शहीद हेमंत करकरेंवरील अपमानास्पद वक्तव्याचा देशभरातून निषेध

मुंबई : ताज हॉटेलसह मुंबईत अनेक ठिकाणी हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांशी लढताना वीरमरण आलेल्या हेमंत करकरे यांच्यावरील अपमानास्पद वक्तव्याचा देशभरातून निषेध केला जात आहे. मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी करकरे यांची तुलना थेट कंसाशी करुन त्यांच्या मृत्यूबद्दल आनंद व्यक्त केला. यावर राजकीय नेत्यांसह नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. देशातील पोलीस अधिकाऱ्यांची संघटना ‘आयपीएस असोसिएशन’ने प्रज्ञा […]

शहीद हेमंत करकरेंवरील अपमानास्पद वक्तव्याचा देशभरातून निषेध
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:00 PM

मुंबई : ताज हॉटेलसह मुंबईत अनेक ठिकाणी हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांशी लढताना वीरमरण आलेल्या हेमंत करकरे यांच्यावरील अपमानास्पद वक्तव्याचा देशभरातून निषेध केला जात आहे. मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी करकरे यांची तुलना थेट कंसाशी करुन त्यांच्या मृत्यूबद्दल आनंद व्यक्त केला. यावर राजकीय नेत्यांसह नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया येत आहेत.

देशातील पोलीस अधिकाऱ्यांची संघटना ‘आयपीएस असोसिएशन’ने प्रज्ञा ठाकूर यांच्या या वक्तव्याचा निषेध व्यक्त केला. ‘अशोक चक्र विजेत्या हेमंत करकरे यांनी दहशतवाद्यांशी लढताना सर्वोच्च बलिदान दिले. आम्ही सर्व अधिकारी निवडणूक उमेदवाराकडून केलेल्या या अपमानास्पद वक्तव्याचा निषेध करतो. तसेच शहीदांच्या बलिदानाचा सन्मान करण्याची मागणी करतो’, असं आयपीएस असोसिएशनने म्हटलंय.

जयंत पाटील (राष्ट्रवादी, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष) :

ज्या शहीद हेमंत करकरेंनी या देशासाठी बलिदान दिले, त्यांच्याविषयी अशी भाषा वापरणाऱ्या साध्वी प्रज्ञा या आरोपी महिलेस उमेदवारी देणाऱ्या भाजप सरकारला या देशात यापुढे कसे राजकारण करायचे आहे हे स्पष्ट दिसते आहे. शहीदांचा अपमान करणाऱ्या भाजपला जनता नक्कीच धडा शिकवेल.#BJP_भगाओ_देश_बचाओ

नवाब मलिक (प्रवक्ते, राष्ट्रवादी) :

ईदला मालेगाव येथे बॉम्बस्फोट झाला होता. काहींना यात अटक झाली. हेमंत करकरे यांच्याकडे या केसच्या तपासाची जबाबदारी होती. त्यांनी इन्व्हेस्टिगेशन सुरू केले. त्यात साध्वी प्रग्यासिंह ठाकूर यांचे नाव आले होते. अभिनव भारत या संघटनेचेही यात नाव होते.

रणदीप सिंह सुरजेवाला (प्रवक्‍ते, काँग्रेस) :

26/11 च्या हल्ल्यात शहीद झालेल्या हेमंत करकरेंना देशद्रोही घोषित करण्याचा गुन्हा फक्त भाजपचे लोकच करु शकतात. जो दहशतवाद्यांशी लढताना भारत मातेसाठी प्राण अर्पण करतो, त्याच्याबद्दलचे असे वक्तव्य हा देशातील प्रत्येक सैनिकाचा अपमान आहे. यासाठी प्रज्ञा ठाकूर यांच्यावर कारवाई करत भाजपने देशाची माफी मागावी.

आम आदमी पक्षाचे नेते आणि राज्‍यसभेचे खासदार संजय सिंह यांनी प्रज्ञा ठाकूर यांना लोकसभा निवडणुकीत उमेदवारी देण्यावरच प्रश्न उपस्थित केले आहे.

शहीद हेमंत करकरे यांच्या शौर्याचा अपमान करणाऱ्या प्रज्ञा ठाकूर भाजपच्या उमेदवार आहेत. आता मोदीजी कुठे आहेत? शहीदांच्या नावावर मते मागतात आणि शहीदांचा अपमान करणाऱ्यांना तिकीट देतात.

– खासदार संजय सिंह

दिल्‍लीचे मुख्‍यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी या वक्तव्याने भाजपचे खरे रंग दिसल्याचे सांगत भाजपला त्यांची जागा दाखवून देण्याचे आवाहन केले आहे.

भाजपच्या भोपाळ लोकसभा मतदारसंघातील उमेदवार प्रज्ञा ठाकूर यांनी 26/11 दहशतवादी हल्ल्यातील शहीद हेमंत करकरे यांच्याबद्दल अत्यंत अपमानास्पद वक्तव्य केले आहे. याचा कठोरपणे निषेध व्हायला हवा. भाजप त्यांचे खरे रंग दाखवत आहे. त्यांना त्यांची जागा दाखवून द्यायला हवी.

– अरविंद केजरीवाल (मुख्यमंत्री, दिल्ली)

उपमुख्‍यमंत्री मनीष सिसोदिया यांनी हीच का भाजपची देशभक्ती असा प्रश्न उपस्थित केला करत या वक्तव्याचा निषेध केला.

भाजप मुंबई दहशतवादी हल्ल्यात भारत मातेची रक्षा करताना आपले प्राण अर्पण करणाऱ्या शहीद हेमंत करकरेंच्या बलिदानावर प्रश्न उपस्थित  करत आहेत. हीच भाजपची देशभक्ती आहे?

– मनीष सिसोदिया (उपमुख्यमंत्री, दिल्ली)

भाजपचे नेते आणि प्रवक्ते नलिन कोहली यांनी प्रज्ञा ठाकूर यांच्या वक्तव्यापासून अंग झटकण्याचा प्रयत्न केला आहे. ते म्हणाले,

जे देशासाठी बलिदान देणाऱ्या प्रत्येकाचा आदर राखला पाहिजे. प्रज्ञा ठाकूर जे म्हटल्या तो त्यांचा दृष्टीकोन असू शकतो, कारण त्यांना तपासातून जावे लागले होते. आम्ही करकरेंच्या बलिदानाला सलाम करतो. यात राजकारण करु नये.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.