जम्मू काश्मीरमध्ये पुन्हा जवानांवर दगडफेक; नमाजानंतर रस्त्यावर उतरत आंदोलकांचा गोंधळ

जम्मू काश्मीरमध्ये पुन्हा एकदा जवानांवर दगडफेक करण्यात आल्याची घटना घडली आहे. इदच्या नमाजानंतर मशिद परिसरात असलेल्या जवानांवर दगडफेक करण्यात आली आहे.

जम्मू काश्मीरमध्ये पुन्हा जवानांवर दगडफेक; नमाजानंतर रस्त्यावर उतरत आंदोलकांचा गोंधळ
Follow us
| Updated on: May 03, 2022 | 1:16 PM

श्रीनगर : देशभरात आज रमजान ईदचा (Eid) उत्साह आहे. देशभरात मोठ्या धुमधडाक्यात ईद साजरी होत आहे. मात्र याच वेळी जम्मू काश्मीरमधून (Jammu Kashmir) पुन्हा एकदा दगडफेकीची घटना समोर आली आहे. जम्मू काश्मीरच्या अनंतनाग (Anantnag) मध्ये स्थित एका मशिदीसमोर तैनात असलेल्या जवानांवर दगडफेक (Stone Pelting) करण्यात आली आहे. मिळत असलेल्या माहितीनुसार ईदच्या नमाजानंतर जवानांवर दगडफेक करण्यात आली. काही लोक नमाजनंतर अचानक रस्त्यावर आले, त्यानंतर काश्मीरच्या मुद्द्यावरून जोरदार घोषणाबाजीला सुरुवात झाली. यातीलच काही जणांनी जवानांवर दगडफेक केली. या दगडफेकीनंतर परिसरातील बंदोबस्तात वाढ करण्यात आली असून, परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती मिळत आहे. अचानक झालेल्या दगडफेकीमुळे तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.

परिस्थिती नियंत्रणात

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, आज रमजान ईद आहे. ईदच्या नमाजासाठी काही लोक अनंतनागमध्ये असलेल्या एका मशिदीमध्ये जमले होते. या मशिद परिसरात जवान देखील तैनात करण्यात आले होते. नमाजानंतर अचानक काही लोक रस्त्यावर उतरले व जम्मू काश्मीरच्या मुद्द्यावर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. याचवेळी त्यातील काही आंदोलकांनी जवानांवर दगडफेक केली. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून, परिसरात तणावपूर्ण शांततात असल्याची माहिती समोर येत आहे.

जोधपूरमध्ये देखील दगडफेक

दरम्यान दुसरीकडे राजस्थानच्या जोधपूरमधून देखील असाच प्रकार समोर आला आहे. जोधपूरमध्ये आज दोन गटात वाद झाला. या वादानंतर पोलीसांवर दगडफेक करण्यात आली. या घटनेत काही पोलीस जखमी झाले आहेत. पोलिसांनी देखील प्रत्युत्तरादाखल लाठीचार्ज केला तसेच जमावाला पांगवण्यासाठी अश्रूधुराचा देखील वापर करण्यात आला. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून, पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आल्याची माहिती पोलिसांच्या वतीने देण्यात आली आहे.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.