उत्तराखंडच्या मुख्यमंत्रीपदी दिवसभरासाठी सृष्टी गोस्वामी, वाचा ‘नायक’ची खरीखुरी स्टोरी
हरिद्वारची सृष्टी गोस्वामी एक दिवसांची उत्तराखंडची मुख्यमंत्री झाली. विधानसभा भवनात राज्याचे मंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांनी त्यांचं स्वागत केलं.
देहरादून : हरिद्वारची सृष्टी गोस्वामी एक दिवसांची उत्तराखंडची मुख्यमंत्री झाली (Srishti Goswami One Day CM). विधानसभा भवनात राज्याचे मंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांनी त्यांचं स्वागत केलं. मुख्यमंत्री म्हणून सृष्टीने जवळपास डझनभर विभागांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली आणि अनेक सूचनाही केल्या (Srishti Goswami One Day CM).
राष्ट्रीय बालिका दिनाच्या निमित्ताने हरिद्वारच्या सृष्टी गोस्वामीला एका दिवसासाठी उत्तराखंडची मुख्यमंत्री होण्याची संधी मिळाली. यासाठी स्वीकृति आणि निर्देश मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांच्याकडून देण्यात आले. मुख्यमंत्रीच्या पदावर असताना सृष्टी गोस्वामीने अधिकारिऱ्यांना अनेक निर्देश दिले. त्यांनी प्रदेशातील जुन्या पुलांना ठिक करण्याच्या सूचनाही केल्या आहेत.
सृष्टी गोस्वामीने विधानसभा भवनात दुपारी 12 ते 3 वाजेपर्यंत समिक्षा बैठक घेतली. दुपारी तीन वाजेनंतर बालिका निकेतनचं निरीक्षण केलं आणि येथील मुलींसोबत दुपारचं जेवन केलं. त्यानंतर सायंकाळी साडे चार वाजता हरिद्वारकडे प्रस्थान केलं.
मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांनी सांगितलं, मुलींना सशक्त करण्याच्या दिशेने आम्ही प्रयत्नशील आहोत. आमच्या प्रदेशातील मुली कुणापेक्षा कमी नाही हा मेसेज लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. देशाच्या महिलां प्रत्येक क्षेत्रात नाव कमावत आहेत. आमच्या या निर्णयानाने लोकांपर्यंत संदेश जाईल की मुलींना प्रोत्साहन दिलं तर त्या काहीही करु शकतात (Srishti Goswami One Day CM).
एका दिवसाची मुख्यमंत्री बनलेली सृष्टी गोस्वामीने सांगितलं, त्यांनी काही महत्वपूर्ण निर्देश अधिकाऱ्यांना दिले. त्याशिवाय, मुलींची शिक्षा आणि सुरक्षेबाबत आपली चिंता व्यक्त केली. उच्च शिक्षा मंत्री धन सिंहने या प्रयत्नासाठी मुख्यमंत्री रावत यांचे आभार मानले.
‘निकरवाले’ तामिळनाडूचं भविष्य कधीच ठरवू शकत नाहीत, राहुल गांधींचा आरएसएसवर हल्लाhttps://t.co/fTtjZGDEUe@RahulGandhi #RahulGandhi #Congress #BJP #RSS #TamilNadu #tamilnaduassemblyelection2021
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 25, 2021
Srishti Goswami One Day CM
संबंधित बातम्या :
Republic Day : ट्रॅक्टरमध्ये डिझेल भरु नका!, शेतकऱ्यांच्या परेडपूर्वी उत्तर प्रदेश सरकारचा आदेश
काही अदृश्य शक्तीमुळेच शेतकरी आंदोलनावर तोडगा नाही; केंद्रीय कृषी मंत्र्यांचा दावा
काँग्रेसनेच सुभाषचंद्र बोस यांची हत्या घडवली; साक्षी महाराजांचं वादग्रस्त विधान