Shivsena : वेळ लागेल मात्र आम्हाला न्याय मिळेल, सत्तासंघर्ष घटनापीठाकडे गेल्यानंतर सुभाष देसाईंनी व्यक्त केला आशावाद

अनेक घटनात्मक बाबी चर्चेला येत आहेत. अनेक गुंतागुंतीचे मुद्दे आहेत. त्यामुळे घटनापीठाने याची सुनावणी करणे अभिप्रेत होते, असे सुभाष देसाई म्हणाले.

Shivsena : वेळ लागेल मात्र आम्हाला न्याय मिळेल, सत्तासंघर्ष घटनापीठाकडे गेल्यानंतर सुभाष देसाईंनी व्यक्त केला आशावाद
माध्यमांशी बोलताना सुभाष देसाईImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Aug 23, 2022 | 3:31 PM

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme court) घटनापीठाने याची सुनावणी करणे अपेक्षित होते. त्याप्रमाणे 5 न्यायाधीशांचे घटनापीठ यावर निर्णय देणार आहे. 25 तारखेला यावर सुनावणी होणार आहे. न्याय मिळण्यास वेळ लागतो. मात्र आम्हाला न्याय मिळेल, अशी अपेक्षा शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई (Subhash Desai) यांनी व्यक्त केली. सत्तासंघर्षाचे हे प्रकरण आता पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे वर्ग करण्यात आल्याचे आता स्पष्ट झाले आहे. आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. त्यात शिवसेना (Shivsena) पक्षातून फुटून गेलेला जो गद्दारांचा गट आहे, त्यांच्यातर्फे असे मांडण्यात आले, की जे विधानसभेचे अध्यक्ष आहेत, त्यांना अपात्रतेचा निर्णय घेऊ द्या आणि निवडणूक आयोगाचेही काम त्यांना करू द्या. त्यावर शिवसेनेचे वकील कपील सिब्बल यांनी प्रभावी मुद्दे मांडले, असे सुभाष देसाई म्हणाले.

‘दोन्ही कारवायांना सर्वोच्च न्यायालयाने दिली स्थगिती’

कपील सिब्बल यांच्या प्रभावी युक्तीवादानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांनी त्यांचे निरीक्षण नोंदवले. त्याबद्दलचा निर्णय असा दिला, की आता या प्रकरणासाठी पाच न्यायमूर्तींचे एक घटनापीठ असेल. त्यांच्यासमोर कोणकोणते मुद्दे येतील, हे सांगण्यात आले आहे. मुख्य म्हणजे शिंदे गटाची जी मागणी होती, की विधान सभेचे अध्यक्ष अपात्रतेचा निर्णय घेतील, हे न्यायालयाने फेटाळले आहे. निवडणूक आयोगाला कोणतेही काम जोपर्यंत सर्वोच्च न्यायालयाची कार्यवाही पूर्ण होत नाही, तोपर्यंत करता येणार नाही. त्यामुळे या दोन्ही कारवायांना सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिलेली आहे.

‘अनेक गुंतागुंतीचे मुद्दे’

या सगळ्या गोष्टी आम्ही मांडत होतो, यामध्ये हे अपेक्षित होते, त्याप्रमाणे हे घटनापीठाकडे वर्ग झालेले आहे. कारण यामध्ये अनेक घटनात्मक बाबी चर्चेला येत आहेत. अनेक गुंतागुंतीचे मुद्दे आहेत. त्यामुळे घटनापीठाने याची सुनावणी करणे अभिप्रेत होते, असे सुभाष देसाई म्हणाले. निवडणूक आयोगाने आजच सुनावणी ठेवली होती, त्यालाही स्थगिती देण्यात आली आहे, अशी माहिती सुभाष देसाई यांनी दिली आहे.

हे सुद्धा वाचा

काय म्हणाले सुभाष देसाई?

दोघांचीही कागदपत्रे निवडणूक आयोगाकडे

शिंदे गटाने शिवसेना आमचीच, असा दावा केंद्रीय निवडणूक आयोगासमोर केला. त्यामुळे मूळ शिवसेनेसह या दोघांकडूनही निवडणूक आयोगाने पुरावे मागितलेले आहेत. दोन्ही गटांची कागदपत्रे निवडणूक आयोगाकडे असून शिवसेना पक्षाविषयीचा अंतिम निर्णय घेतला जाणार होता. मात्र कोर्चाच्या निर्णयानंतर आज निवडणूक आयोग निर्णय देऊ शकणार नाही.

'दमानियांना जे करायचं ते करू द्या...', गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल
'दमानियांना जे करायचं ते करू द्या...', गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल.
कल्याण अत्याचार प्रकरण, आरोपी विशाल गवळीच्या वकिलाला धमकी
कल्याण अत्याचार प्रकरण, आरोपी विशाल गवळीच्या वकिलाला धमकी.
बीडच्या फरार आरोपींचं प्रसिद्ध पत्रक जारी, नेमकं काय म्हटलंय?
बीडच्या फरार आरोपींचं प्रसिद्ध पत्रक जारी, नेमकं काय म्हटलंय?.
राऊतांना मातोश्रीवर धुतलं, खोलीत डांबलं? बातम्या व्हायरल; राऊत भडकले
राऊतांना मातोश्रीवर धुतलं, खोलीत डांबलं? बातम्या व्हायरल; राऊत भडकले.
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट, 'या' पाच प्रकारच्या बहिणींना आता...
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट, 'या' पाच प्रकारच्या बहिणींना आता....
'मेजर ध्यानचंद खेलरत्न'ची घोषणा, मनु भाकर-डी गुकेशसह कोणाचा सन्मान?
'मेजर ध्यानचंद खेलरत्न'ची घोषणा, मनु भाकर-डी गुकेशसह कोणाचा सन्मान?.
'आमच्याकडे आता गर्दी, आमच्यासोबत या असं आम्ही साळवींना म्हटलो नाही'
'आमच्याकडे आता गर्दी, आमच्यासोबत या असं आम्ही साळवींना म्हटलो नाही'.
'दादांच्या ताफ्यात वाल्मिक कराडची गाडी..' बीडच्या खासदाराचा गौप्यस्फोट
'दादांच्या ताफ्यात वाल्मिक कराडची गाडी..' बीडच्या खासदाराचा गौप्यस्फोट.
अंत्यविधीची तयारी सुरू अन् 'तो' जिवंत झाला; सिनेमात शोभेल अशी घटना
अंत्यविधीची तयारी सुरू अन् 'तो' जिवंत झाला; सिनेमात शोभेल अशी घटना.
ठाकरे गटाचे राजन साळवी भाजपच्या वाटेवर? होणाऱ्या चर्चांवर म्हणाले...
ठाकरे गटाचे राजन साळवी भाजपच्या वाटेवर? होणाऱ्या चर्चांवर म्हणाले....