ओवीसी यांचा बिकनीवर सवाल, ज्याला वाटेल त्याने बिकनी घालावी, पण तुम्हाला काय वाटतं माझ्या मुलीने हिजाब काढावा? आणि मी दाढी

हिजाब हा मुस्लिम बांधवांचे मागासलेपण दाखवून देतो का? देशाच्या विकासामध्ये मुस्लिम महिला योगदान देत नाही आहेत का? असेही सवाल ओवेसी यांनी उपस्थित केले आहेत.

ओवीसी यांचा बिकनीवर सवाल, ज्याला वाटेल त्याने बिकनी घालावी, पण तुम्हाला काय वाटतं माझ्या मुलीने हिजाब काढावा? आणि मी दाढी
ओवीसी यांचा बिकनीवर सवाल
Follow us
| Updated on: Oct 14, 2022 | 11:11 PM

कर्नाटकातील शाळा-कॉलेजमध्ये हिजाब (Hijab) परिधान करण्यावरून मोठा वादंग निर्माण झाला. ते प्रकरण सध्या सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. याचदरम्यान एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांनी एक विधान केले आहे. सध्या त्यांच्या या विधानाची राजकीय वर्तुळासह सोशल मीडियामध्ये जोरदार चर्चा सुरू झाली आहे. ज्यांना बिकिनी घालायची आहे त्यांनी घालावी, परंतु तुम्हाला काय वाटते आमच्या मुलींनी हिजाब काढावा? आणि मी दाढी? असा सवाल ओवेसींनी केला आहे. हिजाब परिधान करण्यावर उपस्थित होणाऱ्या प्रश्नाला अनुसरून ओवेसींनी विधान (Statement of Asaduddin Owaisi) केले आहे.

हिजाब हा मुस्लिम बांधवांचे मागासलेपण दाखवून देतो का? देशाच्या विकासामध्ये मुस्लिम महिला योगदान देत नाही आहेत का? असेही सवाल ओवेसी यांनी उपस्थित केले आहेत.

आपण वास्तवात हिजाबची सक्ती करतोय का?

मुस्लिम तरुणी किंवा महिलांनी जर हिजाब परिधान करून स्वतःचा चेहरा झाकला, तर याचा अर्थ असा होत नाही की त्यांनी त्यांची बुद्धी झाकली आहे.

हे सुद्धा वाचा

मुस्लिम लोक आपल्या छोट्या मुलांनाही हिजाब परिधान करण्यासाठी सक्ती करीत आहेत, असे बोलले जात आहे. आम्ही वास्तवात आमच्या लहान मुलींनाही हिजाब परिधान करण्याची सक्ती करतो आहोत का? असा प्रश्नही असदुद्दीन ओवेसी यांनी केला आहे.

ज्यावेळी एका हिंदू, एका शीख आणि एका ख्रिश्चन मुलाला त्यांच्या त्यांच्या धर्माचे कपडे परिधान करण्यास परवानगी दिली जाते, त्याचवेळी जर मुस्लिम मुलाला आपल्या धर्माचे कपडे परिधान करण्यास रोखले तर मुस्लिम मुलाकडे पाहण्याचा दृष्टिकोन नक्कीच वेगळा असेल.

मुस्लिम मुलगा आपल्यापेक्षा कनिष्ठ आहे असा समज इतर मुले करून घेऊ शकतात, असाही मुद्दा ओवेसी यांनी मांडला आहे.

देशभर उमटले होते पडसाद

कर्नाटकातील कॉलेजमध्ये हिजाब परिधान करून गेलेल्या तरुणींना रोखण्यात आले होते. त्यावेळी हिजाब बंदीवर मुस्लिम तरुणींनी आक्षेप घेतला. पुढे हे प्रकरण कर्नाटक उच्च न्यायालय आणि त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात गेले.

त्याचबरोबर कर्नाटकसह इतर राज्यांमध्येही हिजाब बंदीचे तीव्र पडसाद उमटले होते. याच पार्श्वभूमीवर असदुद्दीन ओवेसी यांनी आता विविध प्रश्न केले आहेत.

या तिघांचं मिठंना, आमच्याकडं अजून...जागा वाटपावर काय म्हणाले जानकर?
या तिघांचं मिठंना, आमच्याकडं अजून...जागा वाटपावर काय म्हणाले जानकर?.
लाडकी बहीण योजनेवर राज यांची टीका, म्हणाले की जानेवारीत पगार द्यायला
लाडकी बहीण योजनेवर राज यांची टीका, म्हणाले की जानेवारीत पगार द्यायला.
मुंबईत हायअलर्ट, मंदिरांसह सर्व महत्वाच्या ठिकाणांच्या सुरक्षेत वाढ
मुंबईत हायअलर्ट, मंदिरांसह सर्व महत्वाच्या ठिकाणांच्या सुरक्षेत वाढ.
गद्दारी पचवण्याचा..... केदार दिघे धर्मवीर-2 बद्दल म्हणाले की...
गद्दारी पचवण्याचा..... केदार दिघे धर्मवीर-2 बद्दल म्हणाले की....
रेशनवर प्लास्टीक तांदुळ? खासदार प्रणिती शिंदे यांचा आरोप, काय प्रकरण?
रेशनवर प्लास्टीक तांदुळ? खासदार प्रणिती शिंदे यांचा आरोप, काय प्रकरण?.
'गिरीशभाऊ गुटखा खात नाही, दारु पित नाही, त्यांना एकच सवय..,'- नाथाभाऊ
'गिरीशभाऊ गुटखा खात नाही, दारु पित नाही, त्यांना एकच सवय..,'- नाथाभाऊ.
ही सुरुवात आहे, गुलाल उधळलाय... मोठ्या विजयानंतर काय म्हणाले आदित्य?
ही सुरुवात आहे, गुलाल उधळलाय... मोठ्या विजयानंतर काय म्हणाले आदित्य?.
आनंद दिघेंना मारलं गेलं हे अख्खा ठाणे जिल्हा जाणतो, कोणी केला आरोप ?
आनंद दिघेंना मारलं गेलं हे अख्खा ठाणे जिल्हा जाणतो, कोणी केला आरोप ?.
विद्यापीठ सिनेट निवडणूक : सर्व उमेदवार विजयी, संजय राऊत म्हणाले की....
विद्यापीठ सिनेट निवडणूक : सर्व उमेदवार विजयी, संजय राऊत म्हणाले की.....
माजी आमदार राजन पाटील यांची सहकार परिषदेच्या अध्यक्षपदी निवड
माजी आमदार राजन पाटील यांची सहकार परिषदेच्या अध्यक्षपदी निवड.