मोठी बातमी : छत्तीसगडमध्ये मोठा नक्षलवादी हल्ला; IED ब्लास्टमध्ये जवान शहीद
Sukma Naxal Attack : छत्तीसगडमध्ये नक्षलवादी हल्ला झाला आहे. छत्तीसगडमधील सुकमा भागात नक्षलवाद्यांनी IED ब्लास्ट केला. या हल्ल्यात दोन जवान शहीद झालेत. तर काही जवान शहीद झाले आहेत. छत्तीसगडमधील सुकमा भागात नेमकं काय घडलंय? वाचा सविस्तर...
छत्तीसगडमधून मोठी बातमी… छत्तीसगडमधील सुकमा भागात नक्षलवादी हल्ला झाला आहे. या हल्ल्यात नक्षलवाद्यांनी IED ब्लास्ट केले. या नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात दोन जवान शहीद झाले आहेत. सिलेगर भागात लक्षलवाद्यांनी IED द्वारे ब्लास्ट केले. यामुळे दोन जवानांना वीर मरण आलं. जवान त्या भागातून जाणार असल्याची माहिती घेऊनच नक्षलवाद्यांनी हा हल्ला केला. जवानांच्या मुव्हमेंट दरम्यान नक्षलवाद्यांनी हा हल्ला केला आहे. यात दोघांना वीरमरण आलं आहे. तर काही जवान गंभीररित्या जखमी झाले आहेत. याबाबत छत्तीसगड पोलिसांनी माहिती दिली आहे.
जवानांचा ट्रक जात होता अन् इतक्यात…
जवानांची तुकडी त्या भागातून जाणार असल्याने नक्षलवादी दबा धरून बसले होते. जवानांच्या ट्रकला नक्षलवाद्यांनी टार्गेट केलं अन् IED द्वारे ब्लास्ट घडवून आणले. यात दोन जवानांना आपल्या प्राणांची आहुती द्यावी लागली. तर अनेकजण जखमी झाले आहेत. जखमी झालेल्या जवानांना दवाखान्यात नेण्यात आलं आहे. तर जिथं IED ब्लास्ट झाले त्या भागाची पाहणी केली जात आहे. या पूर्ण भागाला घेराबंदी करण्यात आली आहे. तर ज्यांनी हा ब्लास्ट घडवून आणला. त्या नक्षलवाद्यांचा शोध आता घेतला जात आहे.
IED ब्लास्टमध्ये दोन जवान शहीद
सुकमा भागात झालेल्या IED ब्लास्टमध्ये दोन जवान शहीद झाले आहेत. या ब्लास्टमध्ये 201 कोबरा वाहिनीचा ट्रकचं नुकसान झालं. या ट्रकचा चालक आणि सहचालक जवान झालेत. विष्णु आर आणि शैलेंद्र असं या शहीद जवानांची नावं आहेत. या जवानांचं पार्थिव ब्लास्टच्या ठिकाणाहून काढून सुरक्षित ठिकाणी नेण्यात येत आहे.
पोलिसांनी काय माहिती दिली?
छत्तीसगड पोलिसांनी या सगळ्या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. आज जगरगुंडा भागात कॅम्प सिलगेरहून 201 कोबरा वाहिनीच्या अॅडवान्स पार्टीच्या मुव्हमेंटसाठी ट्रक कॅम्पहून टेकलगुडेमकडे निघाला. कॅम्प सिलगेरवरून टेकलगुडेमकडे जाण्याच्या मार्गात नक्षलवाद्यांनी IED ब्लास्ट केला. या ब्लास्टमध्ये दोन जवान शहीद झाले, अशी माहिती छत्तीसगड पोलिसांनी दिली आहे.