Special Story | ऐतिहासिक सोमनाथ मंदिर, 17 वेळा नष्ट होऊनही भारताचं वैभव
सोमनाथ मंदिराला 17 वेळा नष्ट करण्यात आलं आहे आणि प्रत्येकवेळी या मंदिराची पुनर्रचना करण्यात आली आहे.
नवी दिल्ली : जगप्रसिद्ध सोमनाथ मंदिर आज पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे, ते पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यामुळे (History Of Somnath Temple). सोमनाथ मंदिराच्या ट्रस्टचे मुख्य चेअरमन म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नियुक्ती होणार आहे. हा ट्रस्ट गुजरातच्या गिर-सोमनाथ जिल्ह्यातील सोमनाथ मंदिराची देखरेख करते. या ट्रस्टच्या चेअरमनपदी नियुक्ती होणारे मोदी हे दुसरे पंतप्रधान आहेत. यापूर्वी मोरारजी देसाई असे पहिले पंतप्रधान होते ज्यांना सोमनाथ मंदिर ट्रस्टचे चेअरमन म्हणून नियुक्त करण्यात आले होते (History Of Somnath Temple).
Prime Minister Narendra Modi becomes the president of Somnath Temple Trust, tweets Union Home Minister Amit Shah
(Photo credit – Twitter account of the home minister) pic.twitter.com/0Eos8vgIPM
— ANI (@ANI) January 18, 2021
पण काय तुम्हाला सोमनाथ मंदिराच्या इतिहासाबाबत माहितीये का?
इतिहासकारांच्या मते, सोमनाथ मंदिराला 17 वेळा नष्ट करण्यात आलं आहे आणि प्रत्येकवेळी या मंदिराची पुनर्रचना करण्यात आली आहे. प्राचीन भारतीय इतिहास आणि आधुनिक भारताच्या इतिहासात सोमनाथ मंदिराला 1024 मध्ये महमूद गजनवीने पूर्णपणे नष्ट केलं होतं. मूर्ती तोडण्यापासून ते मंदिरावर चढवण्यात आलेल्या सोने-चांदीच्या सर्व दागिन्यांना लूटून नेलं होतं .
लोहपुरुष सरदार वल्लभ भाई पटेलांकडून पुनर्निर्माण केलं
स्वतंत्र भारताच्या एका परियोजनेत सोमनाथ मंदिराचा पुनर्निर्माण करण्यात आला. सध्याच्या मंदिराचं पुनर्निर्माण स्वातंत्र्यानंतर लोहपुरुष सरदार वल्लभ भाई पटेलने 1951 मध्ये केलं होतं. 1 डिसेंबर 1995 ला भारताचे राष्ट्रपती शंकर दयाल शर्मा यांनी या मंदिराला देशाला समर्पित केलं होतं. जुनागड रियासतला भारतचा भाग बनवल्यानंतर भारताचे माजी गृहमंत्री सरदार पटेल यांनी जुलै 1947 मध्ये सोमनाथ मंदिराच्या पुनर्निर्माणाचे आदेश दिले.
गांधींच्या सांगण्यावरुन जनतेकडून पैसा गोळा केला
सोमनाथ मंदिराला पुन्हा बनवण्याचा प्रस्ताव घेऊन सरदार पटेल महात्मा गांधींकडे गेले. गांधीजींनी या प्रस्तावाचं कौतुक केलं आमि जनतेकडून यासाठी पैसे गोळा करण्याचा सल्ला दिला. सरदार पटेल यांच्या मृत्यूनंतर मंदिर पुनर्निर्माणाचं काम हे एम मुंशी यांच्या देखरेखीत पूर्ण झालं. मुंशी हे त्यावेळी भारत सरकारचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री होते.
सोमनाथ मंदिरचा पुनर्रचना ही स्वतंत्र भारताची सर्वात प्रतिष्ठित आणि सम्मानित प्रकल्प मानला जातो. याला सोमनाथ महा मेरु प्रसाद यांच्या नावानेही ओळखलं जातं. या मंदिराच्या कामाला पारंपरिक भारतीय नगर शैलीच्या मंदिरांचे डिझाइन बनवण्यात निपुण सोमपुरा परिवार यांनी पुर्नत्वास नेलं.
प्रभाशंकर सोमपुरा सोमनाथ मंदिराचे आर्किटेक्ट
सोमनाथ मंदिराचे आर्किटेक्ट हे पद्मश्री प्रभाशंकर सोमपुरा होते. अयोध्या राम मंदिर मॉडेलची रचनाही यांचे नातू चंद्रकांत भाई सोमपुरा यांनी केला होता.
वर्तमानात सोमनाथ मंदिराची रचना गुजरातच्या चालुक्य वास्तूकला शैलीमध्ये 1951 मध्ये करण्यात आला. चालुक्य वास्तूकला शैली उत्तर भारताच्या मंदिर निर्माण नगर शैलीचा एक प्रकार आहे. प्राचीन ऐतिहासिक फलकांनुसार, सोमनाथमध्ये पहिले शिव मंदिराच्या स्थानाबाबत माहिती उपलब्ध नाही.
