Suicide: असाही एक कॉम्प्लेक्स, यु ट्यूब चॅनलला कमी व्ह्यूज मिळाल्याने तरुणाची आत्महत्त्या

ग्वाल्हेर, सोशल मीडियाच्या जगात, तरुणांसाठी त्यांच्या पोस्टवरील लाईक्स आणि व्ह्यूज खूप महत्त्वाचे आहेत. व्ह्यूज आणि लाईक्स त्यांच्या लोकप्रियतेचे मापदंड ठरत आहे. असाच एक धक्कादायक प्रकार ग्वाल्हेरमध्ये समोर आला आहे. आयआयटीएम ग्वाल्हेरच्या एका विद्यार्थ्याने इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्त्या केली (commits suicide). त्याचं एकमेव कारण म्हणजे त्याच्या यूट्यूब चॅनलला व्ह्यूज कमी मिळत होते . (low […]

Suicide: असाही एक कॉम्प्लेक्स, यु ट्यूब चॅनलला कमी व्ह्यूज मिळाल्याने तरुणाची आत्महत्त्या
Follow us
| Updated on: Jul 22, 2022 | 9:00 AM

ग्वाल्हेर, सोशल मीडियाच्या जगात, तरुणांसाठी त्यांच्या पोस्टवरील लाईक्स आणि व्ह्यूज खूप महत्त्वाचे आहेत. व्ह्यूज आणि लाईक्स त्यांच्या लोकप्रियतेचे मापदंड ठरत आहे. असाच एक धक्कादायक प्रकार ग्वाल्हेरमध्ये समोर आला आहे. आयआयटीएम ग्वाल्हेरच्या एका विद्यार्थ्याने इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्त्या केली (commits suicide). त्याचं एकमेव कारण म्हणजे त्याच्या यूट्यूब चॅनलला व्ह्यूज कमी मिळत होते . (low views on  YouTube channel).  आयआयटीएम ग्वाल्हेरमध्ये शिकणाऱ्या 23 वर्षीय तरुणाने इतक्या छोट्या आणि तर्कहीन कारणासाठी जीव दिल्याने तरुणांच्या मानसिकतेबद्दल अनेक प्रश्न उपस्थित झाले आहे.  या तरुणाने काही दिवसांपूर्वी SELFLO नावाने त्याचे यूट्यूब चॅनल तयार केले होते.  विद्यार्थ्याला अपेक्षा होती की, त्याला त्या चॅनेलवर भरपूर व्ह्यूज मिळतील, त्याचा कंटेंट लवकरच व्हायरल होईल. पण जेव्हा गोष्टी अपेक्षेप्रमाणे घडल्या नाहीत तेव्हा त्याला काळजी वाटू लागली.

त्यांची मानसिक स्थिती ढासळू लागली. तो नैराश्यामध्ये गेला आणि अशा तर्कहीन कारणासाठी त्याने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले. या घटनेने अनेकांच्या काळजाचा थरकाप उडविला आहे. तरुणाच्या आत्महत्येनंतर त्याला घरातूनही फारशी साथ मिळत नसल्याचे समोर आले आहे. त्याचे पालक त्याला प्रोत्साहन देत नसल्याची खंत त्याच्या मित्रांजवळ व्यक्त केली होती. त्याच्या यु ट्यूब चॅनेलबद्दल तो सतत विचार करत असायचा. सध्या पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

विद्यार्थ्याचा मृतदेह उस्मानिया रुग्णालयात हलवण्यात आला आहे. तेथे शवविच्छेदन करून पुढील तपास करण्यात येईल. पोलिसांना घटनास्थळावरून सुसाईड नोट सापडली आहे की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. कॉलेज प्रशासनानेही या आत्महत्येबाबत कोणतेही भाष्य केलेले नाही.

हे सुद्धा वाचा

कुठे थांबायचं हे कळणे आवश्यक

प्रत्येकाच्या आयुष्यात सोशल मीडिया हा अविभाज्य भाग झाला आहे. कुणी विरंगुळा म्हणून तर कोणी व्यावसायिक गरज म्हणून सोशल मीडियाचा हमखास वापर करतो. रांगणाऱ्या बाळापासून ते आजी आजोबांपर्यंत प्रत्येक जण सोशल मीडियावर असलेल्या कन्टेन्टच्या आहारी गेलेले दिसत आहेत. ठराविक वापर आणि तितकेच महत्त्व दिल्यास काही गैर नाही पण कुठे थांबायचं हे कळणे आवश्यक आहे. सोशल मीडियाशी कनेक्ट होण्याच्या नादात खऱ्या आयुष्याशी डिस्कनेक्ट होत चाललेल्यांसाठी धोक्याची घंटा आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.