भारत जोडो यात्रेला मिळणार ‘माये’चा आधार; गांधी पर्वासाठी जय्यत तयारी….
राहुल गांधी यांनी काढलेल्या भारत जोडो यात्रेत आता सोनिया गांधीही सहभागी होणार आहेत. यासाठी कर्नाटकात उंचच उंच बॅनरबाजी केली गेली आहे.
म्हैसूरः देशातील सगळ्यात जुना पक्ष म्हणून काँग्रेसची (Congress) ओळख असली तरी, 2014 नंतर मात्र काँग्रेसची देशात प्रचंड वाईट अवस्था झाली. त्यामुळे काँग्रेस पक्ष आता आपल्या अस्तित्वाची नवी ओळख शोधण्यासाठी राहुल गांधी आता मैदानात उतरले आहेत. राहुल गांधींनी (Rahul Gandi) काढलेली भारत जोडो यात्रा आता कर्नाटकात असून ती यात्रा आता म्हैसूरमध्ये आली आहे. या भारत जोडो यात्रेच्या दरम्यान काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) सोमवारी कर्नाटकात पोहोचल्या आहेत.
त्या आल्या असल्या तरी काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी आपल्या आईसोबत या यात्रेला उपस्थित राहणार की नाही हे अद्याप स्पष्ट अजून तरी स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे आता काँग्रेसच्या नेत्यांनाही गांधी घराण्याविषयी उत्सुकता लागून राहिलेली आहे.
राहुल गांधी यांनी काढलेल्या काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेला 25 दिवस पूर्ण झाले आहेत. केरळनंतर आता कर्नाटकात आली असून पक्षातील अनेक दिग्गज नेतेही या यात्रेसाठी हजेरी लावत आहेत.
सोनिया गांधीही आता कर्नाटकात पोहचल्याने त्या 6 ऑक्टोबर रोजी भारत जोडो यात्रेत सामील होणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यांच्याशिवाय काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधीही भारत जोडो यात्रेला उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
कर्नाटकातील भारत जोडो यात्रेदरम्यान 6 ऑक्टोबर रोजी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी काँग्रेस नेत्यांचीही भेट घेणार आहेत.
या भारत जोडो यात्रेत सोनिया गांधी यांच्यासोबत काँग्रेसचे नेते, कार्यकर्तेही सहभागी होणार आहेत. कर्नाटकातील काही कामगार संघटनाही या यात्रेत सहभागी होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
सोनिया गांधी कुर्गमधील मडकेरी येथे जाणार असून त्या एका खासगी रिसॉर्टमध्ये मुक्काम करणार आहेत. म्हैसूरमध्ये भारत जोडो यात्रा संपल्यानंतर राहुल गांधी मडकेरीलाही जाणार आहेत.
मडकेरीला ते आपली आई सोनिया गांधी यांच्यासोबत दोन दिवस थांबणार असून त्यानंतर 6 ऑक्टोबर रोजी ते भारत जोडो यात्रेत पुन्हा सहभागी होणार आहेत.
काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधीही आपल्या आईसोबत या यात्रेत सहभागी होणार की नाही याबाबत काँग्रेसकडू अजून काहीही स्पष्ट सांगण्यात आले नाही.
राहुल गांधी आणि इतर अनेक काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांनी 7 सप्टेंबर रोजी तामिळनाडूतील कन्याकुमारी येथून भारत जोडो यात्रेला सुरुवात केली होती. त्यानंतर ही यात्रा कर्नाटकात असून या यात्रेचा समारोप काश्मिरमध्ये होणार आहे.