Speed Breaker | स्पीड ब्रेकरने तयार होणार वीज, पेटणार रस्त्यांवरील दिवे, MIT मुझफ्फरपुरच्या विद्यार्थ्यांची कमाल
स्पीड ब्रेकर वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी किंवा अपघात रोखण्यासाठी बसविले जातात. अनेकदा त्यांच्याविषयी नाराजी देखील व्यक्त केली जात असते, परंतू आता हेच स्पीड ब्रेकर वीजनिर्मितीलाही हातभार लावणार आहेत.
नवी दिल्ली | 17 सप्टेंबर 2023 : मुझफ्फरपुरच्या एमआयटी इंजिनिअर कॉलेजच्या मॅकनिकल ब्रँचच्या विद्यार्थ्याने रस्त्यावरील स्पीड ब्रेकरचा वापर करुन वीजनिर्मितीचे नवे तंत्रज्ञान शोधून काढले आहे. मॅकेनिकल विभागाचे अध्यक्ष प्रो. इरशाद आलम यांनी सांगितले की या मॉडेला डायनामाच्या धर्तीवर तयार केले आहे. पाच विद्यार्थ्यांच्या टीमने हे संशोधन केले आहे. या तंत्राने वीजनिर्मितीने रस्त्यावरील दिवे पेटवता येतील, स्ट्रीट लाईटसाठी वेगळी वीज खर्च करावी लागणार नाही. त्यामुळे वीजेची चांगलीच बचत होऊ शकते.
एमआयटी मुझफ्फरपुरचे विद्यार्थ्यांच्या एका गटाने स्पीड ब्रेकरने वीज निर्मिती करण्याचे तंत्र शोधून काढले आहे. या गटात अभिषेक, अभिजीत कुमार, आदित्य कुमार मिश्रा, सोनी कुमारी, अजय कुमार यांच्या समावेश आहे. या मॉडेल आता विज्ञान- तांत्रिक विभागाला पाठविली आहे. स्पीड ब्रेकर वाहनाच्या वेगावर नियंत्रण होण्यासाठी बसविले जात असल्याने अनेकदा त्याच्याविषयी नाराजी देखील व्यक्त केली जात असते परंतू आता हेच स्पीड ब्रेकर वीजनिर्मितीलाही हातभार लावणार आहेत.
अशी वीज निर्मिती करणार स्पीड ब्रेकर
या स्पीड ब्रेकर मॉडेलची निर्मिती करणाऱ्या विद्यार्थी अभिषेक यांनी सांगितले की ट्रांसलेशनर मोशन रोटेशनल मोशनमध्ये बदलला जाईल. ही क्रिया चेन मॅकनिझमद्वारे होईल. स्पीड ब्रेकरमध्ये डायनामो लावलेले असतील. हे डायनामो वाहनांच्या चाकांनी फिरले जाऊन वीज तयार केली जाईल. स्पीड ब्रेकर मध्ये क्रॅक आणि कॉनेक्टींग रड आणि फिरणारी चेन लावली असेल. ही चेन डायनामाला लावलेली असेल. चेन जशी फिरेल तशी वीज निर्मिती होईल.
एका स्पीड ब्रेकरने 220 व्होल्ट वीज निर्मिती
एमआयटीच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या या स्पीड ब्रेकर मॉडेलने 220 व्होल्टची वीजनिर्मिती होईल. अभिषेक यांनी सांगितले की हायवेवर या मॉडेलला 40 हजार रुपये खर्च येईल. यात स्पीड ब्रेकर स्टीलपासून तयार करावे लागतील. म्हणजे कार आल्यावर ते आत दबले जातील. यातून निर्माण होणाऱ्या वीजे बॅटरी चार्ज होईल, त्याचा वापर रात्री रस्त्यावरील दिवे प्रज्वलित करण्यासाठी होईल, या मॉडेलला तयार करण्यासाठी तीन महिन्यांचा वेळ लागल्याचे विद्यार्थ्यांनी म्हटले आहे.