Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rahul Gandhi : राहुल गांधी यांना खासदारकी मिळणार, सर्वोच्च न्यायालयाचा मोठा दिलासा; कोर्टात नेमकं काय घडलं?

राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आल्याच्या प्रकरणावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. गुजरात उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात राहुल गांधी यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

Rahul Gandhi : राहुल गांधी यांना खासदारकी मिळणार, सर्वोच्च न्यायालयाचा मोठा दिलासा; कोर्टात नेमकं काय घडलं?
Follow us
| Updated on: Aug 04, 2023 | 2:59 PM

नवी दिल्ली | 4 ऑगस्ट 2023 : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मोदी सरनेम प्रकरणी गुजरात उच्च न्यायालयाने राहुल गांधी यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावली होती. या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे राहुल गांधी यांना मोठा दिलासा मिळाला असून त्यांना खासदारकी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. संसदेच्या अधिवेशनातच राहुल गांधी संसदेत दिसण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर काँग्रेसने ट्विट करत सत्यमेव जयते असं म्हटलं आहे.

सर्वोच्च न्यायालयाने निकाल देताना सत्र न्यायालयाला फटकारलं आहे. ट्रायल कोर्टाला एवढी मोठी शिक्षा देण्याची गरज काय होती? एवढी शिक्षा देण्यामागचं कारणही कोर्टाने दिलेलं नाही, असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे. यावेळी कोर्टाने राहुल गांधी यांना कानपिचक्याही दिल्या आहेत. राहुल गांधी यांचं विधान आपत्तीकारक होतं. मात्र, एवढी मोठी शिक्षा देण्याचं कारण कनिष्ठ न्यायालयाने स्पष्ट केलेलं नाही. तसेच त्यावर गुजरात उच्च न्यायालयाने विचारही केला नसल्याचं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे.

हे सुद्धा वाचा

काँग्रेसकडून स्वागत

सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर काँग्रेसने पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. काँग्रेसने कोर्टाच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे. द्वेषावर प्रेमाने मिळवलेला हा विजय आहे. सत्यमेव जयते, जय हिंद, असं ट्विट काँग्रेसने केलं आहे.

कोर्टात काय झालं?

राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आल्याच्या प्रकरणावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. गुजरात उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात राहुल गांधी यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. सर्वोच्च न्यायालयात सुनावणईसाठी अर्ध्या तासाची वेळ राखून ठेवण्यात आली होती. दोन्ही पक्षाच्या वकिलांना केवळ 15-15 मिनिटे बाजू मांडण्यासाठी दिले होते. आम्ही कोणत्याही समुदायाचा अपमान केला नाही. या प्रकरणात केवळ राहुल गांधी यांनाच शिक्षा सुनावण्यात आल्याचं राहुल गांधी यांच्या वकिलाने कोर्टाला सांगितलं.

पूर्णेश मोदी यांनी जो युक्तिवाद केला होता, त्यावर सर्वोच्च न्यायालयाने कठोर शब्दात भाष्य केलं. तुम्हाला किती नेत्यांची जुनी भाषणे आठवतात?, असा सवाल कोर्टाने केला.

राहुल गांधींविरोधात पुरावा नाही

राहुल गांधी यांनी भाषणात ज्या लोकांची नावे घेतली आहेत. त्यापैकी कुणीच खटला दाखल केलेला नाही. फक्त भाजपच्या नेत्यांनी खटला दाखल केला आहे. याचिका दाखल करणाऱ्याचं खरं आडनाव मोदी नाही. त्यांचं आडनाव मोध आहे. त्यावरून ते मोदी झाले. त्यामुळे राहुल गांधी यांनी कुणाचीही बदनामी केलेली नाही. त्यांच्याविरोधात कोणताही पुरावा नाही, असं राहुल गांधी यांचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी सांगितलं.

मोदी आडनावाने बदनामी नाही

दरम्यान, मोदी आडनाव घेतल्याने कुणाचीही बदनामी झाली नाही. पण राहुल गांधी यांनी बोलताना जपून प्रतिक्रिया द्यावी, असं कोर्टाने म्हटलं आहे.

संभाजीनगरमध्ये मध्यरात्री 2 गटात राडा
संभाजीनगरमध्ये मध्यरात्री 2 गटात राडा.
सामंत अन् भुमरेंनी घेतली जरांगेंची भेट, कारण काय? काय झाली चर्चा?
सामंत अन् भुमरेंनी घेतली जरांगेंची भेट, कारण काय? काय झाली चर्चा?.
वर्ष अखेरपर्यंत मुंबईकरांच्या सेवेत आणखी एक मेट्रो येणार
वर्ष अखेरपर्यंत मुंबईकरांच्या सेवेत आणखी एक मेट्रो येणार.
ईडी कार्यालयाबाहेर कॉंग्रेसचं आंदोलन; खासदार वर्षा गायकवाड जखमी
ईडी कार्यालयाबाहेर कॉंग्रेसचं आंदोलन; खासदार वर्षा गायकवाड जखमी.
ATM: प्रवास करताना पैसे संपले तरी आता धावत्या रेल्वेत पैसे काढता येणार
ATM: प्रवास करताना पैसे संपले तरी आता धावत्या रेल्वेत पैसे काढता येणार.
वाघ्याच्या वादात पडळकरांची उडी, पवारांवर टीकास्त्र तर उदयनराजेंबद्दल..
वाघ्याच्या वादात पडळकरांची उडी, पवारांवर टीकास्त्र तर उदयनराजेंबद्दल...
'दारात आलेल्या कुत्र्याला..', भिडेंच्या आडून राजू पाटलांचा टोला कोणाला
'दारात आलेल्या कुत्र्याला..', भिडेंच्या आडून राजू पाटलांचा टोला कोणाला.
निर्धार नाही, पक्ष बचाव मेळावा आहे; संजय शिरसाट यांची टीका
निर्धार नाही, पक्ष बचाव मेळावा आहे; संजय शिरसाट यांची टीका.
अमरावतीचं माझ्यावर कर्ज,फडणवीस विमानतळाच्या लोकार्पणानंतर काय म्हणाले?
अमरावतीचं माझ्यावर कर्ज,फडणवीस विमानतळाच्या लोकार्पणानंतर काय म्हणाले?.
मुलुंडमध्ये मनसे कार्यकर्त्यांनी शिक्षकाच्या अंगावर फेकला कोळसा
मुलुंडमध्ये मनसे कार्यकर्त्यांनी शिक्षकाच्या अंगावर फेकला कोळसा.