महादेवाच्या बारा ज्योतिर्लिंगांमध्ये पहिलं
गुजरातच्या सौराष्ट्र क्षेत्रात वेरावल हार्बरमध्ये स्थित सोमनाथ मंदिराची गगणा 12 ज्योतिर्लिंगांमध्ये (Jyotirlinga) सर्वप्रथम ज्योतिर्लिंगाच्या रुपात होते.
या मंदिराची भव्यता इतकी मोठी आहे की येथे लाखोंच्या संख्येने देश-विदेशातील भाविक तसेच, वेगवेगळ्या धर्माचे परदेशी पर्यटक भेट देत असतात. त्यामुळे मंदिरात फक्त हिंदु धर्मियांना प्रवेश देण्याचा निर्णय वादाचं कारण ठरत आहे.
सोमनाथ शिव मंदिराचा इतिहास
सोमनाथमध्ये दूसरं शिव मंदिर वल्लभीचे यादव राजांनी ईसवी सन 649 मध्ये बनवलं होतं. याला ईसवी सन 725 मध्ये सिंधचे गव्हर्नर अल-जुनैद द्वारे नष्ट करण्यात आलं होतं (History Of Somnath Temple).
त्यानंतर गुर्जर प्रतिहार वंशचे राजा नागभट्ट द्वितीय द्वारा ईसवी सन 815 मध्ये तिसऱ्यांदा शिव मंदिराची रचना करण्यात आली. या मंदिरची रचना लाल बलुआ दगडांनी करण्यात आली आहे. नागभट्टद्वारे सौराष्ट्रमध्ये सोमनाथ मंदिराच्या दर्शनाचे ऐतिहासिक पुरावे आढळून येतात.
त्यानंतर चालुक्य राजा मुलराजने ईसवी सन 997 मध्ये या मंदिराचं नूतनीकरण केलं. ईसवीसन 1024 मध्ये सोमनाथ मंदिराला तुर्क शासक महमूद गजनवीने तोडलं.
महमूदने मंदिरातून जवळपास 20 मिलिअन दिनार लूटून ज्योतिर्लिंगला तोडण्यात आलं होतं. त्यासोबतच जवळपास 50,000 हजार लोकांची मंदिराची रक्षा करताना हत्या केली होती.
महमूदच्या हल्ल्यानंतर राजा कुमारपालने ईसवीसन 1169 मध्ये उत्कृष्ट दगडातून या मंदिराची पुनर्रचना केली. पण, अलाउद्दीन खिलजीने गुजरात विजयदरम्यान ईसवी 1299 मध्ये नष्ट केलं.
या मंदिराचं पुनर्रचना सौराष्ट्रचे राजा महीपाल यांनी ईसवी सन 1308 मध्ये केलं होतं. 1395 मध्ये या मंदिराला पुन्हा एकदा गुजरातचे गव्हर्नर जफर खानने नष्ट केलं होतं. तसेच, गुजरातचे शासक महमूद बेगडा यांनी अपवित्रही केलं होतं.
सोमनाथ मंदिराला शेवटच्या वेळी ईसवी सन 1665 मध्ये मुघल सम्राट औरंगजेबने अशा पद्धतीने नष्ट केलं होतं की याची पुनर्रचना केलीच जाऊ नये. नंतर सोमनाथ मंदिराच्या स्थानावर 1706 मध्ये एक मशीद बनवण्यात आली. 1950 मध्ये मंदिराच्या पुनर्रचनेदरम्यान या मशीदीला येथून हटवण्यात आलं.
सोमनाथ मंदिराचं मराठी कनेक्शन
वेरावळ येथील सोमनाथचे गझनीच्या महंमदाने सोमनाथ मंदिर ध्वस्त केलं. इंदूरच्या महाराणी अहिल्याबाई होळकर (Ahilyabai Holkar) यांनी 1783 मध्ये पुण्याच्या पेशव्यांसोबत मिळून विखुरलेल्या सोमनाथ मंदिराजवळ वेगळ्या मंदिराचा निर्माण केला. या मंदिराचा गर्भाशय जमिनीच्या आत बनवला. जेणेकरुन महादेवाला विध्वंसक शक्तींपासून दूर ठेवलं जावं. सध्या या मंदिराला जुनं सोमनाथ मंदिर किंवा अहिल्याबाई मंदिर म्हणून ओळखलं जातं (History Of Somnath Temple).
संबंधित बातम्या :
राम मंदिरासाठी निधी गोळा करणारी मुस्लीम महिला कोण? लोकांकडून जोरदार कौतुक
मुस्लिम शेतकऱ्याची महादेवावर श्रद्धा, स्वखर्चातून मंदिर उभारले
पुरीच्या जगन्नाथ मंदिर प्रशासनाचा मोठा निर्णय; आता ‘या’ अटीवरच होणार दर्शन