Dog Bite : भटक्या कुत्र्यांची दहशत, 6 मुलांसह दोन डझनहून अधिक लोकांना घेतला चावा

सगळ्या जखमी लोकांना सामान्य जनरल रुग्णालयात दाखल केले आहे. सध्या रमजान महिना सुरु असल्यामुळे अनेक लोकं सायंकाळी घरातून बाहेर पडत आहेत. नमाजला गेल्यानंतर...

Dog Bite : भटक्या कुत्र्यांची दहशत, 6 मुलांसह दोन डझनहून अधिक लोकांना घेतला चावा
DOG BITEImage Credit source: tv9marathi
Follow us
| Updated on: Apr 07, 2023 | 8:54 AM

सुपोल : सुपोल जिल्ह्यातील (Supaul Dog Bite News) जदिया पोलिस स्टेशनमध्ये (Jadia Police Station) क्षेत्रात बघेली गावात कुत्र्यांची मोठी दहशत आहे. तिथं भटक्या कुत्र्यांची मोठी झुंड असल्याचं पाहायला मिळत आहे. तिथल्या स्थानिकांचं असं म्हणणं आहे की, रात्रीपासून आतापर्यंत दोन डजनाहून अधिक लोकांना कुत्र्यांनी चावा (Dog Bite) घेतला आहे. त्याचबरोबर 12 पेक्षा अधिक जनावरांना कुत्र्याने चावा घेतला आहे. भटकी कुत्री भयानक हल्ला करीत असल्यामुळे तिथली लोकं प्रचंड भयभीत झाली आहेत. त्याचबरोबर घरातून बाहेर पडायला सुध्दा घाबरत आहेत. त्या कुत्र्यांवर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी पोलिसांनी केली आहे.

मुलं आणि महिलांना टार्गेट करीत आहेत

सगळ्या जखमी लोकांना सामान्य जनरल रुग्णालयात दाखल केले आहे. सध्या रमजान महिना सुरु असल्यामुळे अनेक लोकं सायंकाळी घरातून बाहेर पडत आहेत. नमाजला गेल्यानंतर अनेकांना वेळ लागतो. त्यावेळी घरात फक्त मुलं आणि महिला असतात. मुलं घराबाहेर खेळत असताना दिसली की, कुत्रे हल्ला करीत आहेत. कुत्रे अधिकतर लहान मुलांना टार्गेट करीत असल्यामुळे परिसरात मोठा घबराहट पसरली आहे. तिथली लोकं सांगत आहेत की, कुत्री तिथल्या जनावरांना सुध्दा टार्गेट करीत आहेत.

हे सुद्धा वाचा

जखमींमध्ये अर्धा डजन मुलं आहेत.

सगळ्या जखमी मुलांना तिथल्या त्रिवेणीगंज अनुमंडलीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. डॉक्टर डॉ. श्रवण कुमार हे सगळ्या रुग्णांवरती उपचार करीत आहेत. डॉ. श्रवण कुमार यांनी सांगितलं की, हे सगळं कुत्र्याने चावलेले रुग्ण आहेत. आतापर्यंत आठ ते दहा लोकांच्या प्रकरण आमच्याकडे आली आहेत. सगळ्यांवरती उपचार सुरु आहेत. ही घटना बिहार राज्यातील असून सुपोल जिल्ह्यात कुत्र्यांना ताब्यात घ्यावी अशी मागणी नागरिक करीत आहेत.

ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...