Sri Lanka; श्रीलंकेच्या संकटाविषयी सोनिया गांधींना म्हणाल्या; या वाईट काळात आम्ही तुमच्यासोबत आहोत; तुमच्या मदतीसाठी भारत प्रयत्नशील राहिल
मुंबईः श्रीलंकेतील सामाजिक, आर्थिक आणि राजकीय परिस्थिती अस्थिर झालेली असतानाच भारतातून काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांनी पत्राद्वारे श्रीलंकेविषयी आपली भावना व्यक्त करत म्हटले आहे की, श्रीलंकेच्या या गंभीर संकटाच्या वेळी आम्ही श्रीलंकेसोबत आहोत, त्याविषयी तेथील लोकांसोबत आम्ही एकतेची भावना व्यक्त करत असून आशा करते की ते त्यावर श्रीलंकेतील नागरिक मात करू शकतील. सध्या श्रीलंकेला […]
मुंबईः श्रीलंकेतील सामाजिक, आर्थिक आणि राजकीय परिस्थिती अस्थिर झालेली असतानाच भारतातून काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांनी पत्राद्वारे श्रीलंकेविषयी आपली भावना व्यक्त करत म्हटले आहे की, श्रीलंकेच्या या गंभीर संकटाच्या वेळी आम्ही श्रीलंकेसोबत आहोत, त्याविषयी तेथील लोकांसोबत आम्ही एकतेची भावना व्यक्त करत असून आशा करते की ते त्यावर श्रीलंकेतील नागरिक मात करू शकतील. सध्या श्रीलंकेला सतत आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे श्रीलंकेतील परिस्थिती प्रचंड वाईट झाली (situation in Sri Lanka is hugely bad) आहे. त्या परिस्थितीला कंटाळूनच लोक रस्त्यावर आले आहेत. वाईट काळ आल्यानेच तेथील लोक सरकारविरोधात नागरिक रस्त्यावर उतरून निदर्शनं करत आहेत. श्रीलंकेतील परिस्थिती प्रचंड वाईट असल्या कारणानेच काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी श्रीलंकेतील नागरिकांसोबत आपण असल्याचे म्हटले आहे.
Congress expresses its solidarity with Sri Lanka & its people in this moment of grave crisis & hopes they’ll be able to overcome it. We hope India will continue to assist people&govt of Sri Lanka as they deal with difficulties of the current situation: Congress chief Sonia Gandhi pic.twitter.com/3JYwpgNsDt
— ANI (@ANI) July 10, 2022
या काळात आम्ही तुमच्यासोबत
सोनिया गांधी यांनी या पत्रात म्हटले आहे की, काँग्रेस या गंभीर संकटाच्या वेळी श्रीलंका आणि तेथील जनतेसोबत आहे. आणि आम्हाला आशा आहे की, तेथील नागरिक या संकटावर मात करू शकतील. त्यासोबतच, त्यांनी आशा व्यक्त केली की, भारत श्रीलंकेच्या लोकांना आणि सरकारला सध्याच्या परिस्थितीच्या अडचणींचा सामना करत असताना त्यांना ते मदत करत राहतील अशी भावनाही त्यांनी त्या पत्रातून व्यक्त केली आहे.
सोनिया गांधींकडून आंतरराष्ट्रीय पातळीवरही आवाहन
सोनिया गांधी यांनी त्यामध्ये म्हणाल्या आहेत की, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस श्रीलंकेतील बदलत्या राजकीय परिस्थितीचा विचार करत आहे. आर्थिक आव्हाने, वाढत्या किंमती आणि अन्न, इंधन आणि जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा यामुळे तेथील लोकांमध्ये प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. ही भावना व्यक्त करत असतानाच त्या म्हणाल्या की, काँग्रेस पक्षाकडून आंतरराष्ट्रीय पातळीवरील विविध गटाना, समुदायांना आवाहन करत आहे की, श्रीलंकेला सर्वतोपरी मदत आणि पाठिंबा द्या.
परराष्ट्र खात्याकडूनही पाठिंबा
सोनिया गांधी यांनी पत्र लिहिण्यापूर्वीही परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी स्पष्ट केले होते, की, आम्ही श्रीलंकेला पाठिंबा देत आहोत, आणि वाईट काळात त्यांना मदत करण्याचा आम्ही नेहमीच प्रयत्न करू.
परकीय चलनाची कमतरता
श्रीलंकेला अभूतपूर्व आर्थिक उलथापालथीचा सामना करावा लागत आहे. 22 कोटी लोकसंख्या असलेल्या या देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच या वाईट काळातून श्रीलंका जात आहे. श्रीलंकेकडे परकीय चलनाची कमतरता असून ज्यामुळे देश इंधन आणि इतर आवश्यक वस्तूंच्या आयातीसाठी पैसे देऊ शकत नाहीत. त्यामुळे या परिस्थितीत तेथील नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. श्रीलंकेच्या संसदेचे अध्यक्ष महिंदा यापा अभयवर्धने यांनी शनिवारी रात्री स्पष्ट केले आहे की, राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे हे 13 जुलै रोजी राजीनामा देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.