Sonia Gandhi’s letter on Agneepath : ‘अग्निपथ’ दिशाहीन योजना; तरुणांनी हिंसक आंदोलन करू नये, सोनिया गांधीचे तरूणांना शांत राहण्याचे आवाहन
सोनिया गांधींनी लिहिले की, मला तुमची वेदना समजते. सरकारने गेल्या तीन वर्षांपासून रिक्त जागांची भरती केली नाही. त्याचबरोबर हवाई दलासाठी परीक्षा घेऊनही त्याचा निकाल लागलेला नाही.
नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या अग्निपथ (Agneepath Scheme) या लष्कर भरतीच्या योजनेला तीव्र विरोध होत आहे. अनेक ठिकाणी तरुणांनी हिंसक आंदोलन करत आहेत. बिहारमध्ये सुरू झालेले हे आंदोलन आता उग्र रूप घेताना दिसत आहे. तर बिहारमध्ये सलग चौथ्या दिवशीही हिंसक निदर्शने सुरूच आहेत. पाटण्यासह राज्यातील 6 ठिकाणी आंदोलकांनी पोलिसांवर हल्ले केले. काही ठिकाणी पोलीस आणि आंदोलकांमध्ये गोळीबारही झाला. या उग्र निदर्शनानंतर याचे पडसाद देशातील 13 राज्यांमध्ये उमटत आहेत. मात्र बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये याचा सर्वाधिक परिणाम दिसून आला आहे. बिहारमध्ये आंदोलकांनी 14 रेल्वे गाड्या जाळल्या. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Congress President Sonia Gandhi) यांनी आंदोलक तरुणांना पत्र (letter to youth) लिहिले आहे. त्यांनी हे पत्र रुग्णालयात असताना लिहिले आहे. त्यांनी आपल्या पत्रात, तरुणांना अहिंसक पद्धतीने लढा देण्याचे आवाहन केले आहे. तसेच अग्निपथ योजना ही दिशाहीन आहे. तर आम्ही तरुणांच्या पाठीशी आहोत असेही त्यांनी म्हटलं आहे.
तसेच सोनिया गांधींनी पत्रात म्हटले आहे की, ही योजना पूर्णपणे दिशाहीन असून तरुणांची फसवणूक करणारी आहे. या योजनेवर संरक्षण तज्ज्ञ आणि माजी सैनिकांनी देखील प्रश्न केला आहे. ही योजना परत घेण्यासाठी काँग्रेस अहिंसक आंदोलन करेल.
I’m sad that govt ignored your voice & announced a new scheme that is completely directionless… I appeal to all of you to protest peacefully in a non-violent manner. Indian National Congress is with you: Congress chief Sonia Gandhi on #AgnipathRecruitmentScheme pic.twitter.com/BdwjtQeyUK
— ANI (@ANI) June 18, 2022
3 वर्षांपासून रिक्त जागा निघाल्या नाहीत
सोनिया गांधींनी लिहिले की, मला तुमची वेदना समजते. सरकारने गेल्या तीन वर्षांपासून रिक्त जागांची भरती केली नाही. त्याचबरोबर हवाई दलासाठी परीक्षा घेऊनही त्याचा निकाल लागलेला नाही. आणि ज्यांचा निकाल लागला आहे त्यांना नियुक्तीची प्रतीक्षा करावी लागत आहे. आम्ही हे दुःख समजतो आणि तुमच्यासोबत आहोत.
सोनिया गांधी सात दिवसांपासून रुग्णालय
कोरोनाची लक्षणे दिसू लागल्याने सोनिया गांधी यांची प्रकृती अचानक बिघडली. तसेच त्यांना 12 जून रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर दिल्लीतील गंगाराम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 2 जून रोजी सोनिया गांधी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्या होत्या.
उद्या जंतरमंतरवर काँग्रेसचे आंदोलन
अग्निपथ योजनेच्या निषेधार्थ काँग्रेस उद्या म्हणजेच 19 जून रोजी दिल्लीतील जंतरमंतरवर आंदोलन करणार आहे. काँग्रेसच्या म्हणण्यानुसार, पक्षाचे खासदार, कार्यकारिणी सदस्य आणि AICC पदाधिकारी या सत्याग्रहात सहभागी होणार आहेत. येथे राहुल गांधी यांनी ट्विट करत सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले, सलग 8 वर्षे भाजप सरकारने जय जवान, जय किसानच्या मूल्यांचा अपमान केला आहे. पंतप्रधानांना काळा शेती कायदा मागे घ्यावा लागेल, असे मी यापूर्वीही म्हटले होते. त्याचप्रमाणे त्यांना मन मोठे करत देशातील तरुणांची ही मागणी मान्य करावी लागेल आणि अग्निपथ परत घ्यावा लागेल.