नवी दिल्ली: काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Congress President Sonia Gandhi) लवकरच वैद्यकीय तपासणीसाठी परदेशात जाणार (Abroad tour) असून प्रियंका आणि राहुल गांधीही त्यांच्यासोबत जाणार असल्याची माहिती काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश (Jayram Ramesh) यांनी मंगळवारी रात्री ही माहिती दिली. मात्र, सोनिया गांधी परदेशात कधी जाणार हे त्यांनी स्पष्ट केले नाही. 4 सप्टेंबर रोजी रामलीला मैदानावर काँग्रेसच्या ‘महंगाई पर हल्ला बोल’ या रॅलीला राहुल गांधी उपस्थित राहणार असल्याचेही जयराम रमेश यांनी सांगितले. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी वैद्यकीय तपासणीसाठी परदेशात जाणार असून यावेळी त्या आपल्या आजारी आईचीही भेट घेणार आहेत. त्यानंतर त्या मायदेशी परत येतील असंही काढलेल्या निवेदनात सांगण्यात आला आहे.
Sonia Gandhi to travel abroad for medical check-up along with Rahul, Priyanka
Read @ANI Story | https://t.co/lEZUPnhHr2#SoniaGandhi #RahulGandhi #PriyankaGandhiVadra pic.twitter.com/dMSqYyHSPD
— ANI Digital (@ani_digital) August 24, 2022
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासोबत राहुल आणि प्रियंका गांधीही असणार आहेत. मात्र त्यानंतर राहुल गांधी 4 सप्टेंबर रोजी काँग्रेसच्या रॅलीला संबोधित करणार असल्याचेही जयराम रमेश यांनी सांगितले.
सोनिया गांधी यांना नुकतीच कोरोनाची लागण झाली आहे. सोनिया गांधी आपल्या वैद्यकीय तपासणीसाठी परदेशी जात असतानाच काँग्रेसची भारत जोडो यात्रा आणि पक्षाध्यक्षपदाची निवडणुकीची तयारीही काँग्रेसकडून केली जात आहे.
मंगळवारी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी भारताच्या नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची दिल्लीतील राष्ट्रपती भवनात भेट घेऊन काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या अंतर्गत मतभेदाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी यावेळी राष्ट्रपती मुर्मू यांची भेट घेतली.
काही दिवसापूर्वी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आनंद शर्मा यांनी पक्षातील राजकीय मतभेदामुळे काँग्रेसच्या सुकाणू समितीच्या अध्यक्षपदावरून राजीनामा देणार असल्याचे सांगण्यात आले होते, त्याबाबतही यावेळी चर्चा करण्यात आली. या दरम्यान, आनंद शर्मा यांची नाराजी दूर करण्यासाठी हिमाचल प्रदेशचे काँग्रेसचे प्रभारी राजीव शुक्ला यांना आनंद शर्मा यांच्याकडे पाठवण्यात आले होते, त्यांच्या भेटीनंतर शुक्ला यांनी सोनिया गांधींना भेटण्यासाठी दिल्लीला आले होते.