं हा प्रश्न मला पडला होता: ओबामा

(Sonia Gandhi chose Manmohan Singh because he posed no threat to Rahul Gandhi Says Barack Obama)

पहलगाम घटनेनंतर काही तासातच बारामुल्लातही दहशतवादी कारवाया
पहलगाम घटनेनंतर काही तासातच बारामुल्लातही दहशतवादी कारवाया.
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्याचा पहिला फोटो
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्याचा पहिला फोटो.
डोंबिवलीवर शोककळा; संजय लेले यांचं कुटुंब काश्मीरकडे रवाना
डोंबिवलीवर शोककळा; संजय लेले यांचं कुटुंब काश्मीरकडे रवाना.
नागपूरचे तिलक रूपचंदानी पहलगाममध्ये फसले; हल्ल्यात पत्नी जखमी
नागपूरचे तिलक रूपचंदानी पहलगाममध्ये फसले; हल्ल्यात पत्नी जखमी.
कश्मीरच्या पहलगाम येथे सर्वात मोठा अतिरेकी हल्ला,२७ पर्यटक ठार
कश्मीरच्या पहलगाम येथे सर्वात मोठा अतिरेकी हल्ला,२७ पर्यटक ठार.
शेलार ठाकरेंना 'लँड माफिया' म्हणताच पेडणेकरांकडून 'झोलर'ची आठवण...
शेलार ठाकरेंना 'लँड माफिया' म्हणताच पेडणेकरांकडून 'झोलर'ची आठवण....
युगेंद्रला साथ द्या, नातवासाठी शरद पवारांची साद म्हणाले, इथून पुढेही..
युगेंद्रला साथ द्या, नातवासाठी शरद पवारांची साद म्हणाले, इथून पुढेही...
'मी सिनिअर मंत्री आता...', चंद्रकांत पाटलांचं लक्ष फडणवीसांच्या पदावर?
'मी सिनिअर मंत्री आता...', चंद्रकांत पाटलांचं लक्ष फडणवीसांच्या पदावर?.
'हिंदी' भाषा सक्तीवरून सरकारची माघार, घेतला मोठा निर्णय; यापुढे...
'हिंदी' भाषा सक्तीवरून सरकारची माघार, घेतला मोठा निर्णय; यापुढे....
राज-उद्धव एकत्र आल्यास मुंबई कोणाची? युती सत्ताधार्‍यांसाठी डोकेदुखी?
राज-उद्धव एकत्र आल्यास मुंबई कोणाची? युती सत्ताधार्‍यांसाठी डोकेदुखी?.