आता बर्ड फ्लूचं संकट!, कोहलीसह धोनीच्या आवडत्या ‘कडकनाथ’ला वाचवण्यासाठी खास प्रयत्न
कडकनाथ कोंबड्यांची इम्युनिटी पॉवर वाढवण्यासाठी पारंपरिक उपाययोजना आणि विटॅमिन्सचा उपयोग केला जात आहे.
नवी दिल्ली: मध्यप्रदेशात सध्या बर्ड फ्लूने थैमान घातलं आहे. तिथे आतापर्यंत 7 ते 8 जिल्ह्यांमध्ये बर्ड फ्लूचा फैलाव वाढत आहे. बर्ड फ्लू मुळे 400 हून अधिक कावळ्यांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब ही की बर्ड फ्लू अद्याप पोल्ट्री फार्मपर्यंत पोहोचला नाही. या पार्श्वभूमीवर झाबुआ जिल्ह्यातील प्रसिद्ध कडकनाथ कोंबड्यांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आलं आहे. (Special efforts to save Kadaknath hens in bird flu crisis)
झाबुआच्या कृषी विज्ञान केंद्राचे निर्देशक डॉक्टर आय. एस. तोमर यांनी सांगितल्याप्रमाणे जिल्हा मुख्यालयातील हॅचरीमध्ये कोंबड्यांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलं आहे. त्याचबरोबर कडकनाथ कोंबड्यांची इम्युनिटी पॉवर वाढवण्यासाठी पारंपरिक उपाययोजना आणि विटॅमिन्सचा उपयोग केला जात आहे.
केंद्र सरकारकडून नियमावली जारी
बर्ड फ्लूच्या फैलावाची शक्यता लक्षात घेता केंद्र सरकारकडून दिशानिर्देश जारी करण्यात आले आहेत. त्यानुसार पोल्ट्री फार्ममधील कोंबड्यांना विटॅमिन्सचा डोस जिला जात आहे. कडकनाथ कोंबड्यांमध्ये बर्ड फ्लूचा फैलाव होऊ नये यासाठी महत्वाची पाऊलं उचलली जात आहेत. बाहेरिल लोकांना हॅचरीमध्ये जाण्यापासून प्रतिबंध घालण्यात आला आहे. तसंच कोंबड्यांना होणारा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पारंपरिक उपाययोजनाही राबवल्या जात आहेत.
After confirmation of bird flu in Rajasthan, Madhya Pradesh, Himachal Pradesh & Kerala, Dept of Animal Husbandry & Dairying, GoI has set up a control room in New Delhi to take stock on a daily basis of preventive & control measures undertaken by State authorities: Govt of India
— ANI (@ANI) January 6, 2021
मध्यप्रदेशातील खरगोन, इंदोर, मंदसोर, आगर, खरगोन, उज्जैन, देवास, नीमच आणि सीहोर या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कावळ्यांचा मृत्यू होत आहे. कावळे मृतावस्थेत सापडत असल्यानं पशुपालन विभागही अलर्टवर आहे. जिथे कावळे मृतावस्थेत सापडत आहेत, त्या परिसरातील कावळ्यांची चाचणी करण्यात येत आहे. तसंच परिसरातील पोल्ट्री फार्ममध्येही तपासणी सुरु असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आलीय.
बर्ड फ्लू म्हणजे काय?
बर्ड फ्लू एवियन इन्फ्लूएंजा वायरस (H5N1) मुळे होतो. बर्ड फ्लू एकप्रकारे व्हायरल इन्फेक्शन आहे. हा आजार फक्त पक्ष्यांनाच नाही तर जनावरं आणि माणसांनाही होऊ शकतो. संसर्ग झालेल्या पक्ष्याच्या संपर्कात आल्यास बर्ड फ्लू होऊ शकतो. योग्यवेळी आणि योग्य उपचार न मिळाल्यास माणूस दगावण्याचीही भीती असते.
कडकनाथ कोंबड्यांची वैशिष्ट्ये
कडकनाथ कोंबडा हा खासकडून मध्यप्रदेशातील झाबुआ जिल्ह्यातील म्हणून ओळखला जातो पण तो आता देशभरात मिळतो. कडकनाथ कोंबड्याच्या अंड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटीन असतं. तसंच कोलेस्टेरॉलचं प्रमाण कमी असल्यामुळे हृदयविकार असलेले रुग्णही ते खाऊ शकतात. तसंच कडकनाथ कोंबड्यांचं मांस आरोग्यासाठी उपयुक्त असल्याचंही तज्ज्ञ सांगतात.
कोहलीपासून धोनीपर्यंत सर्वांना कडकनाथची आवड
कडकनाथ कोंबड्याचं मांस आता अत्यंत लोकप्रिय होत आहे. कडकनाथ कोंबड्याच्या चिकनचं कौतुक भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीपासून महेंद्रसिंग धोनीपर्यंत सर्वांनी केलं आहे. इतकच नाही तर धोनीने कडकनाथ कोंबड्यांचं पालनही सुरु केलं आहे. त्याचबरोबर अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींमध्येही कडकनाथ कोंबड्याची क्रेझ पाहायला मिळते.
संबंधित बातम्या:
Birds Dying in India :कोरोनानंतर बर्ड फ्लूचं संकट?, देशभरात हजारो पक्षांचा मृत्यू, राजस्थानात हायअलर्ट
Bird Flu | आधी कोरोना त्यातच पुन्हा ‘बर्ड फ्लू’चा शिरकाव, ‘ही’ लक्षणे दिसताच घ्या वैद्यकीय मदत!
Special efforts to save Kadaknath hens in bird flu crisis