Sonia Gandhi ED Inquiry : सोनिया गांधींची ईडी चौकशी संपली, अडीच तासानंतर सोनिया ईडी कार्यालयातून बाहेर

काँग्रेसच्या प्रभारी अध्यक्षा सोनिया गांधी यांची अंमलबजावणी संचलनालय अर्थात ईडीकडून चौकशी करण्यात आली. साधारण 12 वाजता सोनिया गांधी दिल्लीतील ईडी कार्यालयात हजर झाल्या. जवळपास अडीच तास त्यांची ईडी चौकशी चालली.

Sonia Gandhi ED Inquiry : सोनिया गांधींची ईडी चौकशी संपली, अडीच तासानंतर सोनिया ईडी कार्यालयातून बाहेर
Follow us
| Updated on: Jul 21, 2022 | 3:06 PM

नवी दिल्ली : नॅशनल हेराल्ड प्रखरणात काँग्रेसच्या प्रभारी अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांची अंमलबजावणी संचलनालय अर्थात ईडीकडून (Enforcement Directorate) चौकशी करण्यात आली. साधारण 12 वाजता सोनिया गांधी दिल्लीतील ईडी कार्यालयात हजर झाल्या. जवळपास अडीच तास त्यांची ईडी चौकशी चालली. या चौकशी दरम्यान प्रियंका गांधीही (Priyanka Gandhi) सोनिया यांच्यासोबत ईडी कार्यालयात हजर होत्या. सोनिया गांधी यांच्या घशाला त्रास होत असल्याने त्या ईडीच्या प्रश्नांना लेखी उत्तरे दिल्याची माहिती मिळतेय. मागच्या महिन्यात राहुल गांधी यांचीही ईडीने चौकशी केली होती. त्यांची सलग तीन दिवस अनेक तास चौकशी करण्यात आली होती. त्यामुळे सोनिया गांधी यांची किती तास चौकशी होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं.

सोनिया गांधी या ईडीच्या चौकशीला सामोरे गेल्या. या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून देशभरात जोरदार आंदोलनं करणात आली. मोदी हाय, मोदी हायच्या घोषणा यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी दिल्या. सोनिया गांधी यांना ईडीची नोटीस आल्यानंतर गेल्या आठवड्यातच काँग्रेसकडून कार्यकर्त्यांना देशभर आंदोलन करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार महाराष्ट्रासह देशभर आज जोरदार आंदोलनं करण्यात आली. राज्यात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या सूचनेनुसार आंदोलन करण्यात आलं. मुंबईत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष भाई जगताप, सोलापुरात प्रणिती शिंदे, साताऱ्यात पृथ्वीराज चव्हाण, अमरावतीत यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वात आंदोलन केलं गेलं. नागपूर, ठाणे, भिवंडीसह राज्यातील अनेक भागातही आंदोलनं झाली.

काय आहे नॅशनल हेराल्ड केस?

2012 मध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी ट्रायल कोर्टात याचिका दाखल करून आरोप केला होता की काही काँग्रेस नेत्यांनी (राहुल-सोनिया गांधींव्यतिरिक्त) यंग इंडिया लिमिटेड (YIL) मार्फत असोसिएटेड जर्नल्स लिमिटेडचे ​​चुकीच्या पद्धतीने अधिग्रहण करण्यात आले आहे. (AJL) ताब्यात घेण्यात आले आहे. 2000 कोटींची दिल्लीतील बहादूर शाह जफर मार्गावर असलेल्या हेराल्ड हाऊसची इमारत ताब्यात घेण्यासाठी हे सर्व केल्याचा आरोप स्वामी यांनी केला होता.

काय आहे संपूर्ण घटना

गांधी कुटुंबाने काँग्रेस पक्षाचा निधी वापरून एजेएल मिळवल्याचा आरोप स्वामी यांनी केला आहे. स्वामींच्या आरोपांवर विश्वास ठेवायचा असेल, तर असोसिएटेड जर्नल्स लिमिटेडची 2000 कोटी रुपयांची मालमत्ता हस्तगत करण्याचा त्यांचा उद्देश होता.

2008 मध्ये नॅशनल हेराल्ड बंद होत असताना काँग्रेसचे असोसिएटेड जर्नल्स लिमिटेडवर 90 कोटी रुपयांचे कर्ज होते. हे कर्ज पुन्हा वृत्तपत्र चालवण्यासाठी देण्यात आले. पण वृत्तपत्राचे चालवणे शक्य झाले नाही. आणि एजेएलला हे कर्ज काँग्रेसला परत करता आले नाही. यानंतर, 26 फेब्रुवारी 2011 रोजी, काँग्रेसने असोसिएटेड जर्नल्स लिमिटेडचे ​​90 कोटी रुपयांचे दायित्व ताब्यात घेतले. याचाच अर्थ पक्षाने 90 कोटींचे कर्ज दिले होते.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.