Bihar : नितीश कुमार यांच्या ताफ्यावर दगडफेक, वाहनांच्या काचा फोडल्या

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या ताफ्यावर दगडफेक झाली असली तरी या दरम्यान, मुख्यमंत्री हे ताफ्यात नव्हते. केवळ सुरक्षेसाठी कार्यरत असलेलेच कर्मचारी यावेळी होते. शिवाय यामध्ये कोणीही गंभीर जखमी झाले नाहीपण गाडीच्या काचा मात्र, फुटल्या होत्या. सोमवारी नितीश कुमार हे बिहार जिल्ह्यातील गया येथे जाणार आहेत. त्याच्या पूर्वसंध्येलाच हा प्रकार घडला आहे. गया येथील दुष्काळी परस्थितीचा ते आढावा घेणार आहेत.

Bihar : नितीश कुमार यांच्या ताफ्यावर दगडफेक, वाहनांच्या काचा फोडल्या
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या ताफ्यावर दगडफेक करण्यात आली आहे.Image Credit source: twitter
Follow us
| Updated on: Aug 21, 2022 | 10:09 PM

मुंबई :  (Bihar CM) बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या (Stone pelting on the convoy) ताफ्यावर दगडफेक झाल्याची घटना समोर येत आहे. अज्ञातांनी ही दगडफेक केली असून यामध्ये ताफ्यातील तीन ते चार वाहनांच्या काचा फुटल्या आहेत. विशेष म्हणजे या दगडफेकीच्या दरम्यान, (CM Nitish kumar) मुख्यमंत्री नितीश कुमार हे ताफ्यात नव्हते. अज्ञातांनी ही दगडफेक केली असल्याचे समोर येत आहे. मध्यंतरीच नितीश कुमार यांनी भाजपशी काडीमोड घेत इतर पक्षाशी युती करुन सरकारची स्थापना केली होती. त्यामुळे या हल्ल्यामागे नेमके कोण याबाबत तर्क-वितर्क लावले जात आहेत. बिहारमधील पाटणा जिल्ह्यातील गौरीचक पोलिस स्टेशनच्या सोहगी गावात घडली. जिथे काही अज्ञात लोकांनी त्याच्या ताफ्यावर दगडफेक केली.

ताफ्यात सुरक्षा कर्मचारीच उपस्थित

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या ताफ्यावर दगडफेक झाली असली तरी या दरम्यान, मुख्यमंत्री हे ताफ्यात नव्हते. केवळ सुरक्षेसाठी कार्यरत असलेलेच कर्मचारी यावेळी होते. शिवाय यामध्ये कोणीही गंभीर जखमी झाले नाहीपण गाडीच्या काचा मात्र, फुटल्या होत्या. सोमवारी नितीश कुमार हे बिहार जिल्ह्यातील गया येथे जाणार आहेत. त्याच्या पूर्वसंध्येलाच हा प्रकार घडला आहे. गया येथील दुष्काळी परस्थितीचा ते आढावा घेणार आहेत. मुख्यमंत्री हे हेलिकॉप्टरने गयाला जाणार असले तरी, हेलिपॅडवरून इतर ठिकाणी पोहोचण्यासाठी त्यांची गाडी पाटणाहून गयाला पाठवली जात होती.

हे सुद्धा वाचा

दगडफेकीत नागरिकही जखमी

नितीश कुमार यांच्या सुरक्षतेचा ताफा नेमका पाटणा जिल्ह्यातील गौरीचक पोलिस स्टेशनच्या हद्दीत आल्यानंतर हा हल्ला झाला आहे. यामध्ये वाहनांच्या खिडकीच्या काचा फुटल्या आहेत तर इतर नागरिकही जखमी झाले आहेत. घटनेचे गाभीर्य ओळखून लागलीच सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले होते. त्यामुळे अवघ्या काही वेळातच सर्व परस्थिती नियंत्रणात आली होती.

म्हणून घडली घटना

गौरीचक पोलिस स्टेशनच्या हद्दीत एका तरुणाची हत्या झाली होती. त्यामुळे संतप्त नागरिकांनी पाटणा-गया मुख्य मार्गावर मृतदेह ठेवून रास्ता रोको केला होता. या दरम्यान, या दरम्यानच नितीश कुमार यांच्या ताफ्यातील रस्त्यावरुन जाऊ लागल्या होत्या. त्या दरम्यान संतप्त जमावाने ताफ्यावर दगडफेक केली. यामध्ये अनेक वाहनांच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या. दगडफेकीमुळे काही जण जखमीही झाले आहेत.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.