‘Salute to our true hero, Netaji’ : सुदर्शन पटनायक यांनी पुरी बीचवर साकारली सुभाषचंद्र बोस यांची वाळूची अप्रतिम कलाकृती!
नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 125व्या जयंतीनिमित्त प्रसिद्ध वाळू कलाकार सुदर्शन पटनायक (Sudarsan Pattnaik) यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांचं अप्रतिम वाळूचं शिल्प (Sand Sculpture) शेअर केलंय.
Netaji Subhas Chandra Bose sculpture : नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 125व्या जयंतीनिमित्त प्रसिद्ध वाळू कलाकार सुदर्शन पटनायक (Sudarsan Pattnaik) यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांचं अप्रतिम वाळूचं शिल्प (Sand Sculpture) शेअर केलंय. 23 जानेवारी रोजी शेअर केलेल्या ट्विटमध्ये नेताजींच्या होलोग्राम(Hologram)सह इंडिया गेटचंही दर्शन होणाऱ्या अप्रतिम शिल्पाची क्लिप समाविष्ट आहे. 23 जानेवारीला सर्वत्र नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी होत आहे. प्रत्येक भारतीयाच्या मनात नेताजींविषयी आदरभाव आपापल्या परीनं व्यक्त होत आहे. त्यात सुदर्शन पटनायक यांनी अशी अप्रतिम कलाकृती उभारली आहे.
पुरी बीच इथं उभारली प्रतिकृती
वाळूच्या शिल्पात इंडिया गेटवर स्थापित करण्यात येणारा नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा होलोग्राम, “आमचा खरा नायक, नेताजींना सलाम” या वाढदिवसाच्या शुभेच्छांसह दाखवण्यात आलं आहे. “नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 125व्या जयंतीनिमित्त, पुरी बीच ओडिशा इथं नेताजींसोबत इंडिया गेटची 7 फूट उंचीची वाळूची प्रतिकृती,” अशी पटनायक यांनी व्हिडिओला कॅप्शन दिली आहे.
नेटिझन्सनी व्यक्त केलं प्रेम
व्हिडिओला 8 हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज आणि अनेक प्रतिक्रिया मिळाल्या आहेत. नेटिझन्सनी कमेंट सेक्शनमध्ये नेताजींना शुभेच्छा देण्यासह आपलं देशाप्रती, क्रांतीकारकांविषयीचं प्रेमही व्यक्त केलं आहे.
On the 125th birth anniversary of Netaji Subhas Chandra Bose, a 7-ft height sand replica of India Gate with Netaji at Puri Beach Odisha #JaiHind pic.twitter.com/oroM4W1bK2
— Sudarsan Pattnaik (@sudarsansand) January 23, 2022
…तोवर होलोग्राम पुतळा असेल
पंतप्रधान नरेंद्र मोदी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 125व्या जयंतीनिमित्त इंडिया गेट इथं नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या होलोग्राम पुतळ्याचं अनावरण केलं. संपूर्ण देश नेताजी सुभाषचंद्र बोस यांची 125वी जयंती साजरी करत आहे, तेव्हा मला सांगायला आनंद होत आहे, की ग्रॅनाइटचा बनलेला त्यांचा भव्य पुतळा इंडिया गेटवर बसवला जाईल. हे भारताच्या ऋणानुबंधाचं प्रतीक असेल, असं ट्विट पीएम मोदींनी 21 जानेवारीला केलं होतं. आज त्यांनी पुतळ्याचं अनावरण करत नेताजींच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्यात.
सभी देशवासियों को पराक्रम दिवस की ढेरों शुभकामनाएं।
नेताजी सुभाष चंद्र बोस की 125वीं जयंती पर उन्हें मेरी आदरपूर्ण श्रद्धांजलि।
I bow to Netaji Subhas Chandra Bose on his Jayanti. Every Indian is proud of his monumental contribution to our nation. pic.twitter.com/Ska0u301Nv
— Narendra Modi (@narendramodi) January 23, 2